
महिला असुरक्षीत !
Contents
शिरुर तालुक्यात शाळकरी मुलीची दु:खदायक आत्महत्या ?
शिरुर सह परिसरात हळहळ व्यक्त !
शिरुर,दिनांक 4 डिसेंबर: (प्रकाश करडे यांच्याकडुन)
शिरुर तालुक्यात शाळकरी मुलीची दु:खदायक आत्महत्या घडली आहे.त्यामुळे शिरुरसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
शिरुर पोलिस स्टेशन मधे दाखल केल्यानुसार हकिकत अशी की
दि. 26/11/2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास संतोष रामदास सांभारे, वय -45 वर्ष ,व्यवसाय -शेती, राहणार- निमगाव भोगी, तालुका- शिरूर, जिल्हा-पुणे
हे त्यांच्या वैयक्तिक कामाकरिता वाघोली येथे गेले होते. तेव्हा त्यांना त्यांचे चुलत सासरे शिवाजी बांदल यांनी फोन केला. ‘ तुमची मुलगी खूप आजारी आहे. तिला श्रीगणेश हॉस्पीटल, शिरूर येथे उपचारासाठी आणले आहे. ‘असे सांगितले.त्यानंतर ते सायंकाळी 7:00 वाजण्याच्या सुमारास श्री गणेश हॉस्पीटल येथे आले.त्यावेळी त्यांच्या मुलीने त्यांचे सासरे मधुकर बांदल यांच्या राहत्या घरी साडीच्या साहयाने गळफास घेउन आत्महत्या केल्याचे समजले.’शिरुर‘
दि.27/11/2024 रोजी ग्रामीण रुग्णालय, शिरूर येथे त्यांच्या मुलीचे पोस्ट मॉर्टम होउन मुलीचा अंत्यविधी झाला.
त्याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मयत रजिस्टर नंबर १५७/२०२४ बी. एन. एस. एस. कलम १९४ प्रमाणे दि २६/११/२०२४ रोजी दाखल आहे.मात्र आज रोजी त्यांची मनस्थिती व्यवस्थित वाटत असल्याने त्यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे आलो आहे.असे सांगितले.
तरी दि.29/09/2024 ते दि. 26/11/2024 दरम्यानच्या कालावधीमध्ये आरोपीने त्यांच्या मुलीस भेटण्यासाठी, बोलण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला होता. ती अल्पवयीन असल्याचे माहीत असताना सुध्दा तिने ‘ भेटण्यास नकार दिल्यास तिची ती शिकत असलेल्या शाळेत तसेच शाळेबाहेर रस्त्यामध्ये बदनामी करेन’ अशी धमकी देउन तिस जगण्यास असय्य करून आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. अशी आरोपी विरूध्द तक्रार दाखल केली आहे.
आरोपीवर भारतीय न्याय संहिता 108 प्रमाणे शिरुर पोलिस स्टेशन मधे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल अधिकारी झेंडगे हे आहेत.तर पुढील तपास अधिकारी श्री.झेंडगे हे आहेत. प्रभारी अधिकारी श्री.संदेश केंजळे ,पोलीस निरीक्षक,शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.