Share Market 2025 For Beginners: “शेअर मार्केट म्हणजे काय? | नवशिक्यांसाठी संपूर्ण माहिती”
Share Market 2025 For Beginners: शेअर मार्केट म्हणजे काय? भारतातील शेअर बाजाराची प्राथमिक माहिती, कसे काम करते, त्यात गुंतवणूक कशी करावी – नवशिक्यांसाठी सोप्या मराठीत संपूर्ण माहिती (2025 अपडेटेड गाईड).
Share Market 2025 For Beginners: “शेअर मार्केट म्हणजे काय? | नवशिक्यांसाठी संपूर्ण माहिती”
Share Market 2025 For Beginners: लेखक डॉ नितीन पवार, संपादक ,’सत्यशोधक न्युज‘, पुणे.
Share Market 2025 For Beginners अर्थात शेअर मार्केट म्हणजे काय?—-
शेअर मार्केट म्हणजे एक अशी जागा जिथे वेगवेगळ्या कंपन्या आपले शेअर्स (भाग) विकतात व लोक ते खरेदी करतात. यामधून कंपन्यांना भांडवल मिळत असते.तर गुंतवणूकदारांना नफा मिळवण्याची संधी मिळत असते.कंपनीच्या नफ्यातला त्याचा जेवढा शेअर असतो त्या प्रमाणामध्ये नफा मिळवण्याची संधी मिळत असते. कंपनीला तोटे झाला तर त्याच्या शेअरच्या प्रमाणात तोटाही होत असतो.
Share Market 2025 For Beginners नी समजुन घेण्यासारखे डोनाल्ड ट्रम्प व शेअर बाजाराचे एदाहरण—
बरेच लोक याला एक प्रकारचा ,’ जुगार’ असेही म्हणतात. कारण यात नफा किंवा तोटा होवु शकतो.जर अचानक शेअर बाजारातील गुंतवणूक व शेअरचे दर कमी किंवा जास्त होवु शकतात.उदाहरणार्थ नुकतेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन टेरिफ धोरणाची घोषणा केली.तेव्हा शेअर्स धारकांचे काही लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.एकट्याचे नाही तर शेअर्स किती व कोनत्या कंपनीचे घेतले होते.त्यावर ते अवलंबून होते.
शक्यता गृहित धरणे महत्वाचे का होते?––
पण जे पुर्ण अभ्यास राजकीय, आर्थिक व सामरिक बाबींचा अभ्यास ठेवतात.त्यांच्या समोर ही बाबत असते की डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत कोनते धोरण जाहीर केले होते.अमेरिकन नागरिकांना काय आश्वासन दिले होते. ते निवडुण आले तर कोणते धोरण जाहीर करतात.याचा अंदाज ज्यांना होता.त्यांनी ती शक्यता गृहित धरुन आपले शेअर्स गुंतवणूक, खरेदी व विक्री याबाबतची खबरदारी घेतली.त्यांना तितकाच नफा झाला.थे गाफिल राहिले,त्यांचे नुकसान झाले.
Share Market 2025 For Beginners समजुन घेण्यासाठी ,भारतामध्ये शेअर मार्केट कुठे आहे?—-
भारतामध्ये दोन प्रमुख शेअर बाजार आहेत: 1. BSE (Bombay Stock Exchange),मुंबई 2. NSE (National Stock Exchange),मुंबई
या दोनही ठिकाणी बहुतांश कंपन्यांचे शेअर्स हे ‘लिस्टेड’ असतात.
शेअर म्हणजे काय?—-
शेअर म्हणजे एखाद्या कंपनीतील असणारा तुमचा लहानसा हिस्सा. तुम्ही जर एका कंपनीचे शेअर विकत घेतले, तर तुम्ही त्या कंपनीचे भागधारक (shareholder) होत असता.
उदाहरण: जर समजा तुम्ही रिलायन्स कंपनीचे 10 शेअर्स विकत घेतले, तर तुम्ही त्या कंपनीच्या नफ्यात भागीदार बनता.
सुरुवातीलल शेअर मार्केटमध्ये पैसे कसे गुंतवतात?—-
✅1.तुम्हाला तुमचा Demat Account उघडावा लागतो.तो जरुरी असतो.
✅2. कोणत्याही सेबी रजिस्टर्ड ब्रोकर कडून ट्रेडिंग Account उघडता येतो. जसे Zerodha, Upstox इ.
✅3. बाजारातील कंपन्यांचा चांगला अभ्यास करा.
✅4. त्यानंतर शेअर्स खरेदी करा.
✅5. नफा मिळवण्यासाठी तुमच्या शेअरची योग्य वेळेस विक्री करा.
शेअर मार्केटमधील फायदे—-
✅कंपनीची वाढ होतेच. तुमच्या पैशांची किंमतही वाढते.
✅डिव्हिडंड्सच्या माध्यमातून उत्पन्न मिळते.
दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी देखील हा चांगला मार्ग.
शेअर मार्केटमध्ये धोके काय आहेत?—–
✅शेअर मार्केटमध्ये चढ-उतार होत असतो हे आपण वर पाहिले.
✅चुकीच्या माहितीवर आधारित गुंतवणूक तुमचे नुकसान करू शकते.
✅शॉर्ट टर्ममध्ये अनिश्चितता जास्त असते.
शेवटी काही टिप्स अशा—
👉गुंतवणूक करण्याआधी संबधित कंपनीचा
👉अभ्यास करा.
👉नियमित या क्षेत्रातील माहिती मिळवत राहा.
👉मोठ्या नफ्याच्या आशेत चुकीची जोखीम घेण्याचे टाळा.
👉लांब पल्ल्याची गुंतवणूक करणे जास्त फायद्याचे असते.
——–
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com