
Contents
- 1 शिरूर: २३ वर्षीय तरुण अभिषेक खंडागळे बेपत्ता, पोलीसांत तक्रार दाखल
शिरूर: २३ वर्षीय तरुण अभिषेक खंडागळे बेपत्ता, पोलीसांत तक्रार दाखल
शिरूर: २३ वर्षीय तरुण अभिषेक खंडागळे बेपत्ता:बेपत्ता महिलेच्या पार्शभुमिवर त्याच गावातील हा तरुण.
शिरूर, पुणे | १ मे २०२५(प्रकाश करडे यांच्याकडुन)
शिरूर: २३ वर्षीय तरुण अभिषेक खंडागळे बेपत्ता:शिरूर तालुक्यातील शिंदोडी गावातून एक २३ वर्षीय तरुण रहस्यमयरीत्या बेपत्ता झाला आहे. अभिषेक लक्ष्मण खंडागळे असे या तरुणाचे नाव असून, तो २७ एप्रिल २०२५ रोजी रात्री १० वाजता ते २८ एप्रिल रोजी रात्री १२.१५ दरम्यान कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेला.
मूळचा दशमीगाव, ता. वाशी, जि. धाराशिव येथील—
अभिषेक हा मूळचा दशमीगाव, ता. वाशी, जि. धाराशिव येथील असून सध्या तो शिंदोडी (ता. शिरूर, जि. पुणे) येथे वास्तव्यास होता. त्याच्या अचानक बेपत्ता होण्याने कुटुंबीय चिंतेत असून त्यांनी शिरूर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे.
शिरुर पोलिस तपास करत आहेत —
त्याची आई, उज्वला लक्ष्मण खंडागळे (वय ४८), व्यवसायाने उसतोड मजूर, यांनी ही तक्रार दिली असून तपास पोलीस अंमलदार पोहवा आगलावे व दाखल अंमलदार पोहवा टेंगले यांच्याकडे आहे. संबंधित व्यक्तीबाबत कुणाला काही माहिती असल्यास खालील नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे: मो. नं. 8329627326.
बेपत्ता व्यक्तीची माहिती—
• नाव: अभिषेक लक्ष्मण खंडागळे
• वय: २३ वर्ष
• मूळ गाव: दशमीगाव, ता. वाशी, जि. धाराशिव
• सध्याचा पत्ता: शिंदोडी, ता. शिरूर, जि. पुणे
• बेपत्ता होण्याची वेळ: २७ एप्रिल २०२५ रोजी रात्री १०.०० वाजता ते २८ एप्रिल रोजी १२.१५ दरम्यान
• संपर्क: 8329627326
——–
खास वैचारिक भेट. ..
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३३ मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स….
• ‘ हयवदन’…..
• बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण…
• शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ …
• ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…
1 thought on “शिरूर: २३ वर्षीय तरुण अभिषेक खंडागळे बेपत्ता, पोलीसांत तक्रार दाखल”