
Contents
- 1 शिरूर: विश्वासघात करून मोबाईलमधून ८३ हजारांचा अपहार; दोघांवर गुन्हा दाखल
शिरूर: विश्वासघात करून मोबाईलमधून ८३ हजारांचा अपहार; दोघांवर गुन्हा दाखल
शिरूर: विश्वासघात करून मोबाईलमधून ८३ हजारांचा अपहार : पिंपरखेड येथील घटना!
शिरुर,दिनांक 5 मेक 2025:(कल्पना पुंडे यांच्याकडुन)
शिरूर: विश्वासघात करून मोबाईलमधून ८३ हजारांचा अपहार:शिरूर तालुक्यातील पिंपळखेड गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका मजुराच्या मोबाईलमधील फोनपे अॅपद्वारे ८३,००० रुपयांचा विश्वासघात करून अपहार केल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा तपशील:
फिर्यादी संदेश मारुती वाघचौरे (वय २३, रा. पिंपळखेड, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १५ फेब्रुवारी २०२५ ते २१ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ते त्यांच्या मावशीच्या घरी राहायला गेले असताना, सोबत असलेला मित्र सुरेश दत्तात्रय पाटील (रा. कराड, जि. सातारा) याने विश्वासात घेऊन त्यांचा मोबाईल वापरून त्यातील फोनपे अॅपद्वारे मास्टर हरेश दत्तात्रय भिसे याच्या खात्यावर एकूण ८३,००० रुपये ट्रान्सफर केले.
सुरेश पाटील हा चाकण येथील रूम सोडून पसार झाला—-
त्यानंतर सुरेश पाटील हा चाकण येथील रूम सोडून पसार झाला. याप्रकरणी सुयश दत्तात्रय पाटील आणि मास्टर हरेश दत्तात्रय भिसे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 316(2), 3(5) अंतर्गत गुन्हा स्टे गु. र. नं. ३०३/२०२५ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याची नोंद—
• गुन्हा दाखल झाल्याची वेळ: ४ मे २०२५ रोजी दुपारी ३.३५ वाजता
• दाखल करणारे अंमलदार: पो.हवा. टेंगले
• तपास अधिकारी: पो.हवा. जगताप
• प्रभारी अधिकारी: पो.नि. श्री. संदेश केंजाळे, शिरूर पोलीस स्टेशन
या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
खास वैचारिक भेट. ..
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३३ मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स….
• ‘ हयवदन’…..
• बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण…
• शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ …
• ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…