
Contents
- 1 शिरूर तालुका बारामती जिल्ह्यात जाणार ? कदापी असे होऊ दिले जाणार नाही !
- 1.1 शिरूर तालुका आपने आप में ही एक अस्मिता है !
- 1.1.1 शिरुर,दिनांक 22 जानेवारी : (संपादकीय ,सत्यशोधक न्यूज टिम ,शहर)
- 1.1.2 शिरुर तालुका वैशिष्टयपूर्ण !
- 1.1.3 सत्तेचे केंद्रीकरण करून सत्ता मिळवणे हाच हेतु !
- 1.1.4 शिरुर शहरातील वार्डरचना एक नमुना !
- 1.1.5 सत्तेचे महत्त्व अनन्यसाधारण. ..
- 1.1.6 भारतीय जनता पक्षाची प्रवृत्ती. ..
- 1.1.7 इतिहासाचे महत्त्व वर्तमान पिढीला. ..
- 1.1.8 शिरुर तालुका ऐतिहासिक क्षेत्र !
- 1.1.9 शिरुर तालुक्यात कोरेगाव भीमा, वढू,इनामगाव,औद्योगिक क्षेत्र . ..
- 1.1.10 इनामगाव उत्खननाद्वारे शिरुर तालुक्याचे प्राचीनत्व अधोरेखित होते. ..
- 1.1.11 शिरुर तालुका पुरोगामी, धर्मनिरपेक्ष !
- 1.1.12 शिरुर तालुका : जागृत राहिले पाहिजे. ..
- 1.1.13 About The Author
- 1.1 शिरूर तालुका आपने आप में ही एक अस्मिता है !
शिरूर तालुका बारामती जिल्ह्यात जाणार ? कदापी असे होऊ दिले जाणार नाही !
शिरूर तालुका आपने आप में ही एक अस्मिता है !
शिरुर,दिनांक 22 जानेवारी : (संपादकीय ,सत्यशोधक न्यूज टिम ,शहर)

शिरूर तालुका बारामती जिल्ह्यात जाणार आहे. अशी चर्चा सुरु आहे. परंतु कदापी असे होऊ दिले जाणार नाही ! शिरूर तालुका ‘आपने आप में ही एक अस्मिता है !’ ही ही बाब संबंधितांनी समजून घेणे आवश्यक आहे. शिरूर तालुका पुणे जिल्ह्यात आहे. बारामती जिल्हा निर्माण करण्याची चर्चा यापूर्वी झालेली होती .शिरूर तालुका संभावित बारामती जिल्ह्यामध्ये जाणार अशी चर्चाही यापूर्वी झाली होती. आणि आता पुन्हा सुरू झाली आहे. परंतु शिरूर तालुक्यातील जनता किमान पुणे जिल्ह्यातून दुसऱ्या कोणत्या जिल्ह्यात जाण्यास कदापि तयार होणार नाही .जे आहे ते ठीक आहे .मग उगाचच नवीन डोकं लावायचं कारण काय? बारामती जिल्हा झाला किंवा नाही झाला तरी त्याबाबत शिरूर तालुक्यातील जनतेला काही वाईट वाटण्याचे कारण नाही .परंतु अशा प्रकारच्या कोणत्याही नव्या जिल्ह्यामध्ये शिरूर तालुका समाविष्ट करणे. हे शिरूर तालुक्याच्या अस्मितेला धक्का आहे .कारण शिरूर शहर हे देखील एखाद्या जिल्ह्याचे ठिकाण होऊ शकते इतके शिरूर शहराची एकूण संरचना आहे,पोटेंशियल आहे. पुण्याचे शिरुर तालुक्याचे जोडलेले नाते हे अतूट असेच बनले गेलेले आहे.पुणे शहर हे असे शहर आहे. जेथे प्रत्येक क्षेत्रातील जागतिक पातळीवरील प्रतिभा आहे.’शिरूर तालुका‘
शिरुर तालुका वैशिष्टयपूर्ण !

आता शिरूर तालुका पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका आहे.शिरूर तालुक्याची स्वतःची स्वतःची असा आपला एक इतिहास आणि वैशिष्ट्य आहेत. इतिहासाचे नाते पुणे शहराशी जोडली गेलेली आहे. शिरूर शहर अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर आहे .
सत्तेचे केंद्रीकरण करून सत्ता मिळवणे हाच हेतु !
आता मूळ आपण अशा प्रकारच्या फेररचनांचे कारण आणि स्वरूप समजून घ्यायला पाहिजे. मुळात सत्तेचं विकेंद्रीकरण हे छोट्या छोट्या भागांमध्ये राज्य, जिल्हे ,तालुके आणि गावे निर्माण केल्याने होत असते. परंतु ज्या ज्या वेळेस जे सरकार होते .त्या सरकारने अशा प्रकारची संरचना तयार करताना आपले राजकीय हित जोपासले .त्यांनी अशा प्रकारची रचना जी केलेली आहे ती प्रामाणिकपणे केलेली नाही. हे निश्चित ! आता जरी कोणी अशा प्रकारची नवीन फेररचना करणार असेल तर त्याच्या मागे देखील कारण राजकीयच आहे. राजकारणातील बदमाश्यांनी अनेक वेळा निवडणूक आपल्याला कशी जिंकता येईल. अशा पद्धतीने नगरपालिकेच्या वार्डांची रचना केलेली आपण शिरुर शहरात पाहतो .
शिरुर शहरातील वार्डरचना एक नमुना !
शिरुर शहरातील सर्व वार्ड विचित्रपणे निर्माण केलेले दिसून येतात. त्याच प्रामुख्याने राखीव जागा असणारी जे वार्ड आहेत .त्या वार्डमध्ये जी प्रभावी जात आहे .तिच्या मतावर अवलंबून उमेदवार अवलंबून असणार नाही .याची काळजी घेतली गेली. जेणेकरून प्रस्थापितांना तिथून त्यांचा स्वतःच्या तालावर नाचणारा प्रतिनिधी निवडून आणता येईल .आणि बहुसंख्य असलेल्या जातीचा प्रतिनिधी, स्वाभिमानी प्रतिनिधी, स्वतंत्र पाण्याचा प्रतिनिधी निवडून येणार नाही याची .काळजी या वार्ड रचनांमध्ये घेतलेली दिसून येते. हा एक नमुना फक्त! अशाच प्रकारची जिल्ह्यांची रचना करताना सुद्धा त्या त्या वेळच्या राज्य सरकारमध्ये आणि केंद्र सरकारमध्ये असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या हितसंबंधांना साधल्या जाणारी अशा प्रकारची जिल्हा निर्मिती किंवा तालुका निर्मिती किंवा गावांची निर्मिती ,वाड्यांची निर्मिती, ग्रामपंचायत निर्मिती, तालुकास्तरावर नगरपालिकांची, वार्डांमध्ये निर्मिती केली .
सत्तेचे महत्त्व अनन्यसाधारण. ..
सांगली जिल्हा देखील अशाच राजकीय प्रभावातून आकाराने बराच छोटासा असलेला निर्माण केला गेला. अहमदनगर सर्वात मोठा असणारा जिल्हा देखील आहे. तसाच ठेवला गेलेला आहे. याबाबत खरे तर देशातील राज्य छोटी छोटी असावीत असे .त्यावेळच्या नेत्यांना वाटलेले होते. त्यानंतर बरीत सोयीस्कर राज्य विभागली गेली .उत्तर प्रदेशचे उत्तराखंड, मध्य प्रदेशचे झारखंड वगैरे अशी अनेक राज्ये केली. सत्तेचे केंद्रीकरण करून सत्ता आपल्या हातात कायम ठेवणे हा मुख्य उद्देश राजकीय व्यवस्थेने नेहमी डोळ्यासमोर ठेवला होता. आजच्या बदललेल्या आणि नव्या तंत्रज्ञानाच्या काळात देखील राजकीय सत्तेचे महत्त्व हे मोठे आहे. हे सर्वांना समजते.
भारतीय जनता पक्षाची प्रवृत्ती. ..
अनेक गोष्टी नव्याने निर्माण करण्याची, नावे बदलण्याची, वास्तुस्थाने बदलण्याची केंद्रातील भारतीय जनता पक्षाची आणि राज्यातील देखील भारतीय जनता पक्षाची प्रवृत्ती आपल्याला दिसून आलेली आहे. भारतीय न्याय संहिता कायदा असे इंडियन पिनल कोड चे नाव बदलले .ते नाव इंग्रजांनी दिलेले होते .परंतु त्यातील कलमे आज कायम आहेत .त्यांचे क्रमांक मात्र बदलले गेले आहेत .इंग्रजांनी ठेवलेली नावे पूर्ण तसेच ठेवावीत की न ठेवावीत. याबाबतीत मत भिन्नता असू शकते .कारण तो इतिहासाचा भाग आहे .इतिहास जतन करायचा की इतिहास नष्ट करायचा हे इतिहास कुणाला कसा सोयीस्कर आहे आणि कुणाला कसा सोयीस्कर नाही .या दृष्टीने त्याच्याकडे पाहून तो नष्ट करण्यात येतो किंवा बदलण्यातही येतो. असा जगाचा इतिहास आहे .
इतिहासाचे महत्त्व वर्तमान पिढीला. ..

परंतु इतिहासातील घटना या वर्तमान समाजाला आणि भविष्यातील समाजाला मार्गदर्शन करणार्या असतात. आपल्या पूर्वजांचे जीवन कसे होते? इतिहास काय होता? संस्कृती काय होती? परंपरा काय होत्या? राजे पद्धती कशी होती? न्यायव्यवस्था कशी होती? चलन पद्धती कशी होती? सैन्य व्यवस्था कशी होती? अशा अनेक प्रकारची माहिती पूर्वजांकडुन वर्तमान पिढीला मिळत असते. जन्माला येताना कोणी वर्तमान जगातील अस्तित्वात असलेले सर्व ज्ञान बरोबर घेऊन येत नाही .तर जन्माला आल्यानंतर त्याला वक्त मनाचे, भूतकाळाचे आणि भविष्यकाळाचे देखील ज्ञान प्राप्त करावे लागते. असो.
शिरुर तालुका ऐतिहासिक क्षेत्र !

शिरूर तालुका हा पुणे जिल्ह्यातील एक तालुका आहे .पुणे हे ऐतिहासिक शहर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महत्त्वाचा इतिहास पुणे शहराशी संबंधित आहे.शिरूर तालुका देखील पुणे शहराच्या इतिहासाची जोडला गेलेला आहे. शिरूर तालुक्यातील वढू येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा अंत झालेला आहे. ते ठिकाण शिवशाहीच्या प्रचंड अशा दैदिप्यमान इतिहासाची साक्ष आहे .
शिरुर तालुक्यात कोरेगाव भीमा, वढू,इनामगाव,औद्योगिक क्षेत्र . ..
कोरेगाव भीमा हे देखील भारतभर प्रसिद्ध आहे .ते शिरुर तालुक्यात आहे .सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यातील एक महत्त्वाची घटना म्हणून जागतिक पातळीवर सुद्धा कोरेगाव भीमा येथे झालेल्या लढाईला महत्त्व आहे .त्या लढाईला अनेक कांगोरे आहेत. त्यात इंग्रज हा एक महत्त्वाचा घटक आहेत. त्या लढाईमध्ये अगदी मुस्लिमांपासून तुर्की,अरबी,हब्शी,पोर्तुगीज,राजपुत,दलित,ब्राह्मण,आफ्रिकी इत्यादी अनेक देशांतील सैनिक इंग्रजांच्या सैन्यामध्ये होते. तसेच पेशव्यांच्या सैन्यांमध्ये देखील होते .ही त्यावेळच्या परिस्थितीची उत्तम माहिती देणारी अशी एक ऐतिहासिक घटना आहे. ऐतिहासिक ठिकाण आहे .
इनामगाव उत्खननाद्वारे शिरुर तालुक्याचे प्राचीनत्व अधोरेखित होते. ..
शिरुर तालुक्याचे शहर आहे. परंतु शिरूर हे स्वतंत्र वसलेले शहर आहे. ते पूर्वीचे गाव नाही. पूर्वीची गावे मोठी होऊन तालुक्याची ठिकाणे बनली. परंतु शिरूरचे हे वेगळे वैशिष्ट्य आहे .इथे इंग्रजांच्या काळामध्ये, त्याचबरोबर औरंगजेब अहमदनगर मधून औरंगाबाद कडे गेल्यानंतर आणि आजच्या घडीला देखील देशाच्या प्रत्येक राज्यातील माणूस शिरूर शहरात स्वतःची जागा घेऊन स्वतःची घर बांधून राहत आहे. अशा प्रकारची पूर्णपणे पारंपारिक गावातून नव्हे तर स्वतंत्रपणे निर्माण झालेले मोठे शहर देशात दुर्मिळ आहे. हीच शिरूर तालुक्याचे अस्मिता अशासाठी देखील आहे . प्राचीन अवशेषांचे नमुने शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे सापडले आहेत. आणि त्याचे नाते थेट मोहेंजोदारो, हडप्पा,कालीबंगन,थोर आणि नव्याने सापडलेल्या अनेक पुरातत्त्व शास्त्रीय साईटला जोडणारे आहे .शिरूर तालुक्याचे असणारे प्राचीनत्व देखील यातुन सिद्ध होते.
शिरुर तालुका पुरोगामी, धर्मनिरपेक्ष !
शिरूर तालुक्याची सामाजिक, धार्मिक , भौगोलिक संरचना देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथे धार्मिक विद्वेषाचे प्रसंग घडलेले नाहीत. येथे जातीव्यवस्थेने निर्माण झालेले जाती जातीमधील संघर्षाचे प्रसंग उद्भवलेले नाहीत. शिरूर तालुक्याचा समाज हा पुरोगामी विचारांचा प्रभाव असलेला आहे. धर्मनिरपेक्षता देखील शिरुर तालुक्यातील लोकांच्या मनामध्ये खोलपणे रुजलेली गेलेली आहे .शिरूर तालुका पूर्णपणे प्रगत झालेला आहे असे आम्ही म्हणत नाही .अजून शिरूर तालुक्याला खूप मोठी मोठी यशाची शिखरे चढायची आहेत.अशा परिस्थितीमध्ये जर कोणी शिरूर तालुका एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हलविण्याचे किंवा सामील करण्याचे प्रयत्न राजकीय हेतूने करत असेल .तर त्याचा निषेध केला पाहिजे.
शिरुर तालुका : जागृत राहिले पाहिजे. ..
शिरूर तालुक्यातील जनता अशा प्रकारचे प्रयत्न कोणत्याही परिस्थितीमध्ये खपवून घेणार नाही. असे मात्र या निमित्ताने शिरूर शहरातील एक जबाबदार न्यूज साईट ‘सत्यशोधक न्यूज डॉट कॉम’ आणि आम्ही स्वतः संपादक ही ग्वाही देण्यास मागे पुढे पाहत नाही. वेळ पडली तर असे प्रयत्न हाणुन पाडण्यासाठी कायदेशीर मार्गाने, शांततेच्या मार्गाने लढा देण्यासाठी सत्यशोधक न्यूज पुढे राहील .असे या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो . शिरूर तालुक्यातील जनतेला आव्हान करू इच्छितो की अशा प्रकारचे प्रयत्न हे यशस्वी होऊ नयेत यासाठी नेहमी जागृत राहिले पाहिजे.
( Thanks to Wikipedia for images in this content)