
Contents
- 1 दोन चोरट्यांनी गळ्यातील डोरले हिसकावले : शिरूर तालुक्यातील जांबुतमध्ये धक्कादायक घटना
- 2 माझी ‘कविता’गीरी…
- 2.1 “सत्यशोधक न्युज”
- 2.2 ‘सत्याचा शोध’ आणि ‘मार्गदर्शक’ होणारा, एक नवा ‘सितारा’ |
- 2.3 प्रकाशाचा किरण, जणू काळोख्या आकाशातला ‘ध्रुव’ तारा । तपशीलांची गोष्ट सांगणारा, वस्तुस्थितीची नांदी, जिथे असत्याला उधळून, सत्याची होत असते जांदी।
- 2.4 ज्ञानाच्या गंगेचे, असंख्य प्रवाह इथे झुळझुळतात, शब्दांचे एक एक बंध, जे विचारांच्या गतीला जोडतात।
- 2.5 न्याय, सन्मान आणिक तर्कांच्या रंगांची, चालत चालत, सत्याच्या वाटेवरती कधीही न थांबणारी रुजवात। समाजाच्या हितासाठी , तो शोधतो खरा मार्ग,
- 2.6 ‘शक्यता’ आणि ‘सत्यता’ यांना लावतो, एक फुलांचा ‘दुर्ग ‘।
- 2.7 “सत्यशोधक न्युज” होय, एक अद्वितीय आहे मिशन, जिथे होईल ‘प्रकाश’, त्या अंधकाराच्या धुक्याचा होईल अंतिम क्षण |
- 2.8 दुसऱ्यांच्या आवाजात, आपलाच संदेश खरा, सत्यशोधक न्युज, समाजासाठी असे एक नवा झुंजार।
- 2.9 सत्य, समतेचा, आणी एकतेचा विचार, सत्यशोधक न्युज ठरवेल, प्रगतीचा ध्वजार। ••••••••
- 2.10 खास वैचारिक भेट. ..
- 2.11 • शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स…. • ‘ हयवदन’….. • बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण… • शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ … • ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…
दोन चोरट्यांनी गळ्यातील डोरले हिसकावले : शिरूर तालुक्यातील जांबुतमध्ये धक्कादायक घटना
दोन चोरट्यांनी गळ्यातील डोरले हिसकावले :खिडकी उचकटून दोघा चोरट्यांनी घरात प्रवेश!
शिरूर, 30 एप्रिल 2025 –( प्रकाश करडे यांच्याकडुन)
दोन चोरट्यांनी गळ्यातील डोरले हिसकावले:शिरूर तालुक्यातील जांबुत येथील थोरातवस्तीमध्ये एका 52 वर्षीय महिलेवर मध्यरात्री दोन अज्ञात चोरट्यांनी हल्ला करत गळ्यातील सोन्याचे डोरले आणि कानातील कुड्या हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
झोपलेल्या खोलीची खिडकी उचकटली !
ही घटना दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी पहाटे 2:00 ते 2:30 वाजेदरम्यान घडली. पीडित महिला सौ. हिराबाई लक्ष्मण थोरात (वय 52, व्यवसाय शेती, रा. जांबुत, थोरातवस्ती, ता. शिरूर, जि. पुणे) झोपलेल्या खोलीची खिडकी उचकटून दोघा चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यापैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे डोरले जबरदस्तीने हिसकावले, तर दुसऱ्याने कानातील सोन्याच्या कुड्या काढून नेल्या.
जोरात ओढल्याने डाव्या कानाच्या पाळीला जखम-
या घटनेत विशेष बाब म्हणजे, डाव्या कानातील कुडी निघत नसल्याने ती जोरात ओढल्याने हिराबाई यांच्या डाव्या कानाच्या पाळीला जखम झाली आहे.
पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल —
या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक 290/2025 नोंदवण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(4) आणि 331(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासाची जबाबदारी PSI शुभम चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास वेगाने सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक कार्यरत झाले आहे.
माझी ‘कविता’गीरी…

“सत्यशोधक न्युज”
‘सत्याचा शोध’ आणि ‘मार्गदर्शक’ होणारा, एक नवा ‘सितारा’ |
प्रकाशाचा किरण, जणू काळोख्या आकाशातला ‘ध्रुव’ तारा ।
तपशीलांची गोष्ट सांगणारा, वस्तुस्थितीची नांदी,
जिथे असत्याला उधळून, सत्याची होत असते जांदी।
ज्ञानाच्या गंगेचे, असंख्य प्रवाह इथे झुळझुळतात,
शब्दांचे एक एक बंध, जे विचारांच्या गतीला जोडतात।
न्याय, सन्मान आणिक तर्कांच्या रंगांची,
चालत चालत, सत्याच्या वाटेवरती कधीही न थांबणारी रुजवात।
समाजाच्या हितासाठी , तो शोधतो खरा मार्ग,
‘शक्यता’ आणि ‘सत्यता’ यांना लावतो, एक फुलांचा ‘दुर्ग ‘।
“सत्यशोधक न्युज” होय, एक अद्वितीय आहे मिशन,
जिथे होईल ‘प्रकाश’, त्या अंधकाराच्या धुक्याचा होईल अंतिम क्षण |
दुसऱ्यांच्या आवाजात, आपलाच संदेश खरा,
सत्यशोधक न्युज, समाजासाठी असे एक नवा झुंजार।
सत्य, समतेचा, आणी एकतेचा विचार,
सत्यशोधक न्युज ठरवेल, प्रगतीचा ध्वजार।
••••••••
खास वैचारिक भेट. ..
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३३ मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स….
• ‘ हयवदन’…..
• बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण…
• शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ …
• ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…