
Contents
- 1 २८ वर्षीय तरुणी बेपत्ता : शिरूर तालुक्यातून पत्नी आणि सहा वर्षांचा मुलगा दोघेही अचानक बेपत्ता
२८ वर्षीय तरुणी बेपत्ता : शिरूर तालुक्यातून पत्नी आणि सहा वर्षांचा मुलगा दोघेही अचानक बेपत्ता
२८ वर्षीय तरुणी बेपत्ता:सोबत ६ वर्षाचा मुलगा?
शिरूर (जि. पुणे), दि. १ मे २०२५: (प्रकाश करडे यांच्याकडुन)
२८ वर्षीय तरुणी बेपत्ता;शिरूर तालुक्यातील शिंदोडी गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २४ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली असून तिच्यासोबत तिचा सहा वर्षीय मुलगाही गायब आहे.
घरात काही न सांगता निघून गेली—
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश बबन सावंत (वय २८) यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे की, त्यांची पत्नी वैशाली गणेश सावंत (वय २५) आणि मुलगा विराज गणेश सावंत (वय ६) हे दोघे २८ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९ वाजेपासून ते २९ एप्रिल रोजी पहाटे १२:३५ दरम्यान कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेले आहेत.
वैशाली सावंत यांचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे –
• सावळा रंग,
•उंची ५ फूट,
• हिरव्या रंगाची पांढऱ्या नक्षीची साडी, काळे जाकीट, लांब काळे केस,
• कानात फुल,
• गळ्यात मंगळसूत्र, • कपाळावर गोंदलेले,
• पायात चांदीचे जोडवे व पैंजण, चॉकलेटी चप्पल.
• त्या मराठी भाषा बोलतात.
मुलगा विराज याचे वर्णन असे –
• सावळा रंग,
• उंची ३ फूट, अंगात पांढरा शर्ट व काळी पँट, काळे केस, पायात काळ्या रंगाचे सँडल. तोही मराठी भाषा बोलतो.
शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद —-
या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये रजि. नं. ६७/२०२५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
एन्ट्री नंबर: ९०/२०२५
या प्रकरणाचा तपास पो. हवा टेंगले (२४९९) करत असून देखरेख पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे.
आवाहन —
कोणालाही या मायलेकांविषयी कोणतीही माहिती असल्यास कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
९६९९२२५७५६ / ९३७०५९११३०
———
खास वैचारिक भेट. ..
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३३ मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स….
• ‘ हयवदन’…..
• बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण…
• शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ …
• ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…