अज्ञात चोरटयाचे प्रतिक चित्र !
Contents
शिरुर तालुक्यात 6 लाख 36 हजार रुपयांच्या सोन्या,चांदीची चोरी कुठे व कशी झाली ते वाचा इथे !
शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल!
शिरुर, दिनांक – 18जानेवारी : (‘सत्यशोधक न्युज’ रिपोर्ट)

शिरुर तालुक्यात 6 लाख 36 हजार रुपयांच्या सोन्या,चांदीची चोरी कुठे व कशी झाली ते वाचा इथे ! अर्थात शिरुर पोलिस स्टेशन मधे सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरुर जवळील दसगुडे मळा येथील घटना !
शिरुर पोलिस स्टेशन मधे नोंद केल्यानुसार
हकीकत अशी की खालील वर्णनाचे व किंमतीचे सोन्या चांदीचे दागिणे व रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन नेली आहे. दिनांक १६/०१/२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजण्याच्या ते ३:३० वाजण्याच्या सुमारास दसगुडे मळा, रामलिंग, शिरूर, तालुका- शिरूर ,जिल्हा – पुणे फिर्यादी फिर्यादी सौ. कांचन सोमनाथ दसगुडे, वय-55 वर्षे, व्यवसाय -शेती ,राहणार- दसगुडे मळा ,रामलिंग, शिरूर ,तालुका -शिरूर , जिल्हा -पुणे यांच्या बंद घराची कडी उघडुन त्यावाटे आत प्रवेश केला.
Read more >>
शिरुर तालुक्यातील दु:खद घटनेत 16 वर्षीय मुलगा अपघातात मुत्युमुखी !
परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी याच्या ‘संशयास्पद मृत्यू” चा शिरूर मध्ये तीव्र निषेध !
यांच्या संमती शिवाय मुद्दाम लबाडीच्या इरादयाने घरफोडी चोरी करून चोरून नेला गेला आहे.
शिरुर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल !
म्हणुन फिर्यादी सौ. कांचन सोमनाथ दसगुडे यांनी अज्ञात चोरटया विरूध्द कायदेशिर शिरुर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. त्यांचे सोन्या, चांदीचे दागिणे तसेच रोख रक्कम सापडल्यास ती त्या ओळखु शकतात.असेही त्यांनी शिरुर पोलिसांना सांगितले आहे.
चोरीला गेलेला माल पुढील प्रमाणे आहे —-
१) ७०,०००/-रूपये किंमतीच्या कानातील साखळी सह सोन्याचे झुंबर १२ ग्रॅम वजनाचे जु.वा. किं.अं.
२) १,४०,०००/-रूपये. किंमतीचे गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस जु.वा.किं.अं.
३) २,१०,०००/- रूपये किंमतीचा एक गळ्यातील तिन तोळे वजनाचा सोन्याचा गंठण जु.वा. किं. अं.
४) ५०,०००/- रूपये किंमतीचे एक गळ्यातील ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे (आक्काबाई) मणी, मंगळसूत्र, गजरे मणी असलेले जु.वा. किं.अं.
५) ७०,०००/-रू किंमतीच्या हातातील दोन पाच-पाच ग्रॅमच्या जेन्टस सोन्याच्या, साध्या अंगठी जु.वा. किं.अं.
६) १०,०००/- रू किंमतीची नाकातील २ ग्रॅम वजनाची सोन्याची नय जु. वा. किं.अं.
७) १०,०००/- रूपये किंमतीचे गळ्यातील सोन्याचे साधे मणी मंगळसूत्र १ ग्रॅम वजनाचे जु.वा. किं.अं.
८) ६,०००/- रू किंमतीचे पायातील चांदीचे धातूचे जोडवे व बिचवे एक एक जोड सहा भाराचे जु.वा. किं.अं.
९) २०,०००/- रूपये किंमतीचे सोन्याचे मणी, १० ग्रॅम वजनाचे जु. वा.
10) ५०,०००/-रूपये रोख रक्कम त्यात भारतीय चलनाच्या ५०० रूपये दराच्या ९८ नोटा तसेच २०० रूपयेदराच्या ३ नोटा व १०० रूपये दराच्या ४ नोटा अशी
६,३६,०००/- रूपये इतकी किंमतीची ही चोरी करणात आली आहे.
Read more >>
चोरटा अज्ञात?
शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा रजिस्टर नंबर-33/2025 आहे.तर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 331(3) , 305 प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल अमंलदार पोलिस हवालदार श्री. वारे हे आहेत.तर पुढील तपास अमंलदार पोलिस सब . इन्पेक्टर श्री. चव्हाण हे करत आहेत. प्रभारी आधिकारी पोलिस निरीक्षक श्री.संदेश केंजळे, शिरुर पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलिस हा तपास करत आहेत.
