
Shirur Accident News : शिरूरमध्ये अष्टविनायक महामार्गावर अपघात; युवक गंभीर जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.
Shirur Accident News
📅 दिनांक: 14 जुलै 2025
🖊️ वार्ताहर | सत्यशोधक न्यूज | शिरूर |
Shirur Accident News : शिरूरच्या अष्टविनायक महामार्गावर झालेल्या अपघातात युवक गंभीर जखमी. आरोपीविरुद्ध 499/2025 अन्वये गुन्हा दाखल. तपास शिरूर पोलिसांकडून सुरू.
शिरूर तालुक्यातील कवठे यमाई ते इचकेवाडी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला असून आरोपीविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सचिन विलास इचके (वय 30 वर्ष, रा. वडगाव रोड, मुळ रा. इचकेवाडी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 13 जुलै 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजता ते त्यांचा मित्र योगेश विठ्ठल ननवरे याच्यासह पायी घरी जात होते. दरम्यान कवठे यमाई ते इचकेवाडी मार्गावर अचानक एम.एच. 12 आर.डी. 2212 या क्रमांकाची मोटारसायकल मागून येऊन योगेश याला जोरात धडकली. या धडकेमुळे त्याला गंभीर स्वरूपाच्या तसेच साध्या जखमा झाल्या.
अपघात घडल्यानंतर मोटारसायकल चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळ सोडले. आरोपी प्रशांत प्रकाश इथके (रा. इचकेवाडी, कवठे यमाई) याने रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणाने वाहन चालवले, असा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी भा. न्या. संहिता 2023 चे कलम 281, 125(A), 125(8) आणि मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
▪️गुन्हा रजि. नं.: 499/2025
▪️तपास अधिकारी: पो. हवा बनकर
▪️दाखल अधिकारी: पो. हवा मोरे
पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपीच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी रहदारीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.
🔗 अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना••••
महाराष्ट्र पोलीस – अधिकृत संकेतस्थळ
BNS 2023 कलमे संपूर्ण माहिती (LiveLaw)
ट्रॅफिक नियम व सुरक्षा मार्गदर्शक (India.gov.in)
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या वाचा खालील लिंकवर क्लिक करून ••••
News Police Action: शिरूर पोलिसांची कारवाई : मंडप डेकोरेटर्स चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश !
Your network, your earnings—apply to our affiliate program now! https://shorturl.fm/ft3z2