
Shirur Accident News Bypass : शिरूर बायपासजवळ वेगवान ट्रकची इनोव्हा गाडीला जोरदार धडक !
Shirur Accident News Bypass :अपघातात एकाच कुटुंबातील दोघे जखमी!
Shirur Accident News Bypass 21 May:
(Satyashodhak News Report )
Shirur Accident News Bypass:शिरूर तारिख. २० मे २०२५) रोजी शिरूर शहराच्या बायपास रोडवर, रिलायन्स पंपाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास एक दुर्दैवी अपघात घडला. ‘Shirur Accident News Bypass या विषयांतर्गत आलेली ही गंभीर घटना, वेगात आलेल्या ट्रकने इनोव्हा गाडीला धडक दिल्याने घडली. यामध्ये एका कुटुंबातील दोन सदस्यांना दुखापत झाली आहे.या
सिराहीम शेख ,वय -२६ यांनी दिली फिर्याद—
अपघाताबाबत अखिल सिराहीम शेख (वय २६ वर्षे, रा. एकनाथ नगर, केडगाव, ता. अहिल्यानगर, जि. अहिल्यानगर) यांनी शिरूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, ते आणि त्यांचे कुटुंब पुणे-नगर महामार्गाने प्रवास करत असताना, रात्री १२:०५ वाजता त्यांच्या वडिलांच्या नावावरील टोयोटा इनोव्हा (MH 16 DS 9735) गाडीला शिरूर बायपासजवळ ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली.
आरोपी अजिनाथ उत्तम चव्हाण—-
अपघात घडवणारा आरोपी अजिनाथ उत्तम चव्हाण (वय २७, रा. बारापट्टा लाड, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) याने चालवत असलेली टाटा कंपनीची गाडी (MH 04 JU 3301) अतिवेगात आणि बेदरकारपणे चालवली गेली. या अपघातात अखिल शेख यांचे वडील सिराहीम मिनू शेख आणि आई मजदुल सिरहीम शेख यांना गंभीर व किरकोळ दुखापती झाल्या.
शिरूर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल —-

या प्रकरणी गुन्हा र. नं. 347/2025 भारतीय दंड संहिता कलम 281, 125(a),(b), 324(4), तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी ASI साबळे यांच्याकडे आहे, तर दाखल अंमलदार पोलीस हवालदार राऊत आहेत.
या घटनेमुळे ‘Shirur Accident New Bypass अंतर्गत शहरात पुन्हा एकदा रस्त्यावरील वेग आणि निष्काळजीपणामुळे अपघातांची भीती व्यक्त होत आहे.
शहरातील रहदारीची स्थिती आणि रस्त्यावरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत अधिक माहितीसाठी वाचा:
महाराष्ट्र राज्य पोलीस वाहतूक पोर्टल
वाचकांसाठी अपील—-
अपघात झालेल्या कुटुंबीयांना मदतीची गरज आहे. प्रशासनाने आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करून अशा घटनांना आळा घालण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
आणखीन बातम्या वाचा इथे…
Nokariche Amish 24 lakhanchi Fasavanuk:सरकारी नोकरीचे अमिष दाखवून २४ लाखांचा गंडा महिलेकडुन !
शिरूर: तांबे वस्ती येथील घरफोडी प्रकरण, 2.80 लाख रुपयांचा ऐवज चोरीला