
Contents
- 1 Shirur Bhangar Ghotala : शिरुरमधील भंगार साहित्य घोटाळा (30 लाख रुपये) : कोण जबाबदार? तीन वेळा चोरी, अनेक आंदोलनं, तरीही प्रशासन मौन!
Shirur Bhangar Ghotala : शिरुरमधील भंगार साहित्य घोटाळा (30 लाख रुपये) : कोण जबाबदार? तीन वेळा चोरी, अनेक आंदोलनं, तरीही प्रशासन मौन!
Shirur Bhangar Ghotala Chori ?
दिनांक 23 जुन 2025 | प्रतिनिधी |
Shirur Bhangar Ghotala: शिरुर शहरातील नगरपरिषदेकडील भंगार साहित्य गायब होण्याच्या प्रकाराने खळबळ उडवली आहे. ‘Shirur Bhangar Ghotala’ या घोटाळ्यात अनेक राजकीय व प्रशासकीय पातळीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
शिरुर भंगार घोटाळा : भ्रष्टाचाराचा अजून एक नमुना—
शिरुर नगरपरिषदेमध्ये एक गंभीर व चर्चेचा विषय बनलेला म्हणजे “Shirur Bhangar Ghotala”. जिजामाता उद्यानासमोरील शाळेच्या पटांगणात अनेक वर्षांपासून जप्त केलेले नगरपरिषदेचे वाहन व साहित्य पडले होते. त्यामध्ये छोटा हत्ती (Tata Ace), ट्रॅक्टर ट्रॉली, बांधकाम व पाणी पुरवठा विभागाचे साहित्य, बाके, लोखंडी पाईप, आणि टपऱ्या आदींचा समावेश होता.
या साऱ्या भंगार साहित्याच्या सुरक्षिततेसाठी पारधी समाजातील बच्चू भोसले याच्या कुटुंबासह नियुक्ती करण्यात आली होती. मात्र तत्कालीन मुख्याधिकारी ॲड. प्रसाद बोरकर यांच्या कार्यकाळात अचानक संपूर्ण साहित्य गायब झाले.
संदिग्ध भूमिका आणि तक्रारीचा शोध—-
या प्रकारावर नागरिकांनी आवाज उठवताच बोरकर साहेबांनी भंगार दुसऱ्या जागी स्थलांतरित केल्याचे सांगितले. मात्र महिबूब सय्यद, अनिल बांडे, अविनाश घोगरे, रवि लेंडे यांनी शिरूरमधील सर्व नगरपरिषद जागांवर आठवडाभर तपासणी केली. त्यात कुठेही हे साहित्य सापडले नाही.
दुसऱ्यांदा विचारणा केली असता बोरकर यांनी चोरी झाल्याचे सांगून पोलिसांत तक्रार दिल्याचे सांगितले. मात्र FIR ची प्रत मागूनही दिली गेली नाही. जेव्हा यंत्रणेमार्फत ती मिळवण्यात आली तेव्हा ते दुसऱ्याच घटनेविषयीचे FIR असल्याचे स्पष्ट झाले.
राजकीय व प्रशासकीय हातभार?—-
या घटनेमागे काही प्रशासकीय आणि राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याचे पुढे आले. त्यामुळे आंदोलनाशिवाय पर्याय नव्हता. आंदोलनादरम्यान चौकशी समिती नेमण्यात आली व १५ दिवसात अहवाल देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र नंतर काहीच कारवाई झाली नाही.
नंतर नव्याने एक घटना घडली – मारुती आळी येथील मुख्याधिकारी निवासातील गाळ्यातून पुन्हा चोरी. रात्री ३ वाजता लोखंडी पाईप चोरीस गेले. पाणी पुरवठा विभागाचे खोदकाम करणाऱ्यांना दारू देऊन भंगार गोडाऊनमध्ये पाईप टाकण्यात आले. काहींनी याचा व्हिडीओ चित्रीत केला होता, पण त्यांनाही ‘मॅनेज’ करण्यात आले.
प्रशासनातील निष्काळजीपणा व आंदोलनांचा इतिहास—-
या प्रकरणात एकूण तीन वेळा चोरी झाली. चौकशी समितीही फक्त कागदावरच राहिली. एकापाठोपाठ एक अधिकारी बदलत गेले – बोरकर साहेब गेले, काळे मॅडम आल्या आणि गेल्या, आता पाटील साहेब आले. सर्वांनी आश्वासने दिली पण कृती नाही.
“Shirur Bhangar Ghotala” चा मुद्दा मुळापासून गडद झाला, कारण अंदाजे ३० लाख रुपयांच्या मालमत्तेचा घोटाळा होता. आंदोलनकर्त्यांवर खोट्या केस, धमक्या, गुन्हे दाखल करण्यात आले, तरीही ते डगमगले नाहीत.
उपोषण, पुरावे आणि संयमाचा संघर्ष—–
या प्रकरणात सातत्याने महिबूब सय्यद (उपाध्यक्ष मनसे पुणे जिल्हा), अनिल बांडे (शिरूर प्रवासी संघ), अविनाश घोगरे (तालुका संघटक मनसे), संदीप कडेकर (माजी शहराध्यक्ष), ॲड. आदित्य मैंड (मनसे शहराध्यक्ष), रवि लेंडे (जनहित कक्ष प्रमुख) यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
प्रत्येक वेळी बैठकांचे आश्वासन, कारवाईचे आश्वासन दिले गेले पण कार्यवाही शून्य. या सगळ्याचा सामना करताना आंदोलनकर्त्यांनी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
“ढेकणासाठी गोधडी जाळायची!” – संकल्पामागील जिद्द—–
या सर्व परिस्थितीवर आमचे मार्गदर्शक रविंद्र बाप्पू सानप म्हणतात,
“ढेकणासाठी गोधडी जाळायची” – म्हणजे भ्रष्टाचार संपवण्यासाठी कितीही मोठं नुकसान झालं तरी त्याला सामोरे जायचे.
शेवटी प्रश्न उपस्थित राहतो—-
👉शिरूर नगरपरिषदेतील हा भंगार नेमका कुठे गेला?
👉तीन वेळा चोरीचा प्रकार घडूनही मुख्य आरोपी कोण?
👉प्रशासनाची कारवाई कधी होणार?
👉जनतेच्या मालमत्तेची जबाबदारी कोण घेणार?
निष्कर्ष —-
जनतेचा आवाज हा शेवटीच खरा न्याय!
“Shirur Bhangar Ghotala” केवळ एका शहराचा घोटाळा नाही, तो हीन व्यवस्थेचा आरसा आहे. ज्या लोकप्रतिनिधींनी व प्रशासकांनी पारदर्शक कारभार करावा अशी अपेक्षा होती, त्यांनीच या विषयावर मौन बाळगले. आजही या प्रकरणात शिरूरकर जनतेला न्याय मिळालेला नाही.
या बातमीचा उद्देश आहे – हक्कासाठी झगडणाऱ्या लोकांचा संघर्ष सर्वांपर्यंत पोहोचवणे आणि प्रशासनासह राजकारणाला जबाबदार धरणे!
आणखीन माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना ••••
https://sarkarnama.in https://marathinews.live
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंकवर क्लिक करून —
Shirur News : दोन मोटरसायकल चोरीला, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल