
Contents
Shirur Breaking News : शिरुरच्या समर्थ पिझ्झा दुकानासमोरून मोटारसायकल चोरी !
Shirur Breaking News Burud Ali Motor Cycle
दिनांक : १४ जुलै २०२५ | प्रतिनीधी |
Shirur Breaking News: शिरूरमध्ये पिझ्झा दुकानासमोरून होंडा शाईन मोटरसायकल चोरीची घटना. अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल. पोलिसांचा तपास सुरू. संपूर्ण माहिती शिरूर वार्ता वर वाचा.
शिरूर शहरात पुन्हा एकदा वाहनचोरीची घटना समोर आली आहे. जिजामाता गार्डनजवळील समर्थ पिझ्झा दुकानासमोर पार्क केलेली होंडा शाईन मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार शिरूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
🔍 घटनेचा तपशील —-
🧊 गुन्हा क्रमांक : 498/2025
🧊 कायदा कलम : भारतीय दंड संहिता 2023 चे कलम 303(2)
🧊 तक्रारदार : यश संतोष गायकवाड (वय २५ वर्ष), व्यवसाय – फोनपे ऑपरेटर, रा. बुरुड आळी, शिरूर
🧊 घटनेचा दिनांक आणि वेळ : 12 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 7:50 ते 8:15 वाजण्याच्या दरम्यान
🧊 ठिकाण : समर्थ पिझ्झा दुकानासमोर, जिजामाता गार्डन, शिरूर
🛵 चोरी गेलेली मालमत्ता —-
मोटारसायकल – होंडा शाईन, काळ्या रंगाची
नंबर – MH 12 QV 4486
चेसी नंबर – ME4JC65AFJ7104839
इंजिन नंबर – JC65E72161936
मुल्य – अंदाजे ₹20,000
👁️🗨️ घटनेची हकीकत —-
तक्रारदार यश गायकवाड यांनी 12 जुलै रोजी संध्याकाळी आपल्या मोटारसायकलची पार्किंग समर्थ पिझ्झा समोर केली होती. ते मोमोज घेण्यासाठी काही वेळ दुकानात गेले आणि परत आल्यावर मोटरसायकल तिथे नव्हती. अनेक ठिकाणी शोध घेतला पण ती मिळून आली नाही. त्यामुळे अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
👮 पोलीस कारवाई —-
गुन्ह्याची नोंद पो.ह.वा. भगत यांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
📢 शहरवासीयांना आवाहन —-
या संदर्भात कोणालाही माहिती असल्यास शिरूर पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना•••••
🔗
https://citizen.mahapolice.gov.in
https://www.vehiclesearch.nic.in
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा खालील लिंकवर क्लिक करुन•••
Online Fraud News : शिरूरमध्ये ऑनलाइन फसवणूक – नागरिकाच्या खात्यातून 1 लाख रुपये लंपास !