
Contents
- 1 Shirur Breaking News: शिरुरमध्ये पेट्रोल चोरांचा थरार! cctv मध्ये कैद झाली चोरी, पोलीसांना फसवून अंधारात पसार
- 2 Shirur Breaking News:शिरुरमध्ये पेट्रोल चोरांचा थरार! तीन दुचाकी व पायातील चला सोडुन चोरटे पळाले !
- 2.1 घटना कशी उलगडली?
- 2.2 एका जागरूक नागरिकाने CCTV स्क्रीनवर संशयास्पद हालचाली पाहिल्या. चोरी थेट त्यात दिसताच त्याने तातडीने पोलीसांना फोन केला. चोरटे पूर्ण तयारीने आले होते – तोंडावर फडकी बांधलेली, तीन दुचाकींसह आले होते आणि काहीजण रस्त्याच्या जवळ गस्त घालत होते. चार चोरटे गाड्यांमधून पेट्रोल काढून बाटल्यांमध्ये भरत होते.
- 2.3 पोलिसांचं उशिराने आगमन-
- 2.4 CCTV फुटेज तपास आहे रखडला—-
- 2.5 वसाहतीत भीतीचं वातावरण—
- 2.6 About The Author
Shirur Breaking News: शिरुरमध्ये पेट्रोल चोरांचा थरार! cctv मध्ये कैद झाली चोरी, पोलीसांना फसवून अंधारात पसार
Shirur Breaking News:शिरुरमध्ये पेट्रोल चोरांचा थरार! तीन दुचाकी व पायातील चला सोडुन चोरटे पळाले !
शिरुर, रामलिंग रोड ,दिनांक 14 मे 2025: (खास ‘सत्यशोधक न्युज’ रिपोर्ट )

Shirur Breaking News:शिरुर शहरातील प्रमोद प्रेम पार्क वसाहतीत मध्यरात्री झालेल्या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडवली आहे. रात्री 2.33 ते 2.46 या वेळेत, 8 ते 10 जणांच्या टोळीने दुचाकी व चारचाकी वाहनांचे पेट्रोल चोरण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
आहे.पहा बातमी सविस्तर. .
घटना कशी उलगडली?
एका जागरूक नागरिकाने CCTV स्क्रीनवर संशयास्पद हालचाली पाहिल्या. चोरी थेट त्यात दिसताच त्याने तातडीने पोलीसांना फोन केला. चोरटे पूर्ण तयारीने आले होते – तोंडावर फडकी बांधलेली, तीन दुचाकींसह आले होते आणि काहीजण रस्त्याच्या जवळ गस्त घालत होते. चार चोरटे गाड्यांमधून पेट्रोल काढून बाटल्यांमध्ये भरत होते.
पोलिसांचं उशिराने आगमन-

पोलिसांचं वाहन गेटजवळ पोहोचताच एक चोर इतर चार चोरांना इशारा देण्यासाठी धावला. त्या क्षणी सर्व चोर एकदम दुचाकी टाकून अंधारात पसार झाले. दोन दुचाकी पोलीसांनी ताब्यात घेतल्या असून एक अजूनही तिथेच उभी आहे. घटनास्थळी तीन चोरट्यांच्या सहा चपला पडून होत्या.
CCTV फुटेज तपास आहे रखडला—-
CCTV फुटेज मधे 2.33 ते 2.46 या दरम्यानचा सर्व घटनाक्रम दिसत आहे. पूर्ण घटना रेकॉर्ड झाली आहे. दुर्दैव म्हणजे, जर एक जरी चोर पोलिसांच्या तावडीत सापडला असता, तर टोळीचा उलगडा शक्य होता. पोलिसांची गाडी उघडण्यात थोडा उशीर झाल्यामुळे चोर पळून जाण्यात यशस्वी झाले.
वसाहतीत भीतीचं वातावरण—
या घटनेनंतर प्रमोद प्रेम पार्क वसाहतीत घबराट निर्माण झाली आहे. नागरिकांनी पोलिसांकडे CCTV फुटेजची सखोल तपासणी व चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी केली आहे.
आणखीन वाढत्या सारख्या बातम्या…
शिरूर: २३ वर्षीय तरुण अभिषेक खंडागळे बेपत्ता, पोलीसांत तक्रार दाखल
3 Vahanancha Bhishan Apghat:न्हावरा-केडगाव रोडवर घोडगंगा कारखान्याजवळ तीन वाहनांचा भीषण अपघात.
Shirur Electricity Office: Chori शिरूर वीज वितरण कार्यालयातून ३२ हजारांचा माल चोरट्याने चोरून नेला !