
Contents
- 1 शिरूर चोरी 2025:शिरूर तालुक्यात मोठी चोरी! मलठण येथील शेतमालकाच्या घरातून तब्बल 49,400 रुपयांचा ऐवज चोरीस
शिरूर चोरी 2025:शिरूर तालुक्यात मोठी चोरी! मलठण येथील शेतमालकाच्या घरातून तब्बल 49,400 रुपयांचा ऐवज चोरीस
शिरूर चोरी 2025:शिरूर तालुक्यात मोठी चोरी:बंद असलेल्या शेतमालकीच्या घरात चोरी.
शिरुर,3 मे 2025: (कल्पना पुंडे यांच्याकडुन)
शिरूर चोरी 2025:पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एक मोठी चोरीची घटना उघडकीस आली आहे. मलठण येथील शेतकरी महेंद्र भिमाजी राजगुरू यांच्या बंद असलेल्या शेतमालकीच्या घरात अज्ञात चोरट्यांनी जबरदस्त चोरी केली असून तब्बल 49,400 रुपयांचा माल लंपास करण्यात आला आहे.
चोरीचे संक्षिप्त विवरण पुढीलप्रमाणे—
ही घटना 1 मे ते 2 मे 2025 या दरम्यान घडली आहे. फिर्यादी महेंद्र राजगुरू (वय 64) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ते 1 मे रोजी सकाळी 7.30 वाजता आपल्या मलठण येथील गट नंबर 189 मधील बंद घरात पाहणी करून परतले. परंतु 2 मे रोजी सकाळी 10.30 वाजता परत गेल्यानंतर घराच्या मागील दरवाजाचा पत्रा उचकटलेला दिसला. घरातील कपाटे उघडी होती व अनेक वस्तू अस्ताव्यस्त होत्या.
चोरीस गेलेल्या वस्तू–
• पिठाची गिरणी, प्रेशर मोटार, गॅस शेगड्या, स्टील व अॅल्युमिनियम हांड्या
• पाण्याच्या 5 HP व 3 HP मोटारी
• भारत कंपनीच्या दोन सिलेंडर टाक्या
• संसारोपयोगी भांडी व मुलाचे कागदपत्र असलेली बॅग
• काळ्या रंगाचा ताडपत्री कागद
एकूण किंमत: 49,400 रुपये
तपास:
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार बनकर करीत असून, पो.ह. भोते यांनी नोंद घेतली आहे. प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे कार्यरत आहेत.
पुढील कार्यवाही—
शिरूर पोलीस स्टेशनने भारतीय दंड विधानाच्या कलम 331(3), 331(4), 305 अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गावकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण असून, पोलिसांनी तपासासाठी परिसरातील CCTV तपासण्यास सुरुवात केली आहे.
——-
खास वैचारिक भेट. ..
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३३ मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स….
• ‘ हयवदन’…..
• बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण…
• शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ …
• ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…