
Contents
Shirur Crime शिरुर मधे मोटर सायकल चोरीचा ‘सिलसिला’ च जणु सुरु !
Shirur Crime एक मोटर सायकल जुन्या कोर्टाच्या जवळुन तर दुसरी बस स्थानकाजवळ चोरीला !
Shirur 23 February 2025 :
( Satyashodhak News Report )

Shirur Crime शिरुर मधे मोटर सायकल चोरीचा ‘सिलसिला’ च जणु सुरु झाला आहे.लागोलाग दोन व्यक्तींच्या दोन मोटर सायकल चोरीला गेल्या आहेत. त्यापैकी Shirur Crime एक मोटर सायकल जुन्या कोर्टाच्या जवळुन तर दुसरी बस स्थानकाजवळ चोरीला गेली आहे. दोनही ठिकाणे अलीकडील काळात गुन्हेगाराला सोपी अशी झाली आहेत.असे दिसते. या दोन्ही परिसरात बेकायदेशीर दारू, बेकायदेशीर गुटका विकणे, मटका क्लब चालवणे, बेकायचा वेश्या व्यवसाय करणे असे प्रकार इथे रासरोजपणे चालु आहेत. शिरुर पोलिस या घटनांचा तपास करत आहेत.
Read more>>
Shirur Crime घटना – 1
घटना अशी की तारिख 20/02/2025 रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या ते दुपारी 2:00 वाजण्याच्या सुमारास शिरूर गावच्या हददीत जुन्या कोर्टाच्या पार्किग मध्ये हँडल लॉक करून पार्क केलेली काळया व राखाडी रंगाची हिरो कंपनीची पॅशन प्रो गाडी नं एम पी 15 एम एस 2245 ही मोटार सायकल लक्षात ठरली.ती कोणीतरी आज्ञात चोरटयाने अप्रामाणीक पणे , मुददाम लबाडीचे इरादयाने चोरी करून चोरून नेली आहे.
Shirur Crime ची शिरुर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार —
म्हणुन फिर्यादी पाटील बुवा आनंदराव पडवळ, वय -59 वर्ष ,व्यावसाय- खाजगी नोकरी, ( वकिलांचा कारकून ) राहणार – सविंदणे, तालुका- शिरूर यांनी आज्ञात चोरटया विरूदध शिरुर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
Read more>>
फिर्यादी —
पाटील बुवा आनंदराव पडवळ, वय -59 वर्ष ,व्यावसाय- खाजगी नोकरी, ( वकिलांचा कारकून ) राहणार – सविंदणे, तालुका- शिरूर , जिल्हा- पुणे.
शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा . रजिस्टर नंबर- . -123/2025 असा आहे. तर अज्ञात चोरटया विरूद्ध भारतीय न्याय संहीता कायदा कलम
303 (2) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल अमंलदार श्री. पोलीस हवालदार श्री. मोरे हे आहेत. पुढील तपास अमंलदार पोलिस हवालदार श्री. खेडकर करत आहेत.
Shirur Crime घटना – 2
या दुसर्या घटनेत 19/2/2025 रोजी रात्री 9:00 वाजण्याच्या ते 10:00 वाजण्याच्या सुमारास शिरूर गावच्या हदीत एस टी स्टँड च्या मागील बाजुस कंपाउंड भिंतीच्या जवळ, नविन शिरूर पोलीस स्टेशन बांधकामा समोर हँडल लॉक करून पार्क केलेली होती. ती लाल रंगाची हिरो कंपनीची एच एफ डिलक्स गाडी नं एम एच 16 बी क्यु 6932 ही होती. ती मोटार सायकल कोणीतरी आज्ञात चोरटयाने अप्रामाणीक पणे मुददाम लबाडीचे इरादयाने चोरी करून चोरून नेली आहे.
Read more>>
Shirur Crime मोटर सायकल चोर अज्ञात !
म्हणुन फिर्यादी संभाजी बबन कुटे , वय – 46 वर्षे व्यवसाय -नोकरी ,राहणार- बाबुराव नगर, शिरूर, तालुका- शिरूर ,जिल्हा-पुणे यांनी
आज्ञात चोरटया विरुदध शिरुर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी – —
संभाजी बबन कुटे ,वय- 46 वर्षे, व्यवसाय- नोकरी ,राहणार- बाबुराव नगर ,शिरूर ,तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे
अज्ञात चोरटया विरूदध शिरुर पोलिस स्टेशनमध्ये
गुन्हा रजिस्टर नंबर 122/ 2025 असा आहे.
तर भारतीय न्याय संहीता कायदा कलम – 303 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल अमंलदार पोलीस हवालदार श्री. मोरे हे आहेत.पुढील तपास अमंलदार पोलिस हवालदार श्री. शिंदे हे आहेत.
Read more>>
प्रभारी आधिकारी, पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे , शिरुर पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही चोर्यांचा तपास सुरु आहे.
एकंदरीत Shirur Crime शिरुर शहरात चोरटयांचा सुळसुळाट झाला आहे. कधी moter cycle, कधी सोन्याचे मंगळसुत्र इ.चोरीच्या घटनांमधे लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे शिरुर पोलिसांची जबाबदारी वाढली आहे. तर नागरीक आपल्या स्वयंचलित वाहनांच्या बाबतीत काळजीत आहेत.