
नागरिकांनीही अशा अंमली पदार्थांचे सैवन टाळणे आवश्यक !
Contents
Kaikadi Ali Sucide News: कैकाडी आळीत गळफास घेऊन आत्महत्या?
Kaikadi Ali Sucide News :18 एप्रिल 2025 :
( Satyashodhak News Report)
Kaikadi Ali Sucide Newspaper:शिरूर शहरात कैकाडी आळी परिसरात आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आहे . कुंडलिक धोंडीभाऊ बोटे (वय- 58) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे.
सदर घटनेची सविस्तर माहिती—-
दिनांक 18 एप्रिल रोजी 3 वाजताच्या सुमारास सुनिता कुंडलिक बोटे या आपले स्वयंपाकाचे काम आटोपून घरी परतल्या. घरी पोहोचल्यावर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात शिरल्यावर त्यांना पती कुंडलिक बोटे हे घराच्या पत्र्याच्या अँगलला दोरीने गळफास घेत लटकलेले आढळले.
पोलिस घटनास्थळी दाखल—-
तत्काळ त्यांनी नातेवाईकांना फोनवरून माहिती दिली. नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत नातेवाईकांच्या मदतीने कुंडलिक बोटे यांना खाली उतरवले.त्यांना तत्काळ अॅम्ब्युलन्सद्वारे शिरूर ग्रामीण रुग्णालयात नेले.तेथील डॉक्टरांनी तपासून सकाळी 7.30 पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
शिरुर पोलिस ठाण्यामधे घटनेची नोंद—-
पत्नी सुनिता बोटे यांनी शासकीय रेकॉर्डप्रमाणे पोलिस ठाण्यात घटनेची नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस हवालदार श्री. शिंदे हे करत आहेत. पोलिस निरिक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे. या घटनेची नोंद पोलिस हवालदार श्री. बनकर यांनी केली आहे.
घटनेची मुलभूत माहिती अशी —-
• मयताचे नाव: कुंडलिक धोंडीभाउ बोटे (वय -58 वर्षे)
• राहणार: कैकाडी आळी, शिरूर, पुणे
• घटना दिनांक व वेळ: 18 एप्रिल 2025, सकाळी 7:30 पूर्वी
• मृत्यूचे कारण: गळफास
• खबर देणारी: सुनिता कुंडलिक बोटे (पत्नी)
ही घटना केवळ एका कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी एक धक्का देणारी आहे. मानसिक आरोग्य, तणाव, आणि कुटुंबीयांच्या संवादाचे महत्त्व यावर ही घटना प्रकाश टाकते.