
Contents
- 1 Shirur Crime News Kanhur Mesai: कोकरूच्या कारणावरून तलवारीनं हल्ला; शेतकऱ्यावर जीवघेणा प्रहार
Shirur Crime News Kanhur Mesai: कोकरूच्या कारणावरून तलवारीनं हल्ला; शेतकऱ्यावर जीवघेणा प्रहार
Shirur Crime News Kanhur Mesai:शिरूर तालुक्यातील कानुर मेसाई येथील घटना!
Shirur Crime News Kanhur Mesai 21 May 2025:
( Satyashodhak News Report )
Shirur Crime News Kanhur Mesai:शिरूर तालुक्यातील कानुर मेसाई गावात पुन्हा एकदा हिंसक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील एक शेतकरी व मेंढपाळ सोमनाथ रघुनाथ रुपणेर (वय ३५) यांच्यावर तलवारीसारख्या कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
रावडेवाडी गावच्या हद्दीत घडली घटना —
ही घटना १८ मे २०२५ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता रावडेवाडी गावच्या हद्दीत, प्रदीप तांबे यांच्या शेतात घडली. फिर्यादी रुपणेर हे आपल्या बायको आणि मुलांसह शेतातील वाघुरीजवळ झोपलेले असताना, गावातील आरोपी अमोल उर्फ युवराज लक्ष्मण तांबे (रा. रावडेवाडी, ता. शिरूर) याने अचानक येत वाघुरीतून कोकरू उचलून घेतले.
हल्ल्याची कारणमीमांसा—
फिर्यादीने आरोपीला कोकरू खाली ठेवण्यास सांगितले असता, आरोपीने रागाच्या भरात कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात रुपणेर यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून कपाळालाही जखम झाली आहे. बायको सुमन यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांनाही धमकी दिली आणि शिवीगाळ केली. इतकंच नव्हे तर पोलिसांत तक्रार दिल्यास “तुला जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी दिली.
पोलीस कारवाई—-

शिरूर पोलीस स्टेशन
या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी १९ मे २०२५ रोजी सायंकाळी ६:५९ वाजता शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा नोंद क्र.: 344/2025
कलमे: भा.दं.वि. 118(2), 352, 351(2), 351(3)
दाखल अंमलदार: पो. हवा वारे
तपास अधिकारी: HC आगलावे
या घटनेमुळे Shirur Crime News Kanhur Mesai या भागात चिंता आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
आपल्यासाठी उपयुक्त माहिती खाली क्लिक करून मिळवा —
पुणे ग्रामीण पोलिसांची अधिकृत वेबसाइट
गावकऱ्यांसाठी कायदेशीर मदत व सल्ला – महाराष्ट्र पोलीस
आणखीन बातम्या वाचा खालील लिंक वर क्लिक करून —
‘Operation Sindoor Shirur Rally’ तिरंगा पदयात्रा निघणार शिरूरकरांकडुन !
Baburavnagar 1 Year’s Old Child Dead :बाबूरावनगरमध्ये १ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू!