
Contents
- 1 Shirur Crime News:शिरुरच्या एसबीआय चौकात कोयता दाखवुन दमदाटी ?
- 1.1 Shirur Crime News: कोयता दाखवुन दमदाटी करणारे अज्ञात !
- 1.2 Shirur Crime News सविस्तर घटना अशी आहे—-
- 1.3 कोयता घेऊन समोर आले ?—
- 1.4 भारतीय हत्यार कायदा कलमाप्रमणे गुन्हा दाखल —-
- 1.5
- 1.6 खास भेट:
Shirur Crime News:शिरुरच्या एसबीआय चौकात कोयता दाखवुन दमदाटी ?
Shirur Crime News: कोयता दाखवुन दमदाटी करणारे अज्ञात !
Shirur Crime News 31 March: (Satyashodhaknews News Report)
Shirur Crime News:शिरुरच्या एसबीआय चौकात कोयता दाखवुन एका व्यावसायिकास दमदाटी करण्यात आली आहे.
कोयता दाखवुन दमदाटी करणारे अज्ञात इसम आहेत.शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत. सविस्तर बातमी पुढे वाचा…
Read more >>
ब्रेकिंग न्यूज: १० वर्षाच्या मुलीचे अपहरण; शिरुर पोलिसांची जलद कारवाई, तीन आरोपी अटकेत!
Shirur Crime News
सविस्तर घटना अशी आहे—-
दिनांक 30 मार्च 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास शिरूर मधील एसबीआय चौक ,तालुका -शिरूर जिल्हा -पुणे येथे फिर्यादी
फिर्यादी भाऊसाहेब ताराचंद जाधव वय- 36 वर्षे, व्यवसाय -ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर, राहणार- पळवे बुद्रुक ,तालुका- पारनेर ,जिल्हा- अहिल्यानगर यांची क्रेटा गाडी नंबर एम एच 12 एस के 5666 मधून ते शिरूर येथील बोरा हॉस्पिटल येथे जात होते.
Read more >>
Breaking News : तब्बल 75 लाख 48 हजार रुपये किंमतीची गोवा दारु व टेंपो त्याच्या चालकासह पकडला !
कोयता घेऊन समोर आले ?—
त्यांच्या क्रेटा गाडी समोर अज्ञात मोटार सायकल वरील अज्ञात इसम (नाव पत्ता माहित नाही) याने काही कारण नसताना फिर्यादी यांच्या क्रेटा गाडी समोर रस्त्यांमध्ये त्याची मोटरसायकल उभी केली. फिर्यादी यांची गाडी थांबवून मोटरसायकल वरून खाली उतरले. त्याच्या सीटा खाली असलेला कोयता घेऊन फिर्यादी यांच्या गाडी जवळ आले. फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी केली .
भारतीय हत्यार कायदा कलमाप्रमणे गुन्हा दाखल —-

म्हणुन फिर्यादीने शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल केला आहे.भारतीय न्याय संहिता कायदा कलम 126(2 )352,351(2)(3) व भारतीय हत्यार कायदा कदम 4, 25 प्रमाणे अज्ञात इसमाविरुद्ध शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more >>
खास भेट:
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २८ मध्ये काय वाचाल ..👇
• भविष्यातील धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज रहा – डा.उमेश बगाडे!
• काम्ब्रेड शरद पाटील यांची सौदर्यशास्त्र संदर्भातील मांडणी….
• कांब्रेड शरद पाटील यांची ग्रंथ संपदा कोठे मिळेल ?.👇
दाखल अमलदार सहायक पोलीस निरिक्षक श्री. बनकर हे आहेत.पुढील तपास
पोलीस हवालदार श्री. जगताप हे करत आहेत.
प्रभारी अधिकारी पोलीस निरिक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.