
Contents
- 1 Shirur Crime News:शिरुरच्या नक्षत्र सोसायटीजवळ एकास मारहाण व जीवे मारण्याची धमकी !
- 1.1 Shirur Crime News:महापुरूषावद्दल अपशब्द वापरल्याचा राग होता ?
- 1.2 Shirur Crime News: सविस्तर घटना अशी आहे—-
- 1.3 ‘भीमसेना महाराष्ट्र ग्रुप’ वर बाबासाहेबांबद्दल अपशब्द वापरले?—
- 1.4 शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल—
- 1.5
- 1.6 खास भेट:
Shirur Crime News:शिरुरच्या नक्षत्र सोसायटीजवळ एकास मारहाण व जीवे मारण्याची धमकी !
Shirur Crime News:महापुरूषावद्दल अपशब्द वापरल्याचा राग होता ?
Shirur Crime News 31March 2025:
(Satyashodhak News Report)
Shirur Crime News:शिरुरच्या नक्षत्र सोसायटीजवळ एकास मारहाण व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. कारण
महापुरूषावद्दल अपशब्द वापरल्याचा राग होता ,असे समजते.शिरूर पोलिस पुढील तपास करत आहेत. सविस्तर बातमी पुढे वाचा. .
Shirur Crime News:
सविस्तर घटना अशी आहे—-

दिनांक 30 मार्चर 2025 रोजी सायंकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास शिरूरच्या हद्दीत शिरूर ते रामलिंग रोडवर नक्षत्र सोसायटीच्या नवीन बांधकामाच्या शेजारी ही घटना घडली आहे. रोशन देवरे व इतर तिघेजण (त्यांचे नाव पत्ता माहिती नाही) यांनी मिळुन दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी फिर्यादी फिर्यादी वैभव संतोष भोसले ,वय -24 वर्षे, व्यवसाय -शिक्षण राहणार- पवार मळा, शिरूर ,तालुका -शिरूरयांच्या नावाचे फेक अकाउंट तयार केला.
‘भीमसेना महाराष्ट्र ग्रुप’ वर बाबासाहेबांबद्दल अपशब्द वापरले?—
त्या बद्दल टाकलेल्या पोस्टचा विषय मिटवण्यासाठी रोशन देवरे याने फिर्यादी यांना फोन करून घरी बोलवले.नंतर फिर्यादी त्या ठिकाणी गेले. रोशन देवरे यांच्यासोबत असलेल्या इसमा सोबत चर्चा करत असताना रोशन देवरे यांनी फिर्यादी यांना हाताने लाथाबुक्क्याने मारहाण केली.’ तुझा मोबाईल माझ्याकडे दे ! नाही तर तुला जिवंत ठेवत नाही’ असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली.
शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल—
रोशन देवरे सोबत आलेल्या पैकी एकाने लोखंडी रोडने फिर्यादीच्या उजव्या दंडावर मारले. दुसऱ्याने त्याचे बोटातील फायटरने फिर्यादीचे डोक्यावर उजव्या बाजूस मारले. दुखापत केली. तिसऱ्याने निळ्या रंगाच्या केबलने फिर्यादीच्या पाठीत मारहाण केली आहे.म्हणुन फिर्यादीने शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी –
वैभव संतोष भोसले, वय-24 वर्षे ,व्यवसाय- शिक्षण ,राहणार -पवार मळा ,शिरूर -तालुका- शिरूर ,जिल्हा -पुणे
आरोपी –
1) रोशन देवरे (पूर्ण नाव माहित नाहीत), राहणार- नाशिक (पूर्ण पत्ता माहीत नाही)
2) त्याच्या सोबत असणारे 3 अनोळखी इसम
शिरुर पोलिस स्टेशन मधे
गुन्हा रजिस्टर नंबर 220/2025 असा आहे.तर आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 118(1 )115(2)352,351(2)(3)3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खास भेट:
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २८ मध्ये काय वाचाल ..👇
• भविष्यातील धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज रहा – डा.उमेश बगाडे!
• काम्ब्रेड शरद पाटील यांची सौदर्यशास्त्र संदर्भातील मांडणी….
• कांब्रेड शरद पाटील यांची ग्रंथ संपदा कोठे मिळेल ?.👇
दाखल अमलदार सहायक पोलीस निरीक्षक श्री. बनकर हे करत आहेत. पुढील तपास
पोलिस हवालदार श्री. खेडकर हे करत आहेत.
प्रभारी अधिकारी पोलिस निरिक्षक श्री .संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.