
Contents
- 1 Shirur Crime News Nimone | निमोणे येथे शेताच्या वादातून ऊस चोरीचा प्रकार
- 1.1 Shirur Crime News Nimone |तीन जणांविरोधात गुन्हा दाखल!
- 1.1.1 घटना स्थळ व वेळ—
- 1.1.2 गुन्हा दाखल—
- 1.1.3 आरोपी—–
- 1.1.4 1. महादेव भगवान लाड
- 1.1.5 2. आरूणा नाना काळे
- 1.1.6 3. नाना सोनबा काळे सर्व रा. निमोणे, ता. शिरूर, जि. पुणे
- 1.1.7 हकिगत अशी—-
- 1.1.8 संबंधित उपयोगी माहिती खाली क्लिक करून मिळवा —
- 1.1.9 आणखीन बातम्या वाचा खालील लिंक वर क्लिक करून —
- 1.1.10 About The Author
- 1.1 Shirur Crime News Nimone |तीन जणांविरोधात गुन्हा दाखल!
Shirur Crime News Nimone | निमोणे येथे शेताच्या वादातून ऊस चोरीचा प्रकार
Shirur Crime News Nimone |तीन जणांविरोधात गुन्हा दाखल!
Shirur Crime News Nimone 20 May 2025:(Satyashodhak News Report )
Shirur Crime News Nimone : शिरूर तालुक्यातील निमोणे गावात शेतजमिनीच्या वादातून उभा ऊस तोडून चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. फिर्यादी सौ. ज्योती शिवाजी जाधव (वय 42 वर्षे, व्यवसाय शेती, मूळ रा. निमोणे, सध्या रा. विश्रांतवाडी, पुणे) यांच्या तक्रारीवरून शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घटना स्थळ व वेळ—
ही घटना 19 मे 2025 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास मौजे निमोणे, ता. शिरूर, जि. पुणे येथील गट क्रमांक 1064/1/अ या शेतजमिनीत घडली.
गुन्हा दाखल—

शिरूर पोलीस स्टेशन
गु.र. नं. 346/2025 भा.दं.वि. कलम 303(2), 329(3), 3(5) अन्वये दाखल करण्यात आलेला आहे.
आरोपी—–
1. महादेव भगवान लाड
2. आरूणा नाना काळे
3. नाना सोनबा काळे
सर्व रा. निमोणे, ता. शिरूर, जि. पुणे
हकिगत अशी—-
फिर्यादी सौ. जाधव यांनी पुण्यातून मूळगावी परत येत शेतजमिनीत पाहणी केली असता त्यांना स्वतःच्या एक एकर शेतात लावलेला 20 महिन्यांचा उभा ऊस तोडून चोरीस गेल्याचे आढळले. तसेच त्याठिकाणी नांगरणीही झालेली होती. शेजारील शेतकरी महादेव भगवान लाड यांच्याशी सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, जमिनीचे पूर्वीचे मालक आरूणा नाना काळे आणि नाना सोनबा काळे यांनी महादेव लाड यांना चोरी व नांगरट करण्यास मदत केल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे.
यामुळे तिघांविरुद्ध संगनमताने बेकायदेशीर प्रवेश करून मालकीचे पीक चोरल्याचा आणि नांगरट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
शेतकऱ्यांमध्ये जमिनीच्या मालकीसंबंधी वादांचे हे प्रकार वाढू लागले आहेत. ज्यावर स्थानिक प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
तपास अधिकारी: पो. हवा. टेंगले
दाखल अंमलदार: पो. हवा. राऊत
संबंधित उपयोगी माहिती खाली क्लिक करून मिळवा —
माहितीचा अधिकार कायदा 2005 – संपूर्ण मार्गदर्शक
पोलीसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया
टिप: Shirur Crime News Nimone या विभागात अशा प्रकारच्या ग्रामीण व गुन्हेगारी बातम्या आम्ही नियमितपणे प्रकाशित करतो. आमच्या पोर्टलला satyashodhak.blog वर भेट द्या.
आणखीन बातम्या वाचा खालील लिंक वर क्लिक करून —
शिरूर : आठ अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल – जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रात मारहाण आणि शिवीगाळ
3 Vahanancha Bhishan Apghat:न्हावरा-केडगाव रोडवर घोडगंगा कारखान्याजवळ तीन वाहनांचा भीषण अपघात.