
रांजणगाव एमआयडीसी पोलीस पकडलेल्या आरोपीसह !
Contents
- 1 Shirur Crime News: रांजणगाव पोलिसांना मोठी सफलता कोनती मिळाली आहे? ते वाचा सविस्तर…
- 1.0.1 Shirur Crime News Ranjangaon MIDC News
- 1.0.2 रांजणगाव गणपती पोलिसांना सफलता ( Shirur Crime News)
- 1.0.3 रांजणगाव गणपती एम आय डी सी तीन मोठ्या कंपणीचे 10 फ्रिज चोरीला…..
- 1.0.4 रांजणगाव गणपतीत व्हर्पुल ही प्रसिद्ध कंपनी….
- 1.0.5 रांजणगाव पोसिसांनी केला तांत्रीक पद्धतीने तपास…
- 1.0.6 रांजणगाव पोलिसांकडून तपास—
- 1.0.7 रांजणगाव पोलिसांबरोबर वरिष्ट पोलिस अधिकार्यांचा सहभाग….
- 1.0.8 अधिकारी व पोलिसांचा मोठा फौजफाटा होता….
- 1.0.9 रांजणगाव परिसरातील नागरिकांना दिलासा…
- 1.0.10 🌐 अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना•••••••
- 1.0.11 About The Author
Shirur Crime News: रांजणगाव पोलिसांना मोठी सफलता कोनती मिळाली आहे? ते वाचा सविस्तर…
Shirur Crime News Ranjangaon MIDC News
-
“Shirur Crime News: रांजणगाव एमआयडीसीतील जगप्रसिद्ध व्हर्लपुल कंपनीचे 10 फ्रिज चोरीप्रकरणी आरोपीस अटक करण्यात रांजणगाव पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. औद्योगिक सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आणि पोलिसांवरील टीकेच्या झगड्यातून यशस्वी झालेल्या या तपासामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पोलिसांचा तांत्रिक तपास, वरिष्ठ अधिकार्यांचे मार्गदर्शन आणि कार्यक्षम पथकामुळे हा गुन्हा उघडकीस आला आहे.”
दिनांक 12 मार्च 2024| सत्यशोधक न्युज|
रांजणगाव पोलिस आज एका मोठ्या सफलतेला उपलब्ध झाले आहेत. एम आय डी सी पोलिसांना मोठी सफलता मिळाली आहे.
रांजणगाव गणपती पोलिसांना सफलता ( Shirur Crime News)

रांजणगाव पोलिस आज महाराष्ट्रातील एक महत्वाचे पोलिस युनिट आहे.कारण तेथे अनेक राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंफन्यांचे अनेक महत्वाचे उत्पादन होत आहे. त्यामुळे तेथील औद्योगिक क्षेत्र असलेल्या भागातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी साहजीकच तेथील पोलिस युनिटसाठी महत्वाची आहे. उत्पादक कंफन्यासाठी महत्वाची आहे. अनेक देशांतील कंपन्या आणि त्यात काम करणारे कामगार यांची सुरक्षितता हा परदेशातील देशाच्या प्रतिमेला रंगवणारी असते.थेट परकी गुंतवणुकीवर परिणाम करणारी असते.
रांजणगाव गणपती एम आय डी सी तीन मोठ्या कंपणीचे 10 फ्रिज चोरीला…..
रांजणगाव पोलिस ठाणे हद्दीतील मोठी व जगभर ब्रन्ड असलेली एक कंपनी व्हर्लपुल कंपनी आहे.व्हर्पुल कंपनीतील 1,47,040 रुपये किंमतीचे 10 फ्रिज चोरणार्या आरोपीला आज अटक करण्यात रांजणगाव पोलिस यांना यश आले आहे.त्यामुळे हा आज एकच चर्चेचा विषय बनुन राहिला होता. आरोपी कोण व एवढे फ्रिज जे आकाराने मोठे असतात ते कशाप्रकारे वाहून नेले गेले असतील ?याबाबतीत तर्कवितर्क केले जात होते.रांजणगाव पोलिस टिकेचा विषयही बनले होते.
रांजणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिरुर तालुक्यातील व जगप्रसिध्द असणार्या रांजणगाव एम आय डी सी अर्थात रांजणगाव औद्योगिक एरिया ! इथे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आपले उत्पादन करत असतात . एक प्रकारे हा एक Global भाग बनला असुन पंचतारांकीत असा आहे. तेथील पोलीस स्टेशन हद्दित घडणार्या घटना देशभरात चर्चेचा विषय बनतात. कारण देशातील जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यातील एक तरी माणुस इथं कामाला किंवा व्यवसायानिमित्ताने वसलेला आहे.
रांजणगाव गणपतीत व्हर्पुल ही प्रसिद्ध कंपनी….
रांजणगाव पोलिस हद्दीत असलेल्या औद्योगिक क्षेत्रातील व्हर्पुल ही ख्यातनाम कंपनी आहे.या कंपनीतुन एक कंटेनर चालक बाळु राजेंद्र थोरे हा कंटेनर घेउन जात असताना त्यापैकी 161749 रुपयांचे 11 फ्रिच कंटेनरचे तोडुन फ्रिजची विक्री करुन फरार झाला होता. याची फिर्याद दिपक जोतीबा खैरे,वडगाव शेरी ,पुणे यांनी रांजणगाव पोलिस स्टेशनमध्ये दिली होती.त्यामुळे भा.दं.क.वि.381 नुसार कंटेनर चालकाविरुद्ध रांजणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला होता.15/2/2024 ला.
रांजणगाव पोलिस ठाण्यातील अधिकारी व पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी त्यांच्याकडील पोलीसांचे खास तपास पथक या कामगिरीसाठी तयार केले.त्यांना तपासाच्या आवश्यक त्या सुचना त्यांनी दिल्या.
रांजणगाव पोसिसांनी केला तांत्रीक पद्धतीने तपास…
रांजणगाव पोलिस तपास पथकातील पोलीस हवालदार वैजनाथ नागरगोजे, तेजस रासकर,व विजय शिंदे यांनी गुप्त बातमीदार व तांत्रीक पद्धतीने आरोपी व चोरीस गेलेला माल यांचा तपास सुरू केला.त्याचा परिणाम म्हणुन कंटेनर चालक बाळु राजेंद्र थोरे,वय-28 वर्षे,रा.तिंतरवाणी,ता.शिरुर कासार,जिल्हा-बीड यास अहमदनगर येथुन ताब्यात घेतले. दि.2/3/2024 ला.
रांजणगाव पोलिसांकडून तपास—
रांजणगाव पोलिस ठाण्यात आरोपीला पोलीस कोठडीत ठेवुन तपास केला गेला.तेव्हा आरोपीने हे फ्रिज कौफ,ता.जि.उडपी,राज्य-कर्नाटक येथील एका होटेल मधे विकण्यासाठी ठेवलेले आढळले.आरोपीकडून या गुन्ह्यात चोरीला गेलेले 1,47,040 रुपये किंमतीचे एकुण 10 फ्रिज जप्त करण्यात आले.उर्वरित एका फ्रिजचा तपास सुरू आहे.
रांजणगाव पोलिसांबरोबर वरिष्ट पोलिस अधिकार्यांचा सहभाग….
रांजणगाव पोलिस दलातील ही कामगिरी प्रामुख्याने पंकज देशमुख,पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, रमेश चोपडे,अपर पोलीस अधिक्षक, पुणे,प्रशात ढोले,उपविभागिय पोलीस अधिकारी,शिरुर उपविभाग वरिष्ट अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव एम आय डी सी चे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे ,पोलीस हवालदार वैजनाथ नागरगोजे, तेजस रासकर व विजय शिंदे, पोलीस नाईक माणिक काळकुटे या टिमने पार पाडली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार तेजस रासकर,रांजणगाव एम आय डी सी ,पोलीस स्टेशन हे करत आहेत.
अधिकारी व पोलिसांचा मोठा फौजफाटा होता….
रांजणगाव पोलिस गेल्या काही दिवसांपासुन तेथील अवैध धंदे चोर्या,अवैध वेश्याव्यवसाय (Shirur Crime News) फोफावत चालल्याने टिकेचा विषय बनले होते.इथे विभागीय स्तरावरील पोलिस अधिकारी तळ ठोकून असतात.पोलिसांचा मोठा फौजफाटा इथे तैनात होता असतो.पण रांजणगाव व परिसरातील काही गावांमधे रोहित्रे चोरीचे प्रमाण वाढलेले होते.त्याबाबत काही सामाजिक,राजकिय कार्यकर्त्यांनी शिरुर तहसील कार्यालय येथे निवेदने,उपोषणे,आंदोलने केली होती.तरी गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नव्हती.
रांजणगाव परिसरातील नागरिकांना दिलासा…
रांजणगाव पोलिस अशा परिस्थितित असताना व परिस्थितीच्या पार्शभुमिवर आज एका महत्वाच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात आल्याने रांजणगाव पोलिस ठाण्यातील अधिकारी व पोलिस कर्मचारी यांना दिलासा मिळाला आहे.त्यामुळे रांजणगाव,कारेगाव,एम आय डी सी परिसरातील स्थानिक रहिवासी,परप्रांतीय कामगार व शेजारील गावातील ग्रस्त शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे.
करोडो रूपयांची उलाढाल,महत्वपुर्ण आंतरराष्ट्रीय उत्पादने यांची निर्मीती,दाटीवाटीची लोकसंख्या,नागरी समस्या, गुन्हेगारी, बेकायदेशीर क्रियाकलापांमध्ये सहभागी असणारा एक बलदंड वर्ग इथे आहे. त्यामुळे साहजीकच हा भाग संवेदनशील भाग बनला आहे. रांजणगाव पोलिस ठाण्याची साहजिकच इथे परिक्षा असते.नागरिकांना रांजणगाव पोलिस ठाण्यामुळे सुरक्षित वाटणे निकडीचे असते.
🌐 अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना•••••••
1. महाराष्ट्र पोलिस अधिकृत संकेतस्थळ
https://www.mahapolice.gov.in
2. गूगल मॅप्सवर रांजणगाव MIDC
https://maps.google.com/?q=Ranjangaon+MIDC
3. व्हर्लपुल इंडिया अधिकृत वेबसाइट
https://www.whirlpoolindia.com
4. भारतीय दंड संहिता कलम 381 (IPC Section 381)
https://indiankanoon.org/doc/267471/
5. डिस्ट्रिक्ट पोर्टल – पुणे ग्रामीण
https://pune.gov.in
6. सिटिझन कोप पोर्टल (Crime Reporting & Tracking)
https://citizen.mahapolice.gov.in
7. एमआयडीसी औद्योगिक माहिती
https://midcindia.org
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंकवर क्लिक करून–
LIC Jeevan Umang Yojana 2025 :ही विमा योजना २०२५ मध्ये सर्वाधिक फायदेशीर ठरणार! जाणून घ्या कारणं!
Personal Injury Lawyer – Marathi Guide:वैयक्तिक दुखापत वकील कसा निवडाल? – संपूर्ण मार्गदर्शक