
Contents
Shirur Crime News: शिरुरमधील कोल्ड स्टोरेजमध्ये मोठी चोरी : तीन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल
Shirur Crime News Theft In Cold Storage |
शिरुर 28 जून 2025 | प्रतिनिधी |
Shirur Crime News: शिरुरमधील प्राईम कोल्ड कंपनीत 77 हजारांची वायर व कॉपर पट्टी चोरी; तीन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल. अपघाताची वेळ, मालाचे तपशील व पोलिस तपासाची सविस्तर माहिती येथे वाचा.
शिरुर तालुक्यातील मौजे करडे येथील प्राईम कोल्ड कंपनी प्रा. लि. या कंपनीत पहाटेच्या सुमारास घडलेल्या चोरीच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत एकूण ₹77,000/- किंमतीचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती समोर आली असून, शिरुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं 455/2025 नोंद करण्यात आला आहे.
🧾 गुन्ह्याची सविस्तर हकीकत—-
फिर्यादी प्रशांत शशीभूषण मंडल (वय 35), हे एच.आर.ए. म्हणून प्राईम कोल्ड कंपनीमध्ये काम करतात. त्यांचा मूळ पत्ता पश्चिम बंगालमधील तालबगीचा, खडकपूर (प. मेदिनीपूर) येथे असून, सध्या ते करडे कंपनी गेस्ट हाऊस, शिरुर येथे वास्तव्यास आहेत.
घटना 25 जून 2025 रोजी पहाटे 3.00 ते 3.30 च्या दरम्यान घडली. कंपनीच्या स्टोअर रूम, डिझेल रूम व कॉम्प्रेसर रूममध्ये ठेवलेली महागडी वायर आणि कॉपर पट्टी चोरीला गेली. तिन अज्ञात इसमांनी उघड्या खिडकीतून प्रवेश करून खालील प्रमाणे माल चोरून नेला –
📦 चोरी गेलेला माल—-
(एकूण ₹77,000/-):
1. 35 रकंवअर M.M. (200 मीटर) – ₹40,000/-
2. 16 M.M. केबल वायर (100 मीटर) – ₹15,000/-
3. 2.5 M.M. केबल वायर (200 मीटर) – ₹20,000/-
4. 10 मीटर कॉपर पट्टी – ₹2,000/-
🕵️ तपास व कारवाई—–
➡️ गुन्हा भारतीय दंड संहिता कलम 305(A), 3(5) अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.
➡️ तक्रार दाखल करणारे अंमलदार : पोहवा भगत
➡️ तपासी अधिकारी : पोहवा पवार
शिरुर पोलिसांनी या संदर्भात तपास सुरू केला असून, चोरी करणाऱ्या तिन अज्ञात इसमांचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात असलेल्या अन्य कंपन्यांमध्ये देखील सुरक्षेच्या दृष्टीने चिंता निर्माण झाली आहे.
📌 निष्कर्ष—–
कंपन्यांमध्ये असलेल्या सुरक्षेच्या त्रुटीमुळे चोरट्यांना संधी मिळते. हा प्रकार गंभीर असून पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज, कर्मचाऱ्यांच्या तपासणीसह सर्व बाजूंनी तपास करून दोषींना गजाआड करावे अशी अपेक्षा आह
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना ••••
🌐
1. https://maharashtratimes.com
3.https://indianexpress.com/crime
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंकवर क्लिक करून •••••
Shirur City Parking Problem :शिरूर शहरात पार्किंग चा बट्ट्याबोळ?