
Contents
‘तु मला खुप आवडतेस’ असे म्हणणे महागात पडले ?
‘तु मला खुप आवडतेस’ अर्थात
कोणी आवडणे नैसर्गिक आहे ,पण…
शिरुर,दिनांक 15 मार्च 2025:
(सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
‘ मला खुप आवडतुतेस’ असे म्हणणे महागात पडले आहे.भानुदास अनुसे ,राहणार – आंबळे ,तालुका – शिरुर,जिल्हा -पुणे असे या इसमाचे नाव आहे. ‘तु मला खुप आवडतेस’ अर्थात
कोणी आवडणे नैसर्गिक आहे ,पण जी व्यक्ती आवडते तिच्या इच्धेविरुद्ध तिच्या गालावर हात फिरवुन तिला तसे सांगणे हे गैर व बेकायदेशीर आहे.शिवाय ती व्यक्ती विवाहित महिला असल्यावर तर असे करणे फारच गैर बाब आहे. अर्थात त्या महिलेने या वर्तनाची तक्रार शिरुर पोलिस स्टेशन मधे केली आहे. शिरुर पोलिसांनी भानुदास अनुसे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.शिरुर पोलिस या बाबतीतील पुढील तपास करत आहेत.
Read more >>
‘तु मला खुप आवडतेस’ फिल्मी डायलाग ! —
हकीकत अशी आहे. तरी दिनांक 26 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता ते दिनांक १४मार्च 2025 रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान आंबळे, तालुका – शिरूर, जिल्हा -पुणे येथे फिर्यिदी (नाव गुप्त) हिच्या राहत्या घरी व श्री स्वामी समर्थ हॉटेल समोर भानुदास चंद्रकांत अनुसे, राहणार-अनुमेवाडी, कळवंतवाडी, तालुका – शिरूर जिल्हा -पुणे याने फिर्यादी तरुणीच्या घरामध्ये काही अधिकार नसताना प्रवेश केला. तिचा हात धरून तो जवळ आला. तिच्या गालावर हात फिरवून “तु मला खुप आवडतेस” असे म्हणाला. त्यामुळे तिच्यि स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २६ मध्ये काय वाचाल ..👇
१) काम्ब्रेड शरद पाटील शताब्दीचे अभिवादन…
२) समाजक्रांतीसाठी काम्ब्रेड शरद पाटील यांनी केलेल्या संशोधनाची मी साक्षीदार. …
३) मावळाई प्रकाशन ची प्रकाशने कोनती?…
४) प्रयोजन ? व इतर..👇
पिडीत महिला व तिच्या पतीला धक्काबुक्की—-
तसेच तिचे पती व तिला धक्काबुक्की करून शिवीगाळ, दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली. म्हणून त्या तरुणीने भानुदास अनुसे वर शिरुर पोलिस स्टेशन मधे कायदेशीर तक्रार देखील केली आहे. आरोपी भानुदास अनुसेवर शिरुर पोलिस स्टेशन मधे न्याय संहिता कायदा कलम ७४, ३३३, ११५ (२),३५२,३५१(२)(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more >>
आरोपी –
भानुदास चंद्रकांत अनुसे, राहणार- अनुमेवाडी, कळवंतवाडी,तालुका -शिरूर ,जिल्हा – पुणे.
शिरुर पोलिसांकडुन पुढील तपास सुरु—

दाखल अमंलदार पोलिस हवालदार श्री.आगलावे हे आहेत. तर या घटनेचा पुढील तपास अमंलदार पोलिस हवालदार श्री. भोते हे करत आहेत.
प्रभारी आधिकारी पोलीस निरीक्षक श्री.संदेश केंजळे, शिरुर पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.
Read more >>
‘तु मला खुप आवडतेस’ असे फिल्मी डायलाग मारणारे बरेच असतात.पण विवाहित महिला आवडणे.नंतर तिला तिच्या इच्छेविरुद्ध तसे सांगणे हे निश्चित एक विकृतीचे लक्षण आहे.बेकायदेशीर कृत्य आहे.एवढा विवेक देखील आज हरपत चालला आहे.बळजबरीने प्रेम मिळवता येत नाही. भारतीय संस्कृती मधे परस्री मातेसमान मानावी अशी शिकवण आहे.पण ती आज लोप पावली आहे. मोबाईल फोन वर नफेखोर कंपन्या व जाहिरातदार जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या नादात नैतीकता सोडुन बसले आहेत.सतत कामोत्तेजक दृष्ये प्रसारीत करतात.त्या कडे अबालवृद्ध आकर्षित होतात.पण हे एका विकृतीला प्रोत्साहन आहे.हे सोईस्करपणे विसरतात.
पुष्कळ पिडीत अशा घटनांची वाच्यता कुठे करत नाहीत. पण संबंधित महिलेने अशा ,’मजनु’ ला पोलिस स्टेशन मधे खेचणे प्रशंसनीय आहे.इतर अशा पिडीत महिला, मुली,तरुणी यांनी न कचरता अशा ,’ची तक्रार पोलिस स्टेशन मधे करायला पाहिजे.तर अशा वर्तनाला आळा बसेल !