शिरुर परिसरात संशयास्पद हालचालींची घटना – पोलिस तपास सुरू
Shirur Crime : तांब्याच्या तारांसह 2 चोरट्या इसमाना ताब्यात घेण्यात शिरूर पोलिसांना यश मिळाले आहे.शिरुर पोलीस स्टेशन मधे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना शिरुर मधील सिद्धार्थ नगर परिसरात घडली आहे.
Contents
Shirur Crime : आण्णाभाऊ साठे चौक येथे सनशयास्पद वावर!
शिरूर तालुक्यातील आण्णाभाऊ साठे चौक येथे संशयास्पद परिस्थितीत तांब्याच्या तारांचे तुकडे बाळगल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 215/2026 नुसार मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 124 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शिरुर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल
या प्रकरणी अजय हरीश्चंद्र पाटील (पोलीस अंमलदार, शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून प्रथमेश नानासो राऊत (वय -21 वर्ष, राहणार-ढोक सांगवी, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे आणि सचिन सोपान वैराळकर (वय 24 वर्ष, सध्या राहणार- छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, रांजणगाव, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे; मूळ राहणार-किनोळा, तालुका-मोताळा, जिल्हा-बुलढाणा) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयास्पदरीत्या फिरत होते
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 12 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास आण्णाभाऊ साठे चौक, शिरूर येथे संशयास्पदरीत्या फिरताना दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी ते स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक MH 28 BJ 6472) वरून जात होते.
अचानक तपासणीमुळे उडाली धान्दल
तपासणीदरम्यान त्यांच्या जवळील काळ्या रंगाच्या बॅगमध्ये सुमारे 10 किलो वजनाच्या तांबे धातूच्या तारांचे छोटे-छोटे तुकडे आढळून आले. या तांब्याच्या तारांची अंदाजे किंमत 9,500 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच एक काळ्या रंगाची Z Fast कंपनीची बॅग (किंमत अंदाजे 200 रुपये) आणि स्प्लेंडर मोटारसायकल (किंमत अंदाजे 25,000 रुपये) असा एकूण 34,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अचानक तपासणी सुरु केल्यावर आरोपीची धान्दल उडाली.
खरेदीची पावती किंवा मालकीचा कोणताही समाधानकारक पुरावा नाही
सदर तांब्याच्या तारांबाबत आरोपींकडे खरेदीची पावती किंवा मालकीचा कोणताही समाधानकारक पुरावा आढळून आला नाही. त्यामुळे पोलिसांनी दोघांविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 124 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी गुन्हा 12 मार्च 2026 रोजी रात्री 11:35 वाजता एंट्री क्रमांक 73/2026 नुसार नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल अंमलदार सहायक फौजदार साबळे असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत. शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
सारांश :
शिरुर गुन्हेगारी Shirur Crime घटना शिरुर शहर व तालुक्यात वाढत आहे. हा परिणाम की कारण का मुलभुत प्रश्न आहेच. मात्र नागरिक अशा घटनांमुळे चिंतेत पडतात. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कायम राहतो.
Shirur Crime News आणखीन वाचा:
Shirur Crime News : शिरूरमधील गुन्हेगारीच्या ताज्या बातम्या | Satyashodhak News
Shirur Crime: सविंदणे येथे शिक्षकाला घरात घुसून मारहाण; 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Shirur Crime News : एस.टी. आगारात सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण; शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !
