Contents
शिरुर डेपोतील वाहकावर हल्ला : देवदैठण मधे बस थांबवून केली मारहाण !
शिरुर डेपोतील वाहकावर हल्ला बातमी
शिरुर,दिनांक १६ नोव्हेंबर २०२५|प्रतिनधी |
शिरूर एसटी डेपोतील वाहकास देवदैठण येथे प्रवासी एसटी बस थांबवून (वाहक-संतोष थोपटे) यांच्यावर सागर ससाणे व एका साथीदाराने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
📍 ठिकाण : देवदैठण, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर.
🗓️ घटनेचा दिनांक : १५ सप्टेंबर २०२५, सायं. ६ वा.
देवदैठण येथे सोमवारी संध्याकाळी एस.टी. बसवरील वाहकाला दोन इसमांनी बस थांबवून मारहाण केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.
🔹 फिर्यादी—-
संतोष बाळासाहेब थोपटे (वय ३६, रा. सध्या मोराची चिंचोली),वाहक,शिरुर एसटी बस स्थानक.
🔹 आरोपी—
• सागर ससाणे, रा. देवदैठण,ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर
• एक अनोळखी इसम (लाल टी-शर्ट परिधान केलेला)
🔹 घटना कशी घडली?
• फिर्यादी व इतर प्रवासी एस.टी. (क्रमांक MH14TD4143) चालक कुंडलिक ज्ञानेश्वर गाडीलकर यांच्यासह देवदैठण येथून प्रवास करत होते.
• पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलेले असताना एका इको कारला ओव्हरटेक करताना पाणी उडाले.
• त्यावर इको चालकाने शिवीगाळ करत “पुढे या, पाहतोच तुम्हाला!” अशी धमकी दिली.
• समर्थ लॉन्स, देवदैठण येथे आल्यावर इको कारने एस.टी. आडवी लावून थांबवली.
• आरोपी सागर ससाणे याने फोन करून मित्राला बोलावले. लाल टी-शर्ट परिधान केलेला तो इसम बसमध्ये शिरून संतोष थोपटे यांना घाणघाण शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
• मारहाणीच्या वेळी आरोपीने “माझे नाव सागर ससाणे आहे, पोलिस स्टेशनला जाऊन सांग” असे आव्हानात्मक वक्तव्य केले.
• एस.टी. चालक गाडीलकर व इतर प्रवाशांनी मध्यस्थी करून मारहाण थांबवली.
🔹 पुढील कारवाई—-
या प्रकरणी बेलवंडी पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली असून, पोलिस कां. अरविंद जाधव तपास करीत आहेत.
सदर तपास संतोष नारायण, पोलीस निरीक्षक,बेलवंडी, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना—–
3. Maharashtra Times – Pune News
‘सत्यशोधक’ च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंकवर क्लिक करुन•••••
रांजणगाव एम.आय.डी.सी. परिसरात मारहाणीचा प्रकार : नोकरी करणाऱ्या युवकावर सहा जणांचा हल्ला
शिरुर नगरपालिका आणि ‘अतिक्रमण पुराण’ !
