धडाकेबाज कामगिरीचा शिरूर पोलिसांचा सिलसिला सुरूच आहे ! आज
धडाकेबाज कामगिरी करताना 'कानोकान' खबर लागू न देता बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्याला एका इसमाला शिरूर पोलीसांनी अटक केली आहे. सविस्तर बातमी पुढे वाचाच एकदा. ...
धडाकेबाज कामगिरी करताना ‘कानोकान’ खबर लागू न देता बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक !
शिरुर दिनांक 26 जानेवारी 2025 : (सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
(Thanks for Images in this content to pixabay.com )
धडाकेबाज कामगिरीचा शिरूर पोलिसांचा सिलसिला सुरूच आहे ! आज धडाकेबाज कामगिरी करताना ‘कानोकान’ खबर लागू न देता बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या एका इसमाला शिरूर पोलीसांनी अटक केली आहे. सविस्तर बातमी पुढे वाचाच एकदा. …
धडाकेबाज कारवाई शिरुर पोलीसांकडुन !
शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर.
शिरूर शहरामध्ये बेकायदेशीरपणे छोटी पिस्तूल बाळगणाऱ्याला शिरुर पोलीसांनी आज बेड्या ठोकल्या आहेत. शिरूर तपास पथकाच्या कारवायांचा हा धडाका गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. श्री. संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार शिरूर पोलीस स्टेशन कडील पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण , पोलीस अंमलदार सचिन भोई ,निलेश थोरात, नीरज पिसाळ ,विजय शिंदे, निखिल रावडे या शिरुर पोलीसाच्या पथकाने शिरूर शहरांमध्ये पेट्रोलिंग करीत असताना शुभम चव्हाण यांना बातमीदांमार्फत बातमी मिळाली.’धडाकेबाज‘
Dr.Nitin Pawar, Editor -satyashodhaknews.com
जरा इकडेही लक्ष घाला !
“अशीच धडाकेबाज एक्शन शिरुर शहर व तालुक्यातील बेकायदेशीर हातभट्टी दारु बनवणे व विकणे,बेकायदेशीरपणे शासकीय आवारात उदा..आय टी आय प्रशिक्षण केंद्राची जागा,सेंटर दवाखान्याजवळील नगरपालिकेच्या शाळेमागची जागा ,कुकडी वसाहतीच्या हुडकोजवळच्या पडक्या सरकारी घरांमधे इ.ठिकाणी अंधार पडु लागला की दारुची पार्टी करणारे,वेश्यावृत्तीच्या झोपडपट्टीतील मुलींना तेथे आणणे, सिक्यूरिटीला दम देणे,झोपडपट्टीतील जुगार अड्डे,मटका अड्डे व त्याचे दलाल,बेकायदा विमल गुटका,माणिकचंद गुटका,इ.विकणे,अगदी नव्या पोलिस स्टेशनच्या बांधकामाच्या जवळच्या टपर्यांमधेदेखील पाठीमागे पोलिस उपस्थित असताना या वस्तु विकणे,बस स्थानक परिसरातील चोर्या,अगदी पाण्याच्या टाकीजवळ व बाबुरावनगर येथे बेकायदा घरगुती वेश्या व्यवसाय चालणे इ.बेकायदेशीरपणे चालणाऱ्या धंद्यांच्या ठिकाणी ‘कानोकान’ खबर न लागु देता धाड पडलेल्या देखील बातम्या मिळणे अपेक्षित आहे.”
——-
—- संपादक ,डॉ नितीन पवार, ‘शिरुर’,सत्यशोधक न्युज’, शिरुर.
त्यानुसार किरण सुनील पवार, राहणार -साईनगर, शिरूर -तालुका, शिरूर ,जिल्हा – पुणे हा येथे ‘टार्गेट’ होते. तो मार्केट यार्ड च्या मागच्या बाजूलासाईनगर समोर गावठी पिस्तूल बाळगून फिरत होता. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी लगेचच सदर माहिती पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंद्रे यांना कळवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बातमीच्या अनुषंगाने साईनगर परिसरात पोलीसांनी ‘सापळा‘ लावला.आणि सीताफिने किरण सुनील पवार ,वय-27 वर्ष साईनगर ,शिरुर, तालुका -शिरूर, जिल्हा -पुणे याला ताब्यात घेतले.
आरोपीला थांगपत्ता लागला नाही. आणि…
बेकायदेशीर पिस्तूल बाळगुन फिरणे नडले !
त्यावेळी किरण सुनील पवार यांच्या ताब्यातील अवैध बिगर परवान्याचे 20 हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तूल सापडले. या कारवाईबाबत निखिल भिमाजी रावडे पोलीस अंमलदार शिरूर पोलीस स्टेशन यांनी शिरूर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. त्याबाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 61/ 2025 असा आहे. तर आरोपीवर भारतीय हत्यार कायदा कलम 325 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण सुनील पवार ,वय- 27 वर्ष ,राहणार – शिरूर ,तालुका- शिरूर ,जिल्हा -पुणे याला या गुन्ह्याच्या कामी अटक करण्यात आलेली आहे. माननीय न्यायालयाने दिनांक 30/ 1 /2025 पर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावलेली आहे.
आरोपी—-
किरण सुनील पवार ,वय-27 वर्ष साईनगर ,शिरुर, तालुका -शिरूर, जिल्हा -पुणे याला ताब्यात घेतले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहेत .सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, उपविभागीय अधिकारी शिरूर विभाग ,पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे ,पोलीस सब इन्स्पेक्टर अविनाश थोरात, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे ,पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ ,पोलीस कॉन्स्टेबल योगेश गुंड, पोलीस कॉन्स्टेबल किशोर शिवणकर ,पोलीस हवालदार ज्ञानेश्वर शिंदे यांनी या कारवाई मध्ये भाग घेतला.
धडाकेबाज चित्रपटाची आठवण आली !
धडाकेबाज हा शब्द महाराष्ट्राला अपरिचीत आहे असे कोन म्हणू शकेल.’ धडाकेबाज ‘ या गाजलेल्या मराठी चित्रपटात सर्वांनी धडाकेबाज पोलीस इन्पेक्टर महेश जाधव चे पात्र मराठी मनात आजही आहे.ती भुमिका महेश कोठारे यांनी केली होती.ती नंतर महेश कोठारे यांनी स्वतः दिग्दर्शित केलेल्या व अभिनित केलेल्या प्रत्येक चित्रपटात राहिली.केवळ ‘इन्पेक्टर‘ म्हटले तरी ‘महेश‘ असा शब्द तोंडात येत असे.जाधव किंवा कोठारे नंतर येईलच असे काही अपेक्षित नसायचे ! असा हा सर्व धडाकेबाज शब्दाचा असर होता.
डॉ. नितीन पवार हे ‘Satyashodhak Blog’ चे संस्थापक, संपादक आणि वैचारिक लेखक आहेत. ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या त्यांच्या जीवनप्रवासाने त्यांना समाज, शिक्षण आणि मानवी मानसिकतेचे बारकावे समजून घेण्याची संधी दिली.
ते सामाजिक प्रश्न, जातव्यवस्था, शिक्षण, राजकारण, तत्त्वज्ञान आणि जागतिक घडामोडी यावर सखोल, तर्कशुद्ध आणि निर्भीड लेखन करतात. त्यांच्या लेखनात वैयक्तिक अनुभव, अभ्यासपूर्ण विश्लेषण आणि वास्तवाचे थेट प्रतिबिंब दिसते.
“सत्य शोधणे, त्याचे विश्लेषण करणे आणि निर्भीडपणे मांडणे” हे त्यांच्या लेखनाचे मुख्य ध्येय आहे. ते केवळ माहिती देत नाहीत, तर वाचकाला विचार करायला भाग पाडतात.