Contents
शिरूर ला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांचाच पडला विसर ! ज्यांच्या नावाने मते मागितली !
शिरुर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभमीवर आम आदमी पार्टीचे श्री.अनिल डांगे यांची खंत !
शिरूर ,दि – 7 जुलै : (डॉ.नितीन पवार, संपादक )

शिरूरला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांना इंडिया आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या आम आदमी पार्टीचा विसर पडल्याची शिरुर ‘ आम आदमी पार्टी’ चे श्री.अनिल डांगे यांची खंत व्यक्त केली आहे.

शिरुर च्या सभेत अरविंद केजरीवाल यांचा फोटो का नाही. ..
शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल शिरूर येथील ऐतिहासिक ‘पंचाचा वाडा’ या ठिकाणी लोकनियुक्त नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या नागरिक सत्कार समारंभाचे शिरूर शहराच्या विविध ठिकाणी कार्यक्रमाच्या अगोदर काही दिवस बॅनर लावण्यात आले होते.
“आम आदमी पक्षाची स्थापना अण्णा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झाली होती.अण्णा आंदोलन भ्रष्टाचाराच्या विरोधाचे एक प्रतिक बनले होते.भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याच्या एका ध्येयवादातुन देशातील अनेक तरुणांनी एकत्र येत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली, आम आदमी पक्षाची स्थापना केली होती.त्यावर पक्षिय राजकारणात पडावे की नाही.
असा एक विचार झाला होता. राजकिय सत्ता ही एक अशी चावी असते की जी परिवर्तनाचे कोनतेही कुलुप खोलु शकते.अर्थात भ्रष्टाचाराचे मुळ उखडून टाकण्यासाठी राजकिय सत्ता महत्वाची आहे.हे ओळखुन अनेक उच्च शिक्षित एकत्र येत हा पक्ष उभा राहिला.”
या बॅनरवर महाविकास आघाडीच्या मुख्य घटक असणाऱ्या ‘आम आदमी पार्टी’ चे संयोजक , राष्ट्रीय नेते अरविंदजी केजरीवाल यांचा फोटो बॅनरवर कुठेही दिसत नव्हता. त्यामुळे आम आदमी पार्टी , शिरूर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी होती.

त्याचे रूपांतर दुसऱ्या दिवशी ‘आम आदमी पार्टी’ शिरुरच्या कार्यकर्यांची अनुपस्थिती दिसली. आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते नवनिर्वाचित खासदार ,डॉ. अमोल कोल्हे यांच्या नागरी सत्कार समारंभामध्ये दिसून आले नाहीत. या विषयी चर्चा आणि कुजबुज पहावयास मिळाली आहे.
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी प्रथम दिल्ली राज्यात निवडणुक लढली.ते दिल्लीचे मुख्यमंत्री देखील झाले.दिल्ली पटर्न विकसित करुन दिल्ली राज्यात मोफत वीज,सरकारी शाळांचे कार्पोरेट स्ट्रक्चर उभे केले ,मोहल्ला क्लिनीक ही संकल्पना राबवली. एक उत्कृष्ट शेक्षणिक धोरण राबवून जगभर त्याची चर्चा झाली. इतके मुलभुत काम केले.त्यानंतर आम आदमी पक्षानचे पंजाब मधे देखील सरकार आले.तो पटर्न पंजाब मधले देखील राबवला.त्यानंतर गुजरात राज्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होम ग्राउंडवर आम आदमी पक्षाचे आमदार निवडून आणले.खाते खोलले.नंतर देशभर प्रचार दौरे त्यांनी केले.लोकसभा निवडकीत इंडिया आघाडी स्थापन होण्यामधे महत्वाची भुमिका अरविंद केजरीवाल यांनी बजावली.त्यामुळे केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकार पिछाडीवर गेले.एक प्रबळ विरोधी आघाडी लोकसभेत निर्माण झाली.
‘आप’ ने प्रामाणिकपणे योगदान. ..
याबाबत ‘सत्यशोधक न्यूज’ ने ‘आम आदमी पार्टी’ चे जिल्हा प्रवक्ते श्री. अनिल डांगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘सत्यशोधक न्यूज’ न्युज पोर्टलला प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे घटक म्हणून काम करत असताना ….आम आदमी पार्टीचा एकही उमेदवार महाराष्ट्र मध्ये निवडणुकीला उभा नसताना, आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केवळ महाविकास आघाडी ने दिलेला उमेदवार निवडून आणण्यासाठी,कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न बाळगता, स्वतःची पदरमोड करून किंबहुना खिशातला पैसा खर्च करून, महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या संयोजकांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सामावून घेतले पाहिजे.”
‘सत्यशोधक न्युज’ ने घेतली दखल……
‘सत्यशोधक न्यूज’ ने ‘आम आदमी पार्टी’च्या कार्यकर्त्यांना बोलते करून त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची ही प्रतिक्रिया सत्यशोधक न्यूज देत आहे. ती पुढील प्रमाणे- “आम आदमी पार्टी हा प्रामाणिक व स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.याची कीर्ती देशभरात आहे. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेप्रमाणे कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करून आपले योगदान लोकसभा निवडणुकीमध्ये दाखवून दिले आहे.
याची दखल दस्तर खुद्द माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांनी व ‘महाविकास आघाडी’ च्या नेत्यांनी अनेक सभेमध्ये आम आदमी पार्टी’ चे योगदान किती महत्वपूर्ण होते, असे जाहीर बोलून दाखवले आहे. मात्र ‘ महाविकास आघाडी’ च्या काही अज्ञात शक्ती जाणीवपूर्वक आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना डावलत आहेत .”
‘घरवापसी’ सुरु – डा.कोल्हे …
शिरूर येथील नागरी सत्कार समारंभामध्ये व्यासपीठावरून नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या भाषणामध्ये महायुतीतील अनेक नेते ‘घरवापसी’ साठी महाविकास आघाडीचे दार ठोठावत आहेत , असे म्हटले. मात्र ‘महाविकास आघाडी’ च्या घटक सदस्यांना अशी वागणूक मिळत असेल तर निवडून येणारे येतील का, याचाही विचार व्हावा” अशी अपेक्षा राजु संगारे या कार्यकत्याने व्यक्त केली आहे.
