
Contents
Shirur Electric Current Death: इलेक्टीक करंट लागुन 42 वर्षीय इसम मृत्युमुखी !
Shirur Electric Current Death: विजेच्या धक्याने पिंपरखेड मधे एकाचा मृत्यु!
Shirur Electric Current Death News 7 April 2025:(Satyashodhak News Report)
Shirur Electric Current Death: इलेक्टीक करंट लागुन 42 वर्षीय इसम मृत्युमुखी पडला आहे.या विजेच्या धक्याने मृत्युची घटना शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे घडली आहे.अधिक तपास शिरुर पोलिस करत आहेत. मयताचे नाव गणेश लक्ष्मण गुंड असे आहे.

सविस्तर घटना अशी आहे —
दिनांक 30 मार्च 2025 रोजी मयत गणेश लक्ष्मण गुंड ,वय -42 वर्ष ,राहणार- पिंपरखेड , तालुका -शिरुर, जिल्हा- पुणे हे हॅलोजन होते.त्यावेळी त्यांना इलेक्ट्रिक करंट लागल्याने ते बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना समर्थ हॉस्पिटल, मंचर येथे नेण्यात आले. तेथे त्यांनी पेशंटला आत न घेता त्यांना उपजिल्हा रुग्णालय, मंचर येथे घेऊन जाण्यास सांगितले.
खबर देणार –
आर. एस. मांडवी, सहाय्यक फौजदार,मंचर पोलीस स्टेशन.
उपचारापूर्वीच मृत्यु—
डॉक्टरांनी तेथे पेशंट यांना घेऊन गेल्यावर चेक केले.तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे सांगितले.पुढील कार्यवाहीसाठी शिरुर पोलिस स्टेशन मधे त्यांनी फिर्याद दाखल केली आहे.
मयताचे नाव –
गणेश लक्ष्मण गुंड,वय- 42 वर्ष, राहणार- पिंपरखेड, तालुका- शिरुर,जिल्हा-पुणे.
शिरुर पोलिस स्टेशन मधे नोंद —-
शिरूर पोलिस स्टेशन मधे नोंद क्रमांक – 36/2025 असा आहे. भारतीय न्याय संहिता कायदा कलम 194 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.
खास भेट:
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २९ मध्ये काय वाचाल ..👇
✅ रक्ताचे अर्ध्य…..
✅ अन्वेषण पद्धती….
✅ शरद पाटील यांची ग्रंथ संपदा. …
✅,शिवाजी,महाभारत….👇
दाखल अंमलदार श्री. राऊत हे आहेत. पुढील तपास पोलिस हवालदार श्री. उबाळे हे करत आहेत.प्रभारी अधिकारी पोलिस निरिक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.