
Contents
- 1 Shirur Electric Motor chori:शिरूरमध्ये अज्ञात चोरट्यांकडून 2 शेतकऱ्यांच्या शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला – गुन्हा दाखल.
Shirur Electric Motor chori:शिरूरमध्ये अज्ञात चोरट्यांकडून 2 शेतकऱ्यांच्या शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला – गुन्हा दाखल.
Shirur Electric Motor chori News 19 April 2025: (Satyashodhak News Report )

Shirur Electric Motor chori :शिरूर तालुक्यातील म्हसे (संगमवाडी) येथे अज्ञात चोरट्यांनी दोन शेतकऱ्यांच्या शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक मोटारी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more >>
Ankhin Ek Bepatta :शिरुर मधुन आणखीन एक बेपत्ता ? कोण व का ? वाचा या बातमीत!
घटनेचा तपशील:
पोलीस ठाणे: शिरूर
गु.र.नं: 257/2025
कलम: BNS 303(2), 324(4)
गु.घ.ता.वे: 17/04/2025 रोजी सकाळी 08:00 वा.
गु.दा.ता.वे: 18/04/2025 रोजी दुपारी 16:35 वा.
फिर्यादी: पोपट भाऊ खाडे (वय- 65 वर्षे, व्यवसाय शेती, राहणार- म्हसे, संगमवाडी)
आरोपी: अज्ञात चोरटा
Read more >>
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३१ मध्ये काय वाचाल ..👇
• भारताच्या शासन संस्थेचे सर्वंकष आरिष्ट व त्याची क्रांतीकारक सोडवणुक…..
• शूर्पनखेच्या जनस्थानाचा काम्रेड शरद पाटील पुरस्कृत शोध…
• एक सांस्कृतिक युगप्रवर्तरक शाहिर गव्हाणकर….
मावळाई प्रकाशन ची पुस्तकें. …
घटनेची हकीकत अशी आहे–
17 एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता फिर्यादी पोपट भाऊ खाडे यांनी अण्णापुर के.टी. बंधाऱ्याजवळील घोडनदी पात्राजवळ त्यांची टेक्समो कंपनीची 7.5 एच.पी. इलेक्ट्रिक मोटार चालू करून पाणीपुरवठा केला. लाईट गेल्यामुळे त्यांनी तीच ठिकाणी ठेवून घरी परतले.
चोरी अज्ञात चोरट्यांनी केली !—
दुसऱ्या दिवशी, 18 एप्रिल रोजी सकाळी 8:30 वाजता ते आणि शेजारी शेतकरी संतोष प्रभु खाडे हे मोटारी पुन्हा चालू करण्यासाठी गेले असता, त्यांना मोटारी गायब झालेल्या आढळल्या. त्याशिवाय वायर व पाईप कापलेले दिसून आले. दोघांनी परिसरात शोध घेतला, मात्र मोटारी मिळून आल्या नाहीत. यावरून ही चोरी अज्ञात चोरट्यांनी जाणीवपूर्वक केली असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
Read more >>
चोरी गेलेली मोटार:
टेक्समो कंपनीची 7.5 एच.पी., निळ्या रंगाची इलेक्ट्रिक मोटार (किंमत अंदाजे ₹.10,000)
पोलिस कारवाई:
दाखल अमंलदार: पो.ह.वा. शिंदे
तपास अधिकारी: पो.ह.वा. उबाळे
शिरूर पोलीस तपास करीत असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे.