
Contents
- 1 Shirur Electricity Office: Chori शिरूर वीज वितरण कार्यालयातून ३२ हजारांचा माल चोरट्याने चोरून नेला !
Shirur Electricity Office: Chori शिरूर वीज वितरण कार्यालयातून ३२ हजारांचा माल चोरट्याने चोरून नेला !
Shirur Electricity Office: Chori :शिरुर पोलिसांत गुन्हा दाखल !
शिरूर | ७ मे २०२५ : (प्रकाश करडे यांच्याकडुन )
Shirur Electricity Office: Chori:शिरूर शहरातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातून ३२ हजार रुपये किमतीचे विजेचे साहित्य चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाहेर ठेवलेले अल्युनियम कंडक्टर व १२० एमएम केबल दिसून आले नाहीत—
फिर्यादी मानसिंग जगदिश नेवसे (वय -३५ वर्षे, राहणार- छत्रपती कॉलनी, शिरूर) यांनी याबाबत माहिती दिली.या माहितीनुसार दिनांक ४ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता कार्यालय बंद करून कर्मचारी घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच ५ मे रोजी सकाळी ९.३० वाजता कार्यालय उघडले गेले. त्यावेळी बाहेर ठेवलेले अल्युनियम कंडक्टर व १२० एमएम केबल दिसून आले नाहीत.
सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले—-
त्यानंतर कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात रात्री २.३० वाजता एक अनोळखी व्यक्ती मोटरसायकल घेऊन गेटमधून आत येताना व त्यानंतर अल्युनियम कंडक्टर व केबल मोटरसायकलला बांधून नेताना स्पष्टपणे दिसून आला आहे . या व्यक्तीने कोणतीही परवानगी न घेता माल चोरून नेल्याचे दिसले.
या चोरीत अल्युनियम कंडक्टर (२८,०००/- रुपये.) आणि १२० एम.एम. केबल (१२,०००/- रुपये) असा अंदाजे ३२,०००/- रुपयांचा माल चोरीला गेला आहे.
शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल —

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३०९/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कायदा कलम ३०३(२) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार राऊत ,खेडकर हे करत आहेत.
खास वैचारिक भेट. ..
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवारी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३४ मध्ये काय वाचाल ..👇
✅बुद्धाची महत्ता ,मर्यादा व वारसा..
✅ बुद्ध:शरद पाटील..
✅ मेत्ता व करुणा..
✅ बुद्धकालीन समाज..
✅ ‘मावळाई प्रकाशनची प्रकाशने…