
Contents
- 1 शिरुर नगरपालिका करते विषम विकास ?
- 1.1 शिरुर नगरपालिका हद्दीतील गोपाळ वस्तीची दुरवस्था पहावेना !
- 1.1.1 शिरुर,दिनांक 3 जानेवारी 2025 : (सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
- 1.1.2 शिरुर नगरपालिका लोक प्रतिनीधींविना ?
- 1.1.3 शिरुर नगरपालिका हद्दीतील गोपाळ वस्ती !
- 1.1.4 गोपाल वस्तीतील प्रत्येक घरात ‘पैलवान’ !
- 1.1.5 शिरुर नगरपालिकेचे अंतर्गत रस्ते पाहण्यासारखे (?)
- 1.1.6 गोपाळ वस्ती मधे डांबरी रस्ते व चेंबर दुरुस्ती करावी !
- 1.1.7 सत्यशोधक न्युज ‘आग्रही’ !
- 1.1.8 About The Author
- 1.1 शिरुर नगरपालिका हद्दीतील गोपाळ वस्तीची दुरवस्था पहावेना !
शिरुर नगरपालिका करते विषम विकास ?
शिरुर नगरपालिका हद्दीतील गोपाळ वस्तीची दुरवस्था पहावेना !
शिरुर,दिनांक 3 जानेवारी 2025 : (सत्यशोधक न्युज रिपोर्ट )

शिरुर नगरपालिका ‘विषम विकास’ करते का असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिरुर नगरपालिका हद्दीतील गोपाळ वस्तीची दुरवस्था पहावेना अशी अवस्था आहे.सत्यशोधक नुज ने या भागात पाहणी केली आहे.आणि कमालीचे निराशाजनक चित्र दिसले.खाली फोटो व व्हिडिओ सह आम्ही या भागाच्या दुरवस्थेची माहीत शिरूर करांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. शिरुर नगरपालिकेने जणु शिरुरच्या नकाशात गोपाळ वस्ती नाहीच येत असे गृहीत धरले आहे की काय असा प्रश्न पडतो.
Read more >>
रक्तदान शिबिराचा स्तुत्य उपक्रम शिरुर पोलिसांकडुन 26 जानेवारीला !
शिरुर नगरपालिका लोक प्रतिनीधींविना ?

शिरुर नगरपालिका हद्दीसाठी एक तर गेले तीन वर्षे लोकप्रतिनिधी नाही.म्हणजे नगरसेवक नाही.नगराध्यक्ष नाही.तर प्रशासक आहे.पुर्वीचे नगरसेवक आता नगरसेवक राहिलेले नाहीत. नगराध्यक्ष देखील नगराध्यक्ष राहिले नाहीत.म्हणून कुणाला व्यक्तीगत दोष आम्ही देत नाही. मग या शहरात नेमकी कोणती राजवट चालु आहे ते कळेनासे झाले आहे. पक्षही नाही आणि विरोधी पक्षही नाही. मग जबाबदारी कुणाकडे आहे? तर प्रशासकाकडे.प्रशासक पडला बिगर राजकिय माणुस !
Read more >>
तोही सरकारी नोकरदार असतो.प्रशासनातील असतो.तो कोनत्या वार्ड चा नसतो.दुसर्या कोनत्यातरी मुळ गावचा असणार ! तो देखील निवडणुक होण्याची वाट पाहत असणार ! थोडक्यात ‘शिरुर’ वासियांना कोणी ‘वाली’ राहिला नाही.
शिरुर नगरपालिका हद्दीतील गोपाळ वस्ती !

शिरूर नगरपालिकेच्या वेगवेगळ्या वार्डमधे पाहिले तर काही प्रश्न, अडचणी,विकास हा सहसा सर्व वार्ड मधे सारखा होणे अ अपेक्षित आहे. पण काही भागात नागरी सुविधा उपलब्ध करुन देताना मन मोठे (?) केलेले दिसून येते.तर काही भागात मन अगदीच छोटे केले आहे असे म्हणता येईल अशी परिस्थिती गोपाळ वस्ती या भागात आहे.फोटोंमधे आपण पाहु शकता काय स्थिती आहे?
Read more >>
शिरूर नगरपालिका हद्दीतील या वस्तीची वेगळी ओळख आहे.गोपाळ मुळचे उत्तर भारतातुन दक्षिणेकडे स्थलांतरीत झालेली आहे. गोपाल हा शब्द भगवान कृष्ण आणि त्यांचे यदुवंशीय यांचा निकटचा संबंध आहे. यादवी झाली.नंतर परकिय आक्रमणे व इतर कारणांमुळे ही जमात स्थलांतरित होवुन महाराष्ट्रात आली.काही ‘शिरुर’ मधे वस्ती करुन रहात आहेत. पैलवानकी करणे हा गोपाळांचा पारंपारिक छंदच !
गोपाल वस्तीतील प्रत्येक घरात ‘पैलवान’ !

प्रत्येक घरात पैलवान आहे.कितीतरी पैलवान राज्य पातळीवरील कुस्तीगीर म्हणुन प्रसिद्ध आहेत.हिंद केसरी रघुनाथ राव पवार हे याच वस्तीतच राहतात.त्यांची तरी कदर शिरुर नगरपालिकेने करायला हवी होती.
Read more >>
शिरुर नगरपालिकेचे अंतर्गत रस्ते पाहण्यासारखे (?)

गोपाळ वस्तीत अंतर्गत रस्ते पाहण्यासारखे (?) आहेत.गलिच्छ अवस्थेत आहेत.रस्त्यात चेंबर आहेत.ते फोटोत आपण पाहु शकता. ते जवळ जवळ सर्व कुठे ना कुठे तरी फुटलेले आहेत.त्यातुन पाणी बाहेर पडून अस्ताव्यस्त पाणी पसरते.घसरट भाग तयार झाला आहे.साफसफाई कर्मचारी इथे कधी नेमके येतात? साफसपाई करतात.हे कळत नाही.पण मच्छरांचे इथे साम्राज्य पसरले आहे.
वस्तीतुन बाहेर जाणारा रस्ता अरुंद बनला आहे. त्यातुन वाहने जाताना फोटोत हे झाड दिसत आहे. त्याचा अडथळा येत आहे. सार्वजनिक शौचालय इथे आज उपलब्ध नाही. ते करावे अशी मागणी येथील महिला करत आहेत.
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात दि. २७-२८ डिसेंबर २०२४ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन !
गोपाळ वस्ती मधे डांबरी रस्ते व चेंबर दुरुस्ती करावी !

अंतर्गत रस्ते डांबरी करावेत.अशी मागणी आहे. फुटलेले चेंबर दुरुस्त करावेत अशीही मागणी आहे. नागरी सुविधा शिरुर नगरपालिकेने द्याव्यात
अशी रास्त मागणी येथील नागरिकांची आहे.
शिरुर नगरपालिका प्रशासकाने स्वतः एकदा या वस्तीला भेट देवुन पाहणी करावी.महिलांच्या समस्या समजुन घ्याव्यात.त्या दुर कराव्यात.असा सुर येथील नागरिकांना भेटल्यानंतर दिसून आला आहे.
Read more >>
नाभिक समाजाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष गणेश वाळुंजकर यांच्या हस्ते ‘द बेस्ट’सलोन चे उद्धाटन !
सत्यशोधक न्युज ‘आग्रही’ !
एकंदरीत सत्यशोधक न्युज कडुन शिरुर शहरातील सर्व भागांमध्ये जावुन पाहणी केली जाते.विचारपूस केली जाते.समस्या सरकार दरबारी मांडल्या जातात.अनेक विषयांबाबत सत्यशोधक न्युज निर्भयपणे बातमी द्यायला कचरत नाही.आमची बांधिलकी थेट शिरुर शहरातील जनतेशी आहे.कोण निवडुन येतो किंवा नाही. याच्याशी आम्हाला काही घेणे देणे नाही.पण नागरिकांची कामे झाली पाहिजेत.समस्या सुटल्या पाहिजेत.अशी आमची प्रामाणिक इच्छा असते.