डॉ.नितीन पवार, उमेदवार,शिरुर हवेली विधानसभा मतदार संघ, आम आदमी पक्ष, शिरुर.
Contents
शिरुर हवेली विधानसभा मतदार संघातुन एक पत्रकार डॉ.नितीन पवार आहेत उमेदवार !
शिरुर हवेली सह आम आदमी पक्ष महाराष्टात सर्व जागा लढणार ¡
शिरुर,8 सप्टेंबर : (‘संपादकिय टिम’,’सत्यशोधक न्युज’)
शिरुर हवेली विधानसभा मतदार संघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार डॉ.नितीन पवार यांचे शिरुर हवेली विधानसभा मतदार संघातील जनतेला एक खुले पत्र, ‘सत्यशोधक न्युज’ न्युज वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत. (सपादकिय टिम,’सत्यशोधक न्युज’)

शिरुर हवेली विधानसभा मतदार संघातील प्रिय मतदार बंधु भगिनींनो,
सप्रेम नमस्कार !🙏
मी डॉ.नितीन पवार, उमेदवार, आगामी विधानसभा निवडणूक, 2024,शिरुर हवेली विधानसभा मतदार संघ.Sep 3, 2024
🙏आपण मला फारसे ओळखत नाही. हे मला मान्य आहे. 🙏
माझ्या पत्रकारितेमुळे बरेच लोक मला ओळखतात. हे ही खरे आहे. त्यातल्या , ‘धारे’ चा अनुभव काहींना सुखावणारा असतो. तर काहींना दुखावणारा असतो.बरे बोलण्यापेक्षा खरे बोलणे चांगलें ; हे मी जाणतो ! पण ते सर्व जास्तीत जास्त लोकांच्या हिताचे म्हणजे , ‘बहुजन हिताय , बहुजन सुखाय ‘ करण्याचा प्रयत्न मी सतत करत असतो. मी दोन वेळा अपक्ष म्हणून उभा राहिलो. हे बर्याच लोकांना माहिती आहे. 2014 ला मी शिकावु उमेदवार होतो. 2019 ला मी लोकांपर्यत किमान माझी ओळख पोचवण्याचा प्रयत्न केला. साहजिकच मला काही फारशी मते मिळणार नव्हती ! पण शिकायला भरपुर मिळाले !🙏’शिरुर हवेली’
राजकीय पक्ष निवडण्याची वेळ आली. वैचारिकदृष्या डाव्या,उजव्या,मध्यमार्गी पक्षांबाबत मी अभ्यास केला. आजही मी समाजवादी/साम्यवादी विचारापासुन दुर जाऊ शकलो नाही. हे मी मान्य करतो. कारण तोच पर्याय मला तरी या भांडवलशाहीच्या पिक पाईंट ला दिसतो आहे. फक्त नव्या पिढीला नव्या परिभाषेची गरज आहे. मी मार्क्सवादीच आहे ! आंबेडकरवादीच आहे ! लिबरल लोकशाहीवादीच आहे ! हे मी ठासुन सांगतो. तुमचे आर्थिक ,सामाजिक,शैक्षणीक, सांस्कृतिक प्रश्न हे आपल्या अर्थव्यवस्थेचा परिणाम आहेत. हे मला अभ्यासाअंती कळुन चुकले !
वैचारिक पायावर चळवळी,आंदोलने यशस्वी होत असतात. परिवर्तने प्रत्यक्षात येत असतात. आणि दिर्घकाळ स्थिर व कल्याणकारी राहु शकतात. अन्यथा तुम्ही पक्ष बदलता,आमदार बदलता,खासदार बदलता,मुख्यमंती बदलता,पंतप्रधान बदलता.पण व्यवस्था बदलत नाही.कारण आर्थिक धोरणे बदलली जात नाहीत.आणि तुम्हाला हे सत्ताधारी ते सांगतील कशाला ? कारण ते व त्यांच्या शभर पिढ्यांची ‘व्यवस्था’ त्यांनी करुन ठेवलेली असते. पण अशी व्यवस्था सर्वांचीच करावी हे आजपर्यंतच्या सरकारांना वाटणार नव्हते , हे स्पष्ट आहे. कारण तुमच्या शोषणावरच ती व्यवस्था उभी राहिलेली असते.🙏
आता ‘आम आदमी पक्ष’ हा देखील अंतिम सत्य आहे असे मी म्हणणार नाही. पण व्यवस्था बदलण्याचे एक माध्यम आहे. एक पाउल आहे.उच्च शिक्षित लोकांचा यात भरणा आहे.प्रामाणिक कार्यकर्यांची फळी आहे.आणि हा पक्ष तुम्हीच तुमच्यासाठी अधिक योग्य असे बनवु शकता. तुम्हीच तो चालवावा ! तो आता एक विचार बनला आहे. 🙏
श्री.अरविंद केजरीवाल यांना रोखण्यासाठी किती आटोकाट प्रयत्न केले गेले ते हेच सिद्ध करतात की श्री.अरविंद केजरीवाल हे व आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते हेच तंतोतंत योग्य मार्गावर आहेत. एक उदाहरण देतो, कोनत्याही प्रगतीसाठी मुलभुत पाया ‘शिक्षण’ हे असते. त्याशिवाय योग्य विकास होवू शकत नाही. अयोग्य होवु शकतो ! तो आपण पहात आहातच ! की मुठभर अब्जाधिश आणि ढिगभर गरीब व मध्यमवर्यीय असणारा समाज निर्माण झाला. माफिया निर्माण झाले ,भ्रष्ट प्रशासन निर्माण झाले !
कुंपणानेच शेत खाल्ले ! ‘क्रानी कपिटलिझम’ निर्माण झाला. यात औद्योगिक क्षेत्रात देखील जिवघेणी स्पर्धा सुरू होते. मोठे उद्योग लहान उद्योगांना व मोठ्या स्पर्धक उद्योगांनाही गिळंकृत करुन टाकतात. तिथे तुमची आमची काय मजाल ! सहज युद्धांद्वारे, कोरोनासारख्या स्थितीद्वारे आपल्याला ढेकणांसारखे चिरडले जाते. म्हणुन शिक्षण हा तो पाया भक्कम करण्यासाठी शिक्षण सर्वांना ,मोफत व आधुनिक कार्पोरेट दर्जाचे दिल्ली आणि पंजाब मधे सत्ता येताच आम आदमी पक्षाने दिले. हे इतर सर्व पक्षांनी सोईस्करपणे टाळले होते.🙏
हे लक्षात घ्या की ‘आम आदमी’ म्हणजेच हिंदु आहे,बहुजन समाज आहे,श्रमिक वर्ग आहे, सर्वहारा वर्ग आहे, प्रोलेक्टेलिएट वर्ग आहे. शिवरायांची ,’रयत’ आहे,बाबासाहेबांचा ‘रिपब्लीकन समाज’ आहे. म.फुल्यांचा ,”सत्यशोधक समाज’ आहे आणि जगातला कामन मन आहे. जो आजपर्यत जगभर भरडला गेला आहे. तो आहे.आपण आहात. तुम्ही आहात. पण तुमची सत्ता येवु नये म्हणून तुमच्यापासुन अनेक गोष्टी लपवल्या गेल्या आहेत. इतक्या मोठ्या विश्वासघातानंतर देखील जर आपण शहाणे झाला नाहीत तर तुमचे व तुमच्या पुढील पिढ्यांचे भवितव्य अवघड आहे ! 🙏
तुम्ही तुमच्या एका मताची (Vote) किंमत ओळखली नाहीत, वापरली नाहीत. हेच त्यामागचे कारण आहे. हे मी माझ्यासाठी सांगत नाही तर तुमच्यासाठी सांगत आहे. मी कदाचित उमेदवार नसेलही ! पण आता निर्णायक वेळ आली आहे. तुम्ही केंदातील ‘हुकुमशाही’ प्रवृत्तीला लगाम घातलात !
खरेच तुम्ही भानावर आलात ! आता Democracy Aware (लोकशाही भान) समाज बणण्याच्या मार्गावर प्रवास करत आहात. तो पुढे असाच चालु ठेवा. कुणाला ‘हावी’ होवू देवु नका ! कुणाला डोक्यावर बसु देवु नका ! निवडणुक पद्धत जिवंत ठेवा,मशीन पद्धतही बदला ! पण लोकशाही कुठल्याच स्थितीत गमावु नका ! फार पश्चाताप होईल. ही कळकळीची विनंती आहे !🙏
राहिली बात शिरुर हवेली विधानसभा मतदार संघातील निवडणुकीची ! आमच्याशी जोडले जा. आपण एकीने लढु. व्यवस्था परिवर्तरनाची लढाई आता मतदार यंत्राद्वारे लढली जाणार आहे. 🙏स्थळकालपरत्वे साधने बदलत असतात. आज आपले ‘मत’ ‘ते साधन आहे. पुर्वीपेक्षा सोपे आहे. आणि आपण लोकसभेला ते दाखवूनही दिले आहे . आमच्याशी लवकरात लवकर संपर्क करा. प्रत्येक गावात , वाडीवस्त्यांवर ‘आप’च्या शाखा ,बुथ कमिटी,पदाधिकारी नेमणुका करायच्या आहेत.त्यासाठी आमच्याशी संपर्क करा. 🙏
🙏त्वरित संपर्क करा –🙏
917776033958/9529913558/8149232235 या नंबरवर ! आणि स्वतः सामिल व्हा या लढ्यात ! संघटित प्रयत्न करावे लागतात.सर्व यंत्रणा विकल्या गेल्या आहेत.म्हणुन ते एकट्या दुकट्याचे काम नाही. ते शिरुर हवेली विधानसभा मतदार संघापुरतेही काम नाही. महाराष्टासाठी आहे. भारतासाठी आहे !
आता एवढ्यावर थांबतो.
आपलाच ,
🙏डॉ.नितीन पवार,शिरुर🙏
🙏संंपर्क – 🙏🙏🙏 7776033958/9529913558/8149232235
