शिरुर हवेली विधानसभा मतदार संघ निवडणुकीत ,’आप’ चा ‘महाआघाडी’ स पाठिंबा !
शिरुर हवेली विधानसभा मतदार संघ निवडणुकीत ,'आप' चा 'महाआघाडी' स पाठिंबा मिळाला आहे. तशी घोषणा
शिरूर हवेली तील 'आप' चे संभाव्य उमेदवार डॉ. नितीन पवार यांनी करत पाठिंबा ॲड. अशोक पवार यांना जाहीर केला आहे.'आप' चे राष्ट्रीय संयोजक श्री.अरविंद केजरीवाल यांचा निर्णय मानला आहे.
शिरुर हवेली विधानसभा मतदार संघ निवडणुकीत ,’आप’ चा ‘महाआघाडी’ स पाठिंबा !
शिरूर हवेली त ‘आप’ चे डॉ. नितीन पवार यांचा पाठिंबा ॲड. अशोक पवार यांना जाहीर ! केजरीवाल यांचा निर्णय मानला !
शिरुर,दि.22 आक्टोंबर: ( सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
शिरुर हवेली विधानसभा मतदार संघ निवडणुकीत ,’आप’ चा ‘महाआघाडी’ स पाठिंबा मिळाला आहे. तशी घोषणा
शिरूर हवेली तील ‘आप’ चे संभाव्य उमेदवार डॉ. नितीन पवार यांनी करत पाठिंबा ॲड. अशोक पवार यांना जाहीर केला आहे.’आप’ चे राष्ट्रीय संयोजक श्री.अरविंद केजरीवाल यांचा निर्णय मानला आहे.
शिरुर हवेली विधानसभा मतदार संघातील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही हा निर्णय मानला आहे. महाराष्ट्राचे व्यापक हित लक्षात ठेवुन मतविभागणी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.असे शिरुर हवेली विधानसभा मतदार संघ निवडणुकीतील आम आदमी पक्षाचे डॉ.नितीन पवार यांनी पुढे सांगितले आहे.’शिरुर हवेली’
डॉ. नितीन पवार,’आप’ कार्यकर्ते,शिरुर.
” मोठ्या चलाखीने स्टेप बाय स्टेप भारतीय संविधान बदलण्याचा प्रयत्न केंदातील ‘हुकुमशाही’ भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मातृसघटनेचा प्रयत्न चालु आहे.अर्थात सर्वसामान्य माणसाला व अगदी संघ व भाजप कार्यकर्तांना देखील ही बाब लक्षात येण्यासारखी नाही. ते ही अफवा समजतात.पण संघाचे प्रात:संस्मरणीय गोळवलकर गुरुजी यांचे ,’बंच आफ थाटस्स ‘हे पुस्तक सर्वच लोकांनी वाचावे.म्हणजे त्यांचा ध्येयवाद काय आहे हे समजतो.
मात्र आता संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब यांचे अनुयायीच फक्त संविधानाच्या रक्षणासाठी सज्ज असतात.असा गैरसमज लोकसभा निवडणुकीच्या या देशातील लोकांनी हाणुन पाडला.मात्र संघाचे पुर्वज यांचा इतिहास अशा घटनांना कसा अंजाम देतात? हे बाबासाहेब आंबेडकर यांनी, ‘क्रांती आणि प्रतिक्रांती’ या पुस्तकात सप्रमाण सिद्ध केले आहे. मा.शरद पवार ,अरविंद केजरीवाल आणि अनेकांच्या लक्षात ही बाब आली.त्यातुन इंडिया आघाडी निर्माण झाली.आणि भाजप व संघाचा डाव हाणुन पाडला गेला.ही लढाई संपलेली नाही.या संघप्रवृत्तीचा इतिहास पाहिला तर भारतीय लोकशाहीच्या रक्षणकर्त्यांना याची जाणीव आहे.
त्याचाच एक खारीचा वाटा का होईना प्रयत्न मी केला आहे. सर्व नागरिकांना एकच आवाहन करतो की आपण या निवडणुकीत कदापी भारतीय जनता पक्ष आणि तत्तम विचार बाळगणार्या शक्तींचा एक भाग असलेले महाराष्ट्रातील सरकार हटवावे !”
— डॉ.नितीन पवार, आम आदमी पक्ष कार्यकर्ते ,शिरुर.
नुकत्याच झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणूकीत आम आदमी पक्ष व कांग्रेस यांची युती झाली नव्हती. त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला होता.हे लक्षात घेऊन आम आदमी पक्षाने राष्ट्रीय संयोजक श्री. अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्र व झारखंडमधे विधानसभा निवडणुक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्ष आता आगामी दिल्ली विधानसभा निवडणूकीकडे लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगितले गेले. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महाआघाडीत या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
आज 22 आक्टोंबर रोजी आक्षेप आलेले आहेत. ते असे…..
1. शिरुर शहरातील अतिक्रमणे (बस स्थानक) पाडणे.
2.भ्रष्टाचार ?
3. गोरगरीबांची कुटुंबे उध्वस्त?
आरोप सिद्ध झाल्यावरच एखादा गुन्हेगार म्हणुन सिद्ध होतो. आरोप खरे असतील तर आशोक बापु तुरुंगात असते. त्यांच्या पक्षाचे राज्यात सरकारही नाही. शिरुर शहरातील अतिक्रमणावर बोलणे म्हणजे गंमतच आहे. काहींची अनेक दुकाने,टपऱ्या आहेत. त्याचे अव्वाच्या सव्वा भाडे घेउन परराज्यातील कष्टकर्यांचे शोषण करुन काही काम न करता इथे तिथे गप्पा मारत बसणारे ऐतखाऊ काही लोक आहेत. त्यांनी कधी या कष्टकऱ्यांची दया आली नाही.शिवाय ते ‘बहुजन’ आहेत ना हो !
आणि शंभर रुपयांची ‘विमल’ रोज खाणारे गरीब नसतात. पण तसे दाखवणारे बरेच शिरुरमधे आहेत. बरेच जण मला म्हणाले की तुम्ही आबेडकरी चळवळीत काम न करता आम आदमी पक्षात कसे ? म्हणजे हे लोक आता पक्ष देखील जन्मावर आधारित ठरवत आहेत. इतके जबर ‘प्रबोधन केडर कॅम्प’ इथे झाले आहेत. बामणांनी सुद्धा अगदी जे फक्त मनुवादी होते .त्यांंच्या वंशजांनी अद्याप तरी ‘व्यक्तीचा राजकीय पक्ष जन्मावर आधारित ठरवला नाही.’ पण या Kader Base लोकांनी मात्र तो ही ठरवुन टाकला ! अजब हे प्रबोधन !
त्यांनी मला आज शहरात कोणनी खरी आंबेडकरी चळवळ अस्तित्वात आहे? ते सांगावे ? इतर वेळेस माझ्यासमोर ,’पैसा म्हणजेच आज सर्व सर्व आहे.” असे मला हिणवणार्यांचा हा सिद्धांत आंबेडकरवादात कोठे बसतो. ते सांगावे. आपण अतिक्रमण करतो तेव्हा ते बेकायदेशीर असतेच .म्हणजे बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या घटनेनुसार योग्य नसते.तिथे बाबासाहेबांचा उपमर्द होत नाही का? बाबासाहेबांनी सामाजिक न्यायाचे अनेक कायदे केले. पण अतिक्रमण करा किंवा ते कायदेशीर आहे. असा काही कायदा केला आहे का? तेव्हा आपण अतिक्रमण करतोच कसे मुळात? म्हणजे बाबासाहेब फक्त सोईनुसार पाहिजेत यांना ! त्यापेक्षा अर्धा गुंठा तरी जागा दोघांदोघांनी विकत घेऊन घर बांधा.आनंद मिळेल.मग कुणाच्या बापाची हिंमत नाही आपल्याला ‘झोपडपट्टी’किंवा अतिक्रमण म्हणण्याची !
मागे मी एक लेख लिहिला होता. त्यात बेकायदेशीरपणे अतिक्रमण करणे व ते वाचविणसाठी त्या जागेभोवती महापुरुषांची स्मारके,छोटी मंदिरे बांधणे.घरे बांधुन भाड्याने देणे किंवा विकणे.बेकायदेशीर दारुचे धंदे तिथे करणे,मटका अड्डे चालवणे असा गोरख धंदा सर्वत्र आहे.तो वाचवण्यासाठी महापुरूषांचा ढाल म्हणुन उपयोग करणे चालु असते.हे प्रामुख्याने दादागीरी करुन केले जाते.अनेक खर्या गरीबांची घरे पाडली गेली.पण अशा दादा लोकांची अद्याप आहेत.त्यांची एकदा नव्याने तपासणी करुन खर्या बेघरांना नगरपालिकेने मोफत घरे बांधुन द्यावीत.हे शक्य आहे.
आणि हे बड्या अतिक्रमण वाल्यांसाठी सुद्धा आहे. एकुणच शिरुर शहरातील अतिक्रमणाबाबत एक ‘श्वेत पत्रिकाच’का शिरुर नगरपालिकेने का काढु नये?
—- नितीन पवार,आम आदमी पक्ष कार्यकर्ते, शिरुर.
त्यामुळे शिस्तबद्ध काम करणारे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे बळ महाआघाडीला मिळणार आहे. या निर्णयाचे स्वागत शिरुर हवेली विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी केले आहे.
या निर्णयामुळे आता शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष,कांग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि आम आदमी पक्ष यांची एकजुट आता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री.अशोक पवार यांना विजयाचा रस्ता अधिक सोपा होईल असे मानले जात आहे. श्री.अशोक पवार हे शिरुर हवेली विधानसभा मतदार संघातील बलाढ्य दावेदार मानले जातात.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com