
Contents
शिरुर जवळ दुचाकीस्वारास ट्रकची धडक ! दोघांपैकी एक जखमी गंभीर!
शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल !
शिरुर, दिनांक 19 जानेवारी : (सत्यशोधक न्यूज रिपोर्ट)

शिरुर जवळ दुचाकीस्वारास ट्रकची धडक बसली आहे. याचा शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक चालक अज्ञात आहे.तर अपघात ग्रस्त दोन तरुन जखमी आहेत.एक गंभीर आहे.शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिरुर तालुक्यातील मलठणजवळील शिंदेवाडी जवळ अपघात!
शिरुर पोलिस स्टेशन मधे नोंद केल्यानुसार हकीकत अशी की समक्ष शिरूर पोलीस स्टेशन अंकित टाकळी हाजी पोलीस दुरक्षेत्र येथे हजर राहुन फिर्यादी अक्षय भानुदास शिंदे, वय- 20 वर्षे ,व्यवसाय- खाजगी नोकरी ,राहणार- शिंदेवाडी, मलटण , तालुका -शिरूर यांनी
फिर्याद दाखल केली आहे.शिरुर
Read more >>
शिरुर तालुक्यात सासु व पती कडुन विवाहितेस मारहाण व धमकी !
शिरुर जवळ चुलत भावांमधे मारामारी,पुतण्या जखमी !
ती अशी की वरील नमुद पत्यावर ते व त्याचे वडील श्री. भानुदास धोंडीबा शिंदें, आई सौ. कलाबाई भानुदास शिंदे, भाउ अजित भानुदास शिंदे असे ते एकत्रित राहण्यास आहेत.ते सुमारे 2 वर्षापासुन झॉमील स्टील प्रा.लि. ढोकसांगवी, तालुका -शिरूर, जिल्हा – पुणे या कंपनीत वर्कर म्हणून काम करतात. त्यावरती त्यांच्या कुटुंबाची उपजिवीका करतात. ते आणि मित्र सागर रोकडा शिंदे असे ते दोघे जण दररोज सकाळी 6/00 वाजता शिंदेवाडी, मलठण येथुन त्यांचा भाउ अजित भानुदास शिंदे यांच्या नावे असलेल्या होंडा कंपनीची शाईन मोटार सायकल नंबर. MH12SZ4308 या मोटार सायकल वरती कंपनीमध्ये कामाला जात येत असतात.
शिरुर तालुक्यातील रांजणाव येथे जात होते कामाला !
तारीख 13/01/2025 रोजी सकाळी 6.20 वाजता ते व त्यांचा मित्र सागर रोकडा शिंद असे ते दोघेजण त्यांच्या कडील होंडा कंपनीची शाईन मोटार सायकल नंबर. MH12SZ4308 हिच्यावरुन राहत्या घरातुन झॉमील स्टील प्रा.लि. ढोकसांगवी ,तालुका- शिरूर, जिल्हा – पुणे या कंपनीमध्ये अष्टविनायक रोडने कामास जात होते. त्यावेळी सदरची मोटार सायकल ही ते स्वतः चालवित होते. त्यांच्या पाठीमागे सागर शिंदे हा बसला होता .ते अष्टविनायक रोडने शिंदेवाडी ते रांजणगाव एम. आय. डी कडे जात असताना मलटण, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे गावच्या हददीत पावर हाउस समोर सकाळी 06/30 वाजण्याचे सुमारास अष्टविनायक रोडने मलठण बाजुकडुन कवठे बाजुकडे टाटा कंपनीची ट्रक येत होता. त्यांचा पासिंग नंबर. MH14GD7157 असा आहे.
Read more >>
गंठण हिसकावून नेले : तिघे चोरटे फरार !
ट्रक चालकाचा बेजबाबदारपणा !
त्या वरील चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक हा अचानक त्यांच्या बाजुचे लेनवर त्याच्याकडुन आला. त्यावेळी त्यांचा समोरासमोर अपघात झाला . अपघातामध्ये त्यांच्या डाव्या पायाला, उजव्या हाताच्या कोपराला किरकोळ व गंभीर दुखापत झाली. त्यांच्या पाठीमागे मोटार सायकल वर बसलेला सागर शिंदे याच्या डोक्यास उजव्या बाजुला गंभीर दुखापत झाली. त्याच्या मणक्याला, उजव्या पायाचे बोटाला किरकोळ व गंभीर दुखापत झाली. त्यानंतर अपघात करणारा ट्रक वरील चालक हा त्यांना उपचाराकामी घेवुन गेला नाही. तर तसाच त्याच्या ताब्यातील ट्रक घेवुन तेथुन पळून गेला. त्यानंतर तेथील जमलेल्या लोकांनी त्यांना औषधोपचार करण्यासाठी एका खाजगी अॅम्ब्युलन्सने कोळपे हॉस्पीटल ,शिरूर येथे नेवुन अॅडमिट केले.
टाकळी हाजी पोलीस चौकीत पिडीत दाखल !
त्यावेळी सागर शिंदे याला जास्त अपघातामध्ये मार लागल्याने त्याला पुढील औषधोपचार करण्यासाठी एका खाजगी अॅम्ब्युलन्सने श्रीदिप हॉस्पीटल, अहिल्यानगर येथे पाठविले. फिर्यादी यास कोळपे हॉस्पीटल, शिरूर येथे औषधोपचार केले गेले. आता त्यांना बरे वाटु लागले आहे. तेथील डॉक्टराने डिस्चार्ज दिल्यानंतर ते आज रोजी टाकळी हाजी पोलीस चौकी येथे उशिराने झाले.झालेल्या प्रकाराबाबत तक्रार देण्यास आलो आहे.
तारीख13/01/2025 रोजी सकाळी 6/30 वाजण्याच्या सुमारास मलठण, तालुका – शिरूर ,जिल्हा – पुणे गावच्या हद्दीत पावर हाउस समोर अष्टविनायक रोडवरती कवठे ते मलठण जाणारे लेनवर मलठण बाजुकडून कवठे बाजुकडे येणारी एक तिचा पासिंग नंबर, MH14GD7157 वरील चालक नाव पत्ता माहिती नाही याने त्याचे ताब्यातील ट्रक हा हयगयीने अविचाराने रहदारीचे नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवला.त्यामुळे त्यांच्या लेनवरती चालवीत येवुन समोरासमोर अपघात केला. तसेच फिर्यादीस या अपघातामध्ये त्याच्या डाव्या पायाच्या करंगळी व तिच्या बाजुचे बोट फॅक्चर केले गेले.
फिर्यादीचा मित्र देखील वाचला !
तसेच उजव्या हाताच्या कोप-यास किरकोळ जखमी केले .त्यांच्या पाठीमागे मोटार सायकल वर बसलेला त्यांचा मित्र सागर रोकडा शिंदे,वय – 24 वर्षे याच्या डोक्यास उजव्या बाजुस, मनक्यास, उजव्या पायास किरकोळ व गंभीर दुखापत केली. मोटार सायकलच्या नुकसानीस कारणीभुत झाला . अपघाताची खबर न देता तसाच त्याच्या ताब्यातील ट्रक घेवून तेथुन पळून गेला आहे.
ट्रक टाटा कंपनीचा!

म्हणून फिर्यादी जो टाटा कंपनीचा ट्रक नंबर. MH14GD7157 वरील चालक (नाव पत्ता माहिती नाही ) याच्या विरूध्द फिर्याद शिरुर पोलिस स्टेशन मधे दाखल केली आहे.
शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल !
अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम 281 , 125 (a) , 125(b) , 324 (4) ,184 ,134 ,177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल अमंलदार पोलिस हवालदार श्री. वारे हे आहेत.पुढील तपास अमंलदार पोलिस हवालदार श्री. आगलावे हे करत आहेत. प्रभारी आधिकारी पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे, शिरुर पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.
(Thanks for images in this content to pixabay.com)