
Contents
शिरूर: कोळगाव डोळस येथे अज्ञात चोरट्याने 14 लाखांहून अधिक काळ्या मातीची चोरी!
शिरुर,२९ एप्रिल २०२५:(कल्पना पुंडे यांच्याकडुन)
शिरूर: कोळगाव डोळस:शिरूर तालुक्यातील कोळगाव डोळस (गट नंबर 117) परिसरात अज्ञात चोरट्याने 14 लाखांहून अधिक किमतीची काळी माती चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना 1 एप्रिल 2025 ते 5 एप्रिल 2025 दरम्यान रात्रीच्या वेळेत घडली.
JCB आणि हायवाच्या सहाय्याने चोरी—
फिर्यादी हर्षद बाळासाहेब साबळे (वय 29), ग्रामसभा अधिकारी, यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, अज्ञात आरोपीने शासनाची कोणतीही परवानगी न घेता JCB आणि हायवाच्या सहाय्याने 1687 ब्रास काळी माती चोरी करून नेल्याचे नमूद करण्यात आले आहे. या मातीची अंदाजे किंमत 14,17,080 रुपये इतकी असल्याचे प्राथमिक तपासातून समजते.
खनिज अधिनियम 1957 प्रमाणे गुन्हा दाखल —
यासंदर्भात भारतीय दंड विधान कलम 303(2), खनिज अधिनियम 1957 चं कलम 4A, तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चं कलम 9 आणि 15 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरुर पोलिस करत आहेत पुढील तपास —
गुन्हा दाखल क्र. 284/2025 असून, याचा तपास पोलीस हवालदार वारे, तपासी अंमलदार PN शिंदे हे करत असून, प्रभारी अधिकारी पो.नि. श्री. संदेश केंजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
शासनाच्या परवानगीशिवाय खनिज उत्खनन हा गंभीर गुन्हा मानला जातो आणि यासाठी कडक कारवाईचे तरतुदी आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३2 मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील: जात्यंतक क्रांतीचे सुत्रकार ….
• सवाई शिवाजी …
• दासशुद्रांची गुलामगिरी …
• ‘मावळाई प्रकाशन ची प्रकाशने ..अंक ३२, सत्यशोधक मार्क्सवादी (1) …