
Contents
- 1 Shirur Koyata Prakaran: कृषी सेवा केंद्रात कोयत्याने मारहाण व कोयता फिरवुन ‘हवा’ करण्यार्या तिघांना पोलिसांनी केली अटक !
Shirur Koyata Prakaran: कृषी सेवा केंद्रात कोयत्याने मारहाण व कोयता फिरवुन ‘हवा’ करण्यार्या तिघांना पोलिसांनी केली अटक !
Shirur Koyata Prakaran:तिन्ही आरोपी तरडोबाच्या वाडीचे राहणारे !
Shirur Koyata Prakaran News 14 April 2025:
(Satyashodhak News Report)

Shirur Koyata Prakaran:शिरूर शहरातील विशाल कृषी सेवा केंद्र येथे ५ एप्रिल २०२५ रोजी दुपारी दोनच्या सुमारास थरारक हल्ल्याची घटना घडली. दुकानात काम करत असलेल्या शुभम शिंदे यांचे कामगार संतोष पाचरणे यांच्यावर तिघांनी मिळून कोयत्याने आणि कात्रीने हल्ला करून गंभीर इजा केली. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं.
संगनमताने हल्ला केला—-
हल्लेखोर परवेज उर्फ पाप्या पठाण, रूपेश चित्ते आणि ओंकार जाधव (सर्व राहणार- तरडोबाची वाडी) यांनी संगनमताने हा हल्ला केला. ओंकार जाधवने धमकी देत म्हटले, “तुला लय मस्ती आली आहे काय? आमची तक्रार तहसीलदार ऑफिसला करतो काय? आता दाखवतोच तुला!”
Read more >>
उजव्या हातावर आणि पायावर वार—-
यानंतर पाप्या पठाण याने दुकानातील कात्रीने उजव्या हातावर आणि पायावर वार केला, तर रूपेश चित्ते याने कोयता हातात घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. लोक घाबरून आपापली दुकाने बंद करून पळून गेले. त्याने नंतर फिर्यादीच्या डोक्यावर वार करून त्यांना जखमी केले.
Read more >>
शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल—-

तक्रारदार संतोष पाचरणे (वय ४२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस पथकाची कारवाई —-
गुन्ह्याची गंभीरता ओळखून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पथक तयार करून त्वरीत अटक केली. पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व सहकाऱ्यांनी कामगिरी बजावत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींकडून कोयता देखील जप्त करण्यात आला आहे.
Read more >>
खास भेट …
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३० मध्ये काय वाचाल ..👇
• वैदिक धर्म व हिंदु धर्म
• शोषितांच्या मुक्तीच तत्वज्ञान उभारणारा लढवय्या
• प्राच्चविद्यापंडित काम्रेड शरद पाटील यांची ग्रंथसंपदा
• मावळाई प्रकाशनची प्रकाशने….👇
कठोर कारवाई केली जाईल– संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक यांचा इशारा !
पोलीस निरीक्षक केंजळे यांनी स्पष्ट केले की, “शहरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.”ही कार्यवाही पुणे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
1 thought on “Shirur Koyata Prakaran: कृषी सेवा केंद्रात कोयत्याने मारहाण व कोयता फिरवुन हवा करण्यार्या तिघांना पोलिसांनी केली अटक ! ”