
शिरुर पोलीस स्टेशन
Contents
- 1 लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी : शिरूर तालुक्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी : शिरूर तालुक्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी:वृद्ध शेतकर्याला मारहाण !
शिरूर (पुणे),2 मे २०२५: प्रकाश करडे यांच्याकडुन)
लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी:शिरूर तालुक्यातील चांडोह येथील पानमंद मळा येथे एका वृद्ध शेतकऱ्याला रस्त्यावर टाकलेली लाकडे यावरून वाद झाला आणि त्यातून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादींवर संशय?—
फिर्यादी केरभाऊ गेणभाऊ पानमंद (वय ६५ वर्षे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ३० एप्रिल रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आरोपी सुजित दिलीप पानमंद आणि दिलीप मारुती पानमंद (दोघे रा. पानमंद मळा, चांडोह) यांनी फिर्यादींवर संशय घेत लाकडे रस्त्यावर का टाकली यावरून वाद घातला.
समजावून सांगण्याचा प्रयत्न—
फिर्यादींनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत दमदाटी केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर सुजितने कुदळीच्या लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यात मारून जखमी केले. इतकेच नाही तर, “पुन्हा आमच्या वाटेला गेलास तर तलवारीने कापून टाकू,” अशी धमकीही दिली.
शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल —
या घटनेनंतर फिर्यादी केरभाऊ पानमंद यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, संबंधित प्रकरणात भादंवि कलम 118(1), 352, 351(2), 351(3), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार आगलावे करत असून, प्रभारी अधिकारी म्हणून संदेश केंजळे कार्यरत आहेत.
खास वैचारिक भेट. ..
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३३ मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स….
• ‘ हयवदन’…..
• बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण…
• शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ …
• ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…