
शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर
Contents
शिरुरमधे एका 58 वर्षीय वृद्धाचा मृत्यु ! कारण अस्पष्ट ; तर दुसर्या घटनेत इलेक्ट्रिक पाणबुडी चोरीला !
शिरुर मधील दोन घटनांत एकाचा अकस्मात मृत्यु तर शिरसगाव काटा येथे ‘पाणबुडी’ चोरीला !
शिरुर, दिनांक 26 जुलै : ( श्री.अनिल डांगे यांच्याकडुन )
शिरुर मधे एका 58 वर्षीय वृद्धाचा मृत्यु झाला आहे. या मृत्युचे कारण अद्याप अस्पष्ट आहे ; तर दुसर्या घटनेत इलेक्ट्रिक पाणबुडी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. दोन्ही घटनांचा तपास शिरुर पोलिस करत आहेत.
शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे चोरी..

फिर्यादीत नमुद केल्यानुसार दिनांक 21/07/2024 रोजी सकाळी 10: 00 वाजण्याच्या ते दिनांक 22/07/2024 रोजी सकाळी 8:00 वाजण्याच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने एक 7.5 एचपीची टेक्समो कंपनीची पाणबुडी 10,000 रुपये किमतीची फिर्यादी फिर्यादी दत्तात्रय बबन गुंड, वय- 65 वर्ष, धंदा- शेती ,राहणार – शिरसगाव काटा, (येळेफाटा) तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे यांची इलेक्ट्रिक मोटार मुद्दाम लबाडीचे इराद्याने स्वतःचे फायदा करिता चोरून नेली आहे .’शिरुर‘
चोरीला गेलेला माल पुढील प्रमाणे –
1) 10,000/- एक 7.5 एचपी ची टेक्रमो कंपनीची पाणबुडी इलेक्ट्रिक मोटार जु. वा. किं. अं आहे.
अज्ञान चोरट्याविरुद्ध शिरुर पोलीस स्टेशन गु.र.न 653/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक श्री. गवळी हे करत आहेत. दाखल अंमलदार पोलिस नाईक श्री. मोरे हे आहेत. प्रभारी अधिकारी ,पोलिस निरिक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.
शिरुरमधील दुसरी घटना. ….
त्यानंतर आज ता 25/07/2024 रोजी सकाळी 09/00 वाजण्याच्या सुमारास नेपाली हे डयुटी संपवुन रूम वर गेले. तेव्हा रूमचा दरवाजा लोटलेला होता. तेव्हा दरवाजा उघडला असता मित्र नंदाराम जोशी ,वय- अंदाजे 58 (पूर्ण नाव व मुळ पत्ता माहिती नाही) , सध्या , राहणार – बाबुराव नगर , शिरूर, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे हा अंथरुणावर झोपलेला दिसला.
तेव्हा नेपाली यांनी त्याला आवाज दिला असता त्याने काहीही आवाज दिला नाही. त्याला हलवले. तरी असता त्याने हालचाल केली नाही . तेव्हा खबर देणार यांनी आजुबाजुच्या नेपाळी लोकांना व रूम मालक गौरव बाफना यांना बोलावुन घेतले .त्यानंतर त्यांनी अब्युलंस बोलावुन घेतली. त्याला येथील सर्वांनी ग्रामीण रुग्णालय , शिरूर येथे नेले.तेथे डॉक्टरांनी नंदाराम जोशी ,वय- अंदाजे 58 (पुर्ण नाव व मुळ पत्ता माहिती नाही) ,सध्या राहणार, बाबुराव नगर ,शिरूर, तालुका, शिरूर, जिल्हा- पुणे याला तपासुन 3: 00 वाजण्याच्या पुर्वी ते मयत झाल्याचे घोषित केले आहे.
शिरूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यु ची रजि नं- 96/2024, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 194 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलिस नाईक श्री. शिंदे हे करत आहेत.तर दाखल अंमलदार पोलिस नाईक मोरे हे आहेत.दोन्ही घटनांचा तपास प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक श्री. ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलिस करत आहेत.
अकस्मात मृत्युची नोंद !
अकस्मात मृत्यु घडण्याच्या घटनेत अनेकवेळा व्यक्तीला काही आजार असतात.बहुतेक या आजारिंकडे व्यक्ती दुर्लक्ष करतात. किंवा अशिक्षितपणामुळे ते आजार माहीत होत नाहीत.काही लोक माहित आजार माहीत झाला तरी औषधे घेत नाहीत.किंवा मला काही होत नाही. असे म्हणतात. पण तसे होत नसते.ह्रदय विकारासारखे आजार वरवर दिसुन येत नाहीत. माणुस आजारी आहे.असे वाटत नाही. मग अचानक एक दिवस ह्रदय विकाराची झटका येतो.किंवा ब्रेन हमरेज होउन तो बेशुद्ध पडतो.बराच वेळ तिकडे कुणाचे दक्ष जात नाही. उशीर होतो.व्यक्ती मरण पावतो.काही वेळेला आसपास कोणी नातेवाईक किंवा मित्र नसतात.व्यक्ती एकटा राहणारा असतो.कोणीच दक्ष देत नाही. तो मृत्यु पावतो.
हेल्थ अवेअरनेसची सार्वत्रिक आवश्यकता. ..
काही वेळा काही बाबतीत जास्त तपास करण्यात पोलिसांना रस नसतो.काम टाळण्यासाठी ते अकस्मात मृत्यु अशी नोंद करतात.फाईल बंद होते.कोणी काही घातपात करण्याचीही शक्यता असते.पण इतर लोक झंझट नको म्हणून काही सांगत नाहीत. पर्यायाने हाक ना बोंब होते.व्यक्ती मरण पावतो. यावर आरोग्य जागृती Health Awareness महत्वाची असते.यक्तिगत प्रत्येकाने किमान सहा महिन्यांतुन एकदा सर्व वैद्यकीय तपासण्या करुन घेणे आवश्यक आहे. त्यातुन काही प्राथमिक स्थितीत असणारे आजार समजतात.ते पुर्ण बरे होवु शकतात.व्यक्ती मृत्युपासुनही वाचू शकतो.हे खरे आहे. शिक्षितांपैकी बरेच लोक अशा रुटिन तपासण्या व चेकप करून घेत असतात.सरकारी दवाखान्यांतही अशा चाचण्या उपलब्ध आहेत. पण रुग्णांचा त्यावर विश्वास नसतो.किंवा त्यांना ते माहीत नसते.
त्यामुळे सोपी असलेली बाब अवघड होउन बसते.वेळेवर उपचार होत नाहीत. व्यक्ती प्राणास मुकतो.आरोग्य खात्याने या बाबतीत पुढाकार घेऊन घरोघरी जावून आरोग्य आपल्या जागी अशी एखादी मोहिम राबवली तर शेकडो लोकांचे प्राण वाचले जावू शकतात.