
Contents
- 1 शिरूर मधे पडक्या घराजवळ रंगला होता जुगारीचा डाव ! पण पुढे काय झाले? वाचा सविस्तर : तर 20 वर्षीय मुलगी “मिसिंग”?
- 1.1 शिरुर पोलिसांची कारवाई : चार जुगारींना रंगेहात पकडले !
- 1.1.1 शिरुर,दि.23 जुलै : (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन )
- 1.1.2 शिरुर जुगार बहाद्दरांवर कारवाई. ….
- 1.1.3 दुसऱ्या घटनेत तरुणी बेपत्ता….
- 1.1.4 तरुणीचे वर्णन. …
- 1.1.5 शिरुर मधे ‘जुगार क्या चीज है’?….
- 1.1.6 ‘फुकट’ची लालसा माणसाला नैसर्गीकच का?
- 1.1.7 त्रास बायका मुलांना…..
- 1.1.8 दुसर्या घटनेत तरुणी बेपत्ता का?
- 1.1.9 सोशल मिडियाचा प्रभाव. …
- 1.1.10 About The Author
- 1.1 शिरुर पोलिसांची कारवाई : चार जुगारींना रंगेहात पकडले !
शिरूर मधे पडक्या घराजवळ रंगला होता जुगारीचा डाव ! पण पुढे काय झाले? वाचा सविस्तर : तर 20 वर्षीय मुलगी “मिसिंग”?
शिरुर पोलिसांची कारवाई : चार जुगारींना रंगेहात पकडले !
शिरुर,दि.23 जुलै : (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन )
शिरूर मधे पडक्या घराजवळ रंगला जुगारीचा डाव रंगला होता ! पण पुढे काय झाले? ते केवळ ट्रेजेडीच म्हणावे नाही तर काय ? शिरुर पोलिसांची कारवाई अरत चार जुगारींना रंगेहात पकडले आहे.
शिरुर जुगार बहाद्दरांवर कारवाई. ….
फिर्यादीत नमुद केल्यानुसार हकिकत अशी की दिनांक 23/7/24 रोजी 18 : 00 वाजण्याचा सुमारास शिरूर गावच्या हददीत सिध्दार्थनगर येथे पडक्या घराशेजारी तालुका- शिरूर ,जिल्हा- पुणे येथे
1) प्रभाकर विठठल गव्हाणे, वय- 39 वर्ष, राहणार – सयदबाबानगर, शिरूर
2) खंडु पांडुरंग खोमणे ,वय- 29 वर्ष ,राहणार – सिध्दार्थनगर, शिरूर
3) परमेश्वर एतवारी पंडीत, वय- 48 वर्ष, राहणार,मंगलमुर्तीनगर, शिरूर
4) ज्ञानेश्वर उर्फ माउली पंढरीनाथ शेलार ,वय- 49 वर्ष, राहणार,सिध्दार्थनगर, शिरूर, तालुका, शिरूर ,जिल्हा- पुणे हे तीन पत्ती जुगार खेळत होते.त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साधणे असा एकुण 5050/- रूपये किंमतीचाचा माल सापडला आहे.’शिरुर‘
म्हणुन त्यांच्या विरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनला गुरनं 650/2824 वर मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलिस नाईक श्री. टेंगळे हे तर दाखल अंमलदार सहायक फौजदार श्री. चव्हाण हेप्रभारी अधिकारी श्री.जोतीराम गुंजवटे , पोलीस निरीक्षक ,शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
दुसऱ्या घटनेत तरुणी बेपत्ता….

दुसर्या एका घटनेत पोलिस सुत्रांकडून आलेल्या माहिती नुसार सोनार आळी, शिरुर, तालुका,शिरुर ,जिल्हा – पुणे येथील महिलेची मुलगी ,राहणार – सोनार आळी ,शिरुर ,तालुका- .शिरुर , जिल्हा- पुणे मैञीणीकडे जावुन येते. असे सांगुन घरातुन निघुन गेली आहे. परत घरी आलेली नाही .तिचा शिरुर परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला गेला आहे. पण अजुन ती सापडलेली नाही.घरी आलेली नाही.अशा स्वरुपाची तक्रार शिरुर पोलिस स्टेशनला दाखल झाली आहे. त्यामुळे ‘ मिसींग‘ तक्रार शिरुर पोलिसांनी दाखल केली आहे.
तरुणीचे वर्णन. …
20 वर्षीय मुलीचे वर्णन रंग -गोरा ,उंची 5 फुट ,अंगाने सडपातळ ,केस- लांब सरळ ,मानेवर फुलपाखरासारखे गोंदलेले , नेसणीस निळे रंगाची, जिन्स पँन्ट , अंगात चाँकलेटी रंगाचा शर्ट व त्यावर श्रग ,पायात काळे रंगाचे शायन्डेल असे आहे.
पुढील तपास पोलिस नाईक श्री. शिंदे हे करत आहेत. दाखल अंमलदार सहायक फौजदार श्री.बनकर हे आहेत., शिरूर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास चालु आहे.
शिरुर मधे ‘जुगार क्या चीज है’?….
जुगार शिरुर शहराला नवीन नाही.महाराष्ट्र काय देश व जगाला देखील नवीन नाही.कधी कारवाई झाली तर ती थोडे दिवस बंद होते.नंतर परत सुरु होते. काहींचे असेही मत आहे की जुगारीच्या आशेवर मनुष्य जगतो.कित्येक कुटुंब चालतात.तर काहींनी संसार रुपी नैया सुध्दा पार केली आहे. ती नसेल तर चोर्या, हिंसा,लुटमार,अंदाधुंदी माजेल.ती सेफ्टी व्हॉल्व सारखी काम करते.म्हणुन ती बदलण्याची गरज नाही.
‘फुकट’ची लालसा माणसाला नैसर्गीकच का?
जुगारित निरंतर असे एक लालच माणसाच्या मागे लागते.आज जिंकला तरी नंतर ते जिंकलेले परत जुगारीत जाते.त्यात फक्त मालक मालामाल होतो.एजंट कसेबसे कुटुंब चालवतो.खेळणारे वेळ आणि पैसा घालवतात.प्राचीन काळापासून याची लत माणसाला आहे.राजे महाराजे जुगारीत काय काय हरले होते.त्याचे काय परिणाम झाले.हे महाकाव्यातुन देखील आपल्याला दिसतात !
त्रास बायका मुलांना…..
महाराष्ट्रात याला कायद्याने बंदी आहे. कारण त्यामुळे त्याचा त्रास जुगारी माणसाच्या बायको मुलांना भोगावे लागतात. हे योग्यच असते.कारण जुगार काय आणि लॉटरी काय ! फक्त मालक आणि एजंट नफ्यात असु शकतो.जितके नफ्यात असतात. त्यापेकीक्षा जास्त तोट्यात असतात. म्हणे.कारण कोन त्या आकड्यांवर लोड आहे.हे मालकांना समजते म्हणे.कसे ते माहीत नाही. पण समजते.त्यामुळे ज्या नंबरवर लोड नाही तेच नंबर/रिजल्ट येतात.म्हणजे मालकाकडे पैशाची गंगाच सतत वाहत असते. त्यामुळे तो प्रशासन , राजकारणी यांना कायमस्वरुपी ठरलेला टक्का देतो.म्हणून कोनतेही सरकार आले तरी जुगार बंद झाली नाही.
त्यातील काही प्रकारांना शासन लायसन देते म्हणे.त्यातुन व सरकारमान्य जुगार,लॉटरी चालुच राहणार.आणि बाकीचे मग आम्ही कसे जगायचे असा प्रश्न करुन चिरीमीरी देउन आपले हे धंदे चालू ठेवतात.
दुसर्या घटनेत तरुणी बेपत्ता का?
शिरुर मधील नव्याने उद्भवलेला पण गंभीर असा प्रकार आहे तरुण ,अल्पवयीन, शाळा काॅलेजेस मधील मुली रागावल्यानंतर घरातुन निघुन जातात.नंतर काय करतात. कुणाकडे राहतात? कशासाठी राहतात?परत घरी येतात का?काही जिवाला धोका झाला तर?
याचा त्रास कुटुंबाला खुप होतो.समाज संशयाने पाहतो.मुलगी व आईवडिल समाजात बदनाम होतात.समाज टोमणे मारतो.पळुन गेली आणि शेण खाल्ल्याशिवाय राहिली असेल का?असा संशय व टिप्पणी त्या मुलीबाबत व कुटुंबियांना पुढे वर्षानुवर्षे टोमणे मारतो.बहिणीचे,भावाचे लग्न जुळवताना ते कुटुंब बदफैली असल्याचा शेरा मारतात.एखादा तरी हे करतोच ! म्हणजे मानसिक त्रास देण्याचा प्रकार होतो.
सोशल मिडियाचा प्रभाव. …
हे सगळे अशा मुलींना काही कळत नाही का?की आता मुला मुलींना अधिक स्वातंत्र्य देण्याची वेळ आता आली आहे का?युरोप अमेरिकेत अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातुन युरोप अमेरिकेची आजची संस्कृती अस्तित्वात आली आहे. आपण त्या दिशेने चाललो आहोत का?फेसबुक, इंस्टाग्राम वगैरे माध्यमे तरुण तरुणींना बिघडवत तर नाहित ना? नफेखोरीच्या नादात ! शिवाय या माध्यमातुन करोडो रुपये परदेशात जात आहेत !