
Contents
- 1 शिरुर मधे धारदार हत्याराने वार ? तर तालुक्यातील दुसर्या घटनेत 28 वर्षीय तरुण अपघातात मृत्युमुखी !
- 1.1 शिरुर शहरात हिंसा का वाढत आहे? तालुक्यातील अपघात का थांबेनात ?
- 1.1.1 शिरुर,दिनांक 24 डिसेंबर :
- 1.1.2 (प्रकाश करडे यांच्याकडुन)
- 1.1.3 शिरुर पोस्ट ऑफीस समोर घटना !
- 1.1.4 ‘ सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करा !
- 1.1.5 वाद नातेसंबंधातील दोन गटांमधे…
- 1.1.6 शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल. …
- 1.1.7 तर तालुक्यातील दुसर्या घटनेत अपघातात एक जण मृत्युमुखी पडला आहे.
- 1.1.8 वाहन चालकाचा बेजबाबदारपणा….
- 1.1.9 घराला धडकुन अपघात झाला . ….
- 1.1.10 शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल. …
- 1.1.11 About The Author
- 1.1 शिरुर शहरात हिंसा का वाढत आहे? तालुक्यातील अपघात का थांबेनात ?
शिरुर मधे धारदार हत्याराने वार ? तर तालुक्यातील दुसर्या घटनेत 28 वर्षीय तरुण अपघातात मृत्युमुखी !
शिरुर शहरात हिंसा का वाढत आहे? तालुक्यातील अपघात का थांबेनात ?
शिरुर,दिनांक 24 डिसेंबर :
(प्रकाश करडे यांच्याकडुन)

शिरुर मधे धारदार हत्याराने वार केला गेल्याची शिरुर पोलीस स्टेशनला तक्रार आली आहे.तर तालुक्यातील दुसर्या घटनेत 28 वर्षीय तरुण अपघातात मृत्युमुखी पडला आहे.त्यामुळे शिरुर शहरात हिंसा का वाढत आहे? तालुक्यातील अपघात का थांबेनात ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. अर्थात नेहमी प्रमाणे शिरुर पोलीस पुढील तपास करत आहेत.
शिरुर पोस्ट ऑफीस समोर घटना !
शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केल्यानुसार हकीकत अशी की दिनांक- २३ डिसेंबर २०२४ रोजी २०:३० वाजण्याच्या सुमारास शिरूर गावच्या हद्दीत ; जुन्या नगर ते पुणे रोडवर ; पोस्ट ऑफीस समोर ; नाझ अँटो अँक्सेसरिज समोर मागील तीन ते चार वर्षापासुन फिर्यादी असिफ जमीर खान ,वय- 54 वर्ष, व्यवसाय -ऑटो ॲक्सेसरीज, राहणार-भाजी बाजार, शिरूर, तालुका-शिरूर, जिल्हा- पुणे यांचा व्यवसाय आहे.’शिरुर‘
‘ सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करा !
प्रिय वाचक,व्यावसायीक बंधुंनो,
‘सत्यशोधक न्युज’ वर जाहिरात करून हजारो वाचकांपर्यंत/ग्राहकांपर्यंत पोहोचा. आमच्या खास जाहिरात पर्यायांद्वारे तुमच्या ‘ब्रँड’ची लोकप्रियता वाढवा आणि तुमच्या ग्राहकांचा ओघ तुमच्यापर्यंत वाढवा.
——-
अधिक माहितीसाठी satyashodhak.blog ला भेट द्या किंवा आम्हाला 7776033958/9529913559 वर संपर्क करा.
—–
आपला,
डा.नितीन पवार,संपादक,
सत्यशोधक न्युज,
satyashodhak.blog
वाद नातेसंबंधातील दोन गटांमधे…
त्यांचे पुतण्या सैफ जमीर खान व हुसैन शहीद शहा यांच्यात किरकोळ वर्चस्वाचे कारणावरून वाद होता. तसेच दिनांक १७ डिसेंबर २०२४ रोजी समीर शेख याने त्यांच्या भावाच्या पत्नीच्या नाझ किराणा स्टोअर्स येथे केलेल्या गोंधळाच्या कारणावरून
१) आयान समीर शेख,
२) हुसेन शहीद शहा
हे दोन्ही राहणार- फकीर मोहल्ला, शिरूर याच्या सांगण्यावरून फिर्यादी यांचा पुतण्या सैफ जमीर खान, वय -२२ वर्षे, राहणार- भाजी बाजार, शिरूर, तालुका-शिरूर, जिल्हा- पुणे यास त्यांच्या हातातील कोयत्या सारख्या धारदार हत्याराने जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याचे डोक्यावर व हातावर वार केले आहेत. त्याला जखमी करून त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.म्हणुन त्यांनी त्या दोघांविरुध्द कायदेशीर फिर्याद आहे.
“महाराष्टातील सर्व जिल्हे व तालुक्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहेत.इच्छुकांनी आपले आपले अर्ज np197512@gmail.com /7776033958(What’s App number यावर पाठवावेत.- संपादक”
शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल. …
आरोपींवर भारतीय न्याय संहिता 109,49,351(2) नुसार शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल अधिकारी पी एस आय श्री. दिलीप पवार हे आहेत. तर पुढील तपास पी.एस.आय.श्री. शुभम चव्हाण हे करत आहेत.
प्रभारी अधिकारी श्री. संदेश केंजळे,पोलीस निरीक्षक, शिरुर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.
——-

तर तालुक्यातील दुसर्या घटनेत अपघातात एक जण मृत्युमुखी पडला आहे.
याबाबत शिरुर पोलीस स्टेशन मधे नोंद केल्यानुसार हकीकत अशी की दिनांक 23डिसेंबर 2024 रोजी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास शिरुर तालुक्यातील रावडेवाडी गावच्या हद्दीत पराग कारखान्याजवळ शिंदेवाडी ते पराग कारखान्याकडे जाणार्या अष्टविनायक महामार्गाच्या कडेला संदीप भानुदास शिंदे यांच्या घराला तालुका – शिरूर, जिल्हा- पुणे येथे पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे.
वाहन चालकाचा बेजबाबदारपणा….
शिंदेवाडी ते पराग कारखान्याकडे जाणार्या अष्टविनायक महामार्गाच्या कडेला असलेल्या संदिप भानुदास शिंदे यांच्या घराला तालुका-शिरूर जिल्हा- पुणे येथे फिर्यादी संतोष पंढरीनाथ कोकाटे, वय- 34 वर्षे, व्यवसाय -चालक, सध्या राहणार कुरूळी, तालुका-खेड, जिल्हा-पुणे, मुळ राहणार-मु.पो. कन्हेर कोखरी, वारनवाडी, पारनेर,तालुका-पारनेर, जिल्हा-अहमदनगर यांचा भाउ विकास पंढरीनाथ कोकाटे, वय -28 वर्षे याने त्याच्या ताब्यातील अशोक लेंलड 1615 टेम्पो नंबर- MH14.KA7315 हा भरधाव वेगाने जोरात रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणाने चालविला.
घराला धडकुन अपघात झाला . ….
रोड कडेला संदिप भानुदास शिंदे यांच्या मालकीच्या घराला धडकुन अपघात केला आहे. या अपघातामध्ये लहान मोठ्या दुखापतीस कारणीभुत झाला आहे. मसेच स्वताःच्या मृत्युस व टेम्पोच्या नुकसानीस कारणीभूत झाला आहे.
शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल. …
म्हणून फिर्यादी यांची विकास पंढरीनाथ कोकाटे ,वय 28- वर्षे, सध्या राहणार-मु.पो. बोरकेमळा, ओतुर, तालुका -जुन्नर, जिल्हा-पुणे याच्या विरूद्ध शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीवर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 106 (1), 281, 125 (अ) (ब), 324 (4) मो.वा.का.क.184 नुसार शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दाखल अंमलदार सहायक पोलिस फौजदार श्री. कदम हे आहेत. पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री. खेडकर हे करत आहेत. अधिकारी पोलिस निरीक्षक श्री.संदेश केंजळे,शिरूर पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.