
Contents
शिरूरमध्ये गावठी दारू विक्री प्रकरण; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
शिरूर : दिनांक 26 एप्रिल 2025:(कल्पना पुंडे यांच्याकडुन )
शिरुरमधे गावठी दारू विक्री प्रकरण:दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास, निमोणे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील एका घराजवळ पोलीस गस्तीदरम्यान गावठी दारू विक्रीसाठी बाळगल्याची घटना उघडकीस आली आहे.
10 लिटरच्या कॅनमध्ये सुमारे 5 लिटर गावठी हातभट्टीची दारू–
फिर्यादी पोलीस शिपाई रवींद्र बापूराव आव्हाड (वय 31 वर्ष, शिरूर पोलीस स्टेशन) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ताराचंद बाजीराव चौगुले (वय 53 वर्षे, रा. निमोणे, ता. शिरूर) याने आपल्या ताब्यात 500 रुपयांच्या किंमतीची, 10 लिटरच्या कॅनमध्ये सुमारे 5 लिटर गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगली होती.
शिरूर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल –
पोलीसांची चाहूल लागताच आरोपीने पळ काढला. मात्र, त्याच्याविरुद्ध मुंबई प्रोव्ही अॅक्ट 65(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस हवालदार टेंगले (ब.नं. 2499) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार जगताप करीत आहेत.
शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.
पोलीस जनतेस आवाहन करीत आहेत की, गावठी दारू विक्रीसारख्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती पोलिसांना तातडीने द्यावी, जेणेकरून समाजातील अशा गैरप्रकारांना आळा घालता येईल.
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३2 मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील: जात्यंतक क्रांतीचे सुत्रकार ….
• सवाई शिवाजी …
• दासशुद्रांची गुलामगिरी …
• ‘मावळाई प्रकाशन ची प्रकाशने ..अंक ३२, सत्यशोधक मार्क्सवादी (1) …