
Contents
शिरूरमध्ये हद्दपार आदेशाचा भंग; गणेश महाजनवर गुन्हा दाखल
शिरूर (पुणे) : (प्रकाश करडे यांच्याकडुन )
शिरूरमध्ये हद्दपार आदेशाचा भंग;दि. २५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता शिरूर पोलिसांनी हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या गणेश उर्फ श्रीरंग शंकर महाजन (वय ३६, रा. गोलेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) याला ताब्यात घेतले आहे.
पुणे ,अहमदनगर, पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातून होता हद्दपार —
फिर्यादी जनार्दन सुरेश शेळके (पोलीस हवालदार, ब.नं. १८८९, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश महाजन याच्यावर मा. पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण यांच्या आदेशानुसार संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार (तडीपार) करण्यात आले होते.
शिरूर येथील ज्ञानगंगा शाळेच्या पाठीमागे सापडला–
तथापि, दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी बाबुरावनगर, शिरूर येथील ज्ञानगंगा शाळेच्या पाठीमागील बाजूस तो आढळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. गणेश महाजन याने हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून पुणे ग्रामीण हद्दीत परवानगी शिवाय प्रवेश केला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २७३/२०२५ अन्वये मुंबई पोलीस कायदा कलम १४२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार जगताप (२५) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. गुन्हा नोंदवण्याची कारवाई पोलीस हवालदार उबाळे (१८९) यांनी केली.
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३2 मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील: जात्यंतक क्रांतीचे सुत्रकार ….
• सवाई शिवाजी …
• दासशुद्रांची गुलामगिरी …
• ‘मावळाई प्रकाशन ची प्रकाशने ..अंक ३२, सत्यशोधक मार्क्सवादी (1) …