
शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर.
Contents
- 1 शिरुर मधे पल्सार गाडी आडवी मारली ! पुढे काय घडले ते वाचा…
- 1.1 शिरुर मधे पल्सार गाडी च्या चालकाकडून 15,000 हजार रुपयांची खंडणी मागितली?
- 1.1.1 शिरुर, दिनांक 30 जुलै : (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन )
- 1.1.2 शिरुर जवळ खंडणीसाठी मारहाण व गाडीचे नुकसान. ….
- 1.1.3 खंडणीखोर रांजणगाव गणपती चे….
- 1.1.4 शिरुर तालुक्यातील दुसर्या घटनेत उरळगावला मेंढपाळ महिलेचे मंगळसुत्र हिसकावून नेले….
- 1.1.5 गेलेला माल वर्णन –
- 1.1.6 शिरुर जवळील गोलेगाव रोडवरील मोटार सायकल चोरीला….
- 1.1.7 गेलेला माल –
- 1.1.8 About The Author
- 1.1 शिरुर मधे पल्सार गाडी च्या चालकाकडून 15,000 हजार रुपयांची खंडणी मागितली?
शिरुर मधे पल्सार गाडी आडवी मारली ! पुढे काय घडले ते वाचा…
शिरुर मधे पल्सार गाडी च्या चालकाकडून 15,000 हजार रुपयांची खंडणी मागितली?
शिरुर, दिनांक 30 जुलै : (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन )
शिरुर मधे पल्सार गाडी आडवी मारली गेली आहे पुढे काय घडले ते वाचण्यासारखं आहे? तसेच त्या नतर पल्सार गाडी च्या चालकाकडून 15,000 हजार रुपयांची खंडणी मागितली असल्याची फिर्याद शिरुर पोलिस स्टेशनला दाखल झाली आहे. पोलीस निरीक्षक श्री.ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिरुर जवळ खंडणीसाठी मारहाण व गाडीचे नुकसान. ….

फिर्यादीत नमुद केल्यानुसार हकीकत अशी की तारिख 29/7/2024 रोजी दुपारी 13.20 वाजण्याच्या सुमारास एस. व्ही. एस कंपनी येथील किरण रोडे याच्या एक निळ्या रंगाचा बंद टपरीजयळ फिर्यादी-फिर्यादी निलेश बाबासाहेब महाडीक ,वय- 24 वर्षे, धंदा- व्यवसाय, राहणार,करडे, तालुका,शिरूर, जिल्हा- पुणे, असा असणारा आहे.
खंडणीखोर रांजणगाव गणपती चे….
त्यांच्या कार मधुन जात असताना घ्या उर्फ अभिशेक मिसाळ, सकेंत महामुनी व त्यांचे बरोबर एक अनोळखी मुलगा यानी त्याच्याजवळील पल्सर मोटाररसायकल आडवी मारून फिर्यादीस थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु फिर्यादी तेथून कार घेवून पळून गेले. नतर दुपारी 14:00 वाजण्याच्या
सुमारास समाधान चौक, करडे, तालुका,शिरूर ,जिल्हा- पुणे येथे फिर्यादीनी मुरूम टाकण्या करीता महीन्याला 15 हजार रूपये हप्ता न दिल्याच्या कारणांवरून
1) घ्या उर्फ अभिषेक मिसाळ
2) संकेत महामुनी
3) बाला शिंदे सर्व राहणार- शिरूर
4) शुभम (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही )
5) नवनाथ कलींदर,
6) टिनु शेळके
7) रोहन पंचमुख सर्व राहणार- राजणगाव, तालुका – शिरूर,जिल्हा- पुणे
४) सुरज पाडळे राहणार- सोनेसांगवी, तालुका,शिरूर,जिल्हा- पुणे यानी बेकायदा गर्दी जमाव जमवून फिर्यादी यांचा हायवा ट्रक न. एमएच 12 युएम 9879 अडवुन चालक जावेद हमीद शेख यास हाताने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करून त्यांच्या हातातील लाकडी दाडके व दगडाने मारून हायवा ट्रकचे नुकसान केले आहे. त्यामुळे वरील आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’शिरुर‘
आरोपींवर शिरूर पोलिस स्टेशन गुरनं 658/2024 , भारतीय न्याय सहीता 2023 कलम 308(3), 126 (2), 189(2), 191(2), 190, 115(2),352,351(2) (3), 324(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील
तपास पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे हे करत आहेत.तर दाखल अंमलदार सहायक फौजदार श्री. चव्हाण
हे प्रभारी अधिकारी ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
———
शिरुर तालुक्यातील दुसर्या घटनेत उरळगावला मेंढपाळ महिलेचे मंगळसुत्र हिसकावून नेले….

फिर्यादीत नमुद केल्यानुसार हकीकत अशी की दिनांक 29/07/2624 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास उरळगाव ,तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे गावच्या हद्दीत नंदनवन द्वास्याचे या माळरानाजवळ फिर्यादी मेंढ्या चारत असताना तीन अनोळखी इसम वय अंदाजे 25 ते 30 वयाचे मोटार सायकलवर फिर्यादी च्या जवळ येवुन त्यापैकी बुटका असलेल्या इसमाने फिर्यादी रतनबाई बापु थोरात, वय -55 वर्षे, धंदा- शेती व मेंढपाळ, राहणार- उरळगाव थोरातवस्ती, तालुका- शिरूर ,जिल्हा- पुणे यांची मान जोराने पकडुन खाली पाडले व ओरडू नकोस नाहीतर सुरीने भोसकेन असा दम देवुन फिर्यादी रतनबाई बापु थोरात,हिच्या डाव्या कानाच्या पाळीला कापुन दुखापत करून खालील वर्णनाचे दागिने जबरीने चोरून नेले आहेत.
गेलेला माल वर्णन –
1) 100000/- रू किमतीचे काळ्या मण्यामध्ये ओवलेले मणी मंगळसुत्र त्यात 01 तोळा वजनाचे सोन्याचे मणी व 01 तोळा वजनाचे आक्कासाहेब डोरले असे एकुण 02 तोळे वजनाचे प्रती तोळा 50000/-रू प्रमाणे जुवा किंअं
2) 12500/- रू किमतीचे. अडीच ग्रॅमचे कानातील फुलाची नक्षीचे सोन्याचे कर्णफुल जु वा किंअं
एकुण 12500/- असा लुटुन नेला आहे.
म्हणून आरोपी तीन अनोळखी इसम वय अंदाजे 25 ते 30 यांच्यावर शिरुर पोलिस स्टेशनलाशिरूर पोलिस स्टेशन गुरनं 657/2824 असा आहे.तर भारतीय न्याय संहीता कायदा कलम 309 (6),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल अंमलदार सहायक फौजदार श्री. चव्हाण हे आहेत.तर पुढील तपास पोलिस सब इन्पेक्टर श्री. उगले हे
प्रभारी अधिकारी ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
शिरुर जवळील गोलेगाव रोडवरील मोटार सायकल चोरीला….
तर तिस-या घटनेत फिर्यादीत नमुद केल्यानुसार हकिगत अशी की तारिख २६/०७/२०२४ रोजी सायंकाळी ९:३० वाजण्याच्या ते दिनांक २७/०७/२०२४ रोजी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास गोलेगाव रोड, कृष्णाई हाईटच्या पार्कीग येथे पार्कीग मधून फिर्यादी फिर्यादी गौरव प्रभु वाणी, वय- २९ वर्षे ,व्यवसाय- नोकरी , गोलगाव रोड, कृष्णाई हाईट, प्लॉट नंबर ३०४ , शिरूर, तालुका- शिरूर ,जिल्हा- पुणे, मो. नं. ७०६६९५०१५० यांची खालिल वर्णनाची मोटार सायकल ही कोणी तरी अज्ञात चोरटयाने लबाडीचे इरादयाने, स्वता:च्या फायदया करीता चोरून नेली आहे.
गेलेला माल –
१) ३०,००० /- स्पेल्डर कंपनीची मोटार सायकल नंबर एम एच ३७ ए ए ९७९७ तिचा चॅसी नं. MBLHAW123LHH35194 व तिचा इंजिन नंबर HA11EYLHH38164
अज्ञात चोरट्याविरुद्ध गु.र.नं. 655 /2024, आहे.तर भा. द. वी. 303 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल अंमलदार हवालदार श्री. भगत हे आहेत तर पुढील तपासअंमलदार पोलिस हवालदार श्री. आगलावे हे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक श्री. जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.