
Contents
शिरुरमध्ये महिलेशी अश्लील वर्तन आणि मारहाणीची घटना; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
प्रतिनिधी | शिरुर (पुणे) – (कल्पना पुंडे यांच्याकडुन )
शिरुरमध्ये महिलेशी अश्लील वर्तन:शिरुर तालुक्यातील मौजे शिरुर गावात २५ एप्रिल २०२५ रोजी एका महिलेवर अश्लील वर्तन व मारहाणीची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी शबाना तैसिम खान (वय ३५ वर्षे, व्यवसाय – घरकाम, रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) या त्यांच्या राहत्या घरी असताना, आरोपी शायबाज मुस्ताफा मदारी (रा. हलदी मोहल्ला, शिरुर, ता. शिरुर, जि. पुणे) याने आपल्या मोटरसायकलवरून घरासमोरून जोरात गाडी चालवत जाण्याचे प्रकार केले.
“मोटरसायकल जरा हळू चालवा”—
फिर्यादीने “मोटरसायकल जरा हळू चालवा” असे सांगितल्यावर संतप्त झालेल्या आरोपीने रस्त्यावर गाडी थांबवून, फिर्यादीला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता, त्याने वाईट उद्देशाने फिर्यादीस जबरदस्तीने हात धरून छातीवर दाब दिला आणि मारहाण केली. या प्रकारामुळे फिर्यादीस शारीरिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागला.
शिरुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल –
या घटनेनंतर फिर्यादीने शिरुर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.पोलीसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७४ आणि ७९ नुसार गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार उबाळे (पो.ह.वा.) यांनी प्राथमिक नोंद केली असून, तपास पोलीस हवालदार खेडकर (पो.ह.वा.) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
घटनेचा तपशील:
• घटना दिनांक: २५ एप्रिल २०२५
• तक्रार दाखल दिनांक: २६ एप्रिल २०२५
• स्थळ: मौजे शिरुर, ता. शिरुर, जि. पुणे
• आरोपी: शायबाज मुस्ताफा मदारी
• फिर्यादी: शबाना तैसिम खान
संपूर्ण प्रकरणाची अधिक चौकशी सुरु असून, आरोपीविरुद्ध लवकरच योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३2 मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील: जात्यंतक क्रांतीचे सुत्रकार ….
• सवाई शिवाजी …
• दासशुद्रांची गुलामगिरी …
• ‘मावळाई प्रकाशन ची प्रकाशने ..अंक ३२, सत्यशोधक मार्क्सवादी (1) …