
महिला असुरक्षीत !
Contents
शिरुर पोलिसांनी एकावर विनयभंगाचा गुन्हा केला दाखल ! वाचा कुणावर आणि का ?…..
शिरुर मधे विनयभंगाचा गुन्हा दाखल !
शिरुर,दिनांक 29 नोव्हेंबर : (कल्पना पुंडे यांच्याकडुन )
शिरुर पोलिसांनी एकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. कुणावर आणि का ? हा गुन्हा दाखल केला आहे. ते इथे आपण वाचु शकता.
शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानुसार हकिकत अशी की 28/11/2024 तारखेस शिरूर,तालुका -शिरूर, जिल्हा- पुणे येथे यातील आरोपी निरंजन लाळगे, राहणार ( माहित नाही) ,तालुका- पारनेर, जिल्हा- अहिल्यानगर याने फिर्यादी (नाव गुप्तता) यांचे व्हाट्सअप वर वेळोवेळी मेसेज करून फिर्यादी यांचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच फिर्यादी यांचे फोटो एडिट करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली आहे.’शिरुर‘
आरोपीवर शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा र.नं 963/2024 तर भारतीय न्याय संहिता , कलम 79, 351(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल अंमलदार पोलिस हवालदार खेडकर हे आहेत. तर पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री.टेंगले हे करत आहेत.