
Contents
- 1 Shirur Mahila Missing : महिला बेपत्ता म्हणुन नोंद ! पण ,’ कहानी ‘ आहे वेगळीच ?
Shirur Mahila Missing : महिला बेपत्ता म्हणुन नोंद ! पण ,’ कहानी ‘ आहे वेगळीच ?
Shirur Mahila Missing:महिलेनेच पतीला ‘आत’ डांबलं ! पिडीत पती की पत्नी?
Shirur Mahila Missing 10 March 2025 :
(Satyashodhak News Report)

Shirur Mahila Missing : महिला बेपत्ता म्हणुन नोंद ! पण ,’ कहानी ‘ आहे वेगळीच ? महिलेनेच पतीला ‘आत’ डांबलं ! पिडीत ‘पती’ की ‘पत्नी’? असा प्रश्न मात्र अधिक माहिती प्राप्त ‘सत्यशोधक न्युज‘ला प्राप्त झाल्यानंतर पडत आहे.शिरुर पोलिसांनी पतीला शिरुर पोलिस स्टेशन मधे ठेवले.नंतर त्याला जामिन मिळाला आहे.शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
घटना सविस्तर अशी आहे—–
दिनांक 8 मार्च 2025 रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास शिरूर, तालुका-शिरूर, जिल्हा- पुणे येथुन फिर्यादी जालिंधर विष्णु गाडेकर, वय- 41 वर्षे, व्यवसाय -ड्रायव्हर, राहणार- सरदवाडी, तालुका-शिरूर, जिल्हा- पुणे यांची पत्नी सौ. रूपाली जालिंधर गाडेकर, वय -38 वर्ष, राहणार- सरदवाडी, तालुका-शिरूर, जिल्हा- पुणे ही कोणास काही एक न सांगता निघून गेलीआहे. ती अदयापर्यंत परत आली नाही. तिचा शोध घेण्याची विनंती शिरुर पोलिस स्टेशन मधे केली आहे.
मिसिंग व्यक्तीचे नाव व वर्णन—
रूपाली जालिंधर गाडेकर, वय 38 -वर्ष, राहणार-सरदवाडी, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे.
रंगाने गोरी, नाक सरळ, अंगात पिवळ्या रंगाचा गाउन, भाषा मराठी बोलते, गळ्यामध्ये मंगळसूत्र, उजव्या हातावर मराठीमध्ये ‘स्वामी’ गोंदलेले आहे.जवळ विवो कंपनीचा मोबाईल त्यामध्ये जिवो कंपनीचे सीम आहे.
मानव मिसिंग म्हणुन नोंद पण. ….
शिरूर पोलीस स्टेशन मधे मानव मिसिंग रजिस्टर नंबर- 57 /2025 असा आहे.दाखल अंमलदार पोलीस हवालदार श्री.बनकर हे आहेत. पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री. बनकर हे करत आहेत.प्रभारी अधिकारी संदेश केंजळे , शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.
मात्र वेगळीच ,’ कहानी’ समजते —-
मात्र पतीने वेगळीच ,’ कहानी ‘ सत्यशोधक न्युज ‘ ला सांगितली आहे.सर्व सांगत नाही.पण पती यांच्या म्हणण्यानुसार तेच ‘पिडीत‘ आहेत.त्यांना मोठी मूले आहेत.एक मुलगी बी.एस्सी. करत आहे.पोलिसांनी त्यांना जास्त चौकशी न करता लगेच ,’आत‘ ठेवले. त्यांची मुलगी व इतर नातलग यांनी जामीन केला.तेव्हा ते जामिनावर सुटले आहेत.ते सर्व ,’ कहानी ‘ काकुळतीला येऊन सांगत होते.
खास भेट …
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३० मध्ये काय वाचाल ..👇
• वैदिक धर्म व हिंदु धर्म
• शोषितांच्या मुक्तीच तत्वज्ञान उभारणारा लढवय्या
• प्राच्चविद्यापंडित काम्रेड शरद पाटील यांची ग्रंथसंपदा
• मावळाई प्रकाशनची प्रकाशने….👇
लिहिण्याचा उद्देश्य हाच आहे की…
लिहिण्याचा उद्देश्य हाच आहे की आपण व कायदा किंवा पोलिस हे पुरुषालाच जास्त दोषी मानण्याची पद्धत रुढ झाली आहे.पण सर्व पुरुष सारखेच नसतात.काही पुरुषांसमोर काहीच पर्यात उरत नाही.त्यांनाच त्रास सहन करावा लागतो.यातील पती हे चाळीसी ओलांडलेले मोठी मुले असलेले, पण साधे रिक्षाचाकल आहेत.उत्पन कमी असणारे आहेत.यापुर्वी वारंवार पोलिस स्टेशन पर्यंत या पती पत्नीचा विषय गेलेला आहे.पोलिसांनी पाहिलेला आहे.
आता पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हणुन या घटनेचा तटस्तपणे तपास होणे अपेक्षित आहे.शिरुर पोलिसांचा नावलौकीक चांगला आहे. याची आम्हाला खात्री आहे.एवढेच पतीची ,’कहानी ‘ ऐकुण आमची भावना झाली आहे.