
नागरिकांनीही अशा अंमली पदार्थांचे सैवन टाळणे आवश्यक !
शिरूरमध्ये अज्ञात चोरट्याने पार्किंगमधून स्प्लेंडर प्लस मोटरसायकल चोरली !
शिरूर, 12 मे 2025 (सत्यशोधक न्यूज) –
शिरूर शहरातील बाबुराव नगरमधील श्री स्वामी समर्थ अपार्टमेंटमधून एका नागरिकाची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी योगेश जिवराव पाटील (वय 31 वर्ष, राहणार श्री स्वामी समर्थ अपार्टमेंट, बाबुराव नगर, शिरूर) हे ITC कंपनीत रांजणगाव एमआयडीसी येथे खाजगी नोकरी करतात. त्यांची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (MH 19 EH 3729) दिनांक 11 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये हँडल लॉक करून लावण्यात आली होती. रात्री 11:30 वाजता ते घरी परतल्यावर मोटरसायकल पार्किंगमध्ये होती.
मात्र 12 मे रोजी पहाटे 5 वाजता अपार्टमेंटमधील रहिवासी प्रकाश तांबे यांनी पार्किंग गेटचा गोविंदा तुटलेला पाहिला आणि इतर रहिवाशांना जागे केले. योगेश पाटील हे खाली आल्यानंतर त्यांच्या मोटरसायकलचे गायब असलेले लक्षात आले. परिसरात शोध घेतल्यावरही ती मिळून न आल्याने त्यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
चोरी गेलेली मोटरसायकल 70,000/- रुपये किमतीची असून तिचा चेसी क्रमांक MDLHAW237PHK4471 आणि इंजिन क्रमांक HA11E8PHK63676 असा आहे.
या प्रकरणी गु. र. नं. 320/2025 अन्वये भारतीय दंड विधान कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक शिंदे हे करत आहेत.