
Contents
- 1 शिरुर मोटारसायकल चोरी 2025:मोटारसायकल चोरीची घटना: सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद
शिरुर मोटारसायकल चोरी 2025:मोटारसायकल चोरीची घटना: सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद
शिरुर मोटारसायकल चोरी 2025:निमोणे गावात रात्रीच्या सुमारास चोरीची घटना.
शिरुर,दिनांक 3 मे 2025: ( कल्पना पुंडे यांच्याकडुन )
शिरुर मोटारसायकल चोरी 2025:शिरुर तालुक्यातील निमोणे गावात रात्रीच्या सुमारास मोटारसायकल चोरीची घटना घडली. सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद झाला असून पोलीस तपास सुरू आहे.
शिरुर तालुक्यातील निमोणे येथील घटना —
शिरुर तालुक्यातील निमोणे गावात 2 मे रोजी रात्री साडेएकच्या सुमारास मोटारसायकल चोरीची एक घटना घडली आहे. धनंजय यमराज काळे (वय 46 वर्षे), हे आपल्या घरासमोर उभ्या केलेल्या हिरो स्प्लेंडर दुचाकीचा चोरीला गेल्याचा आरोप करत आहेत.
शिरुर पोलिस स्टेशन मधे नोंद—
ही घटना पो स्टे गु.र.नं 300/2825, भा. सं.क. 303 (2) अंतर्गत दाखल झाली आहे. चोरी गेलेली दुचाकी काळ्या रंगाची असून सिल्वर पट्टा आहे. मोटारसायकल नंबर MH12 SM 9442, इंजिन नंबर MH10AGL5A37886 आणि चेसी नंबर MBLHAWO8XL5A82268 असा आहे.
दुचाकीचे Lock तोडले—
फिर्यादीच्या मते, 2 मेच्या रात्री 1.15 वाजता अज्ञात चोरट्याने दुचाकीचे लोक तोडून ती बळजबरीने चोरून नेली. हा प्रकार घरासमोरील मोकळ्या जागेत घडला. विशेष म्हणजे, सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अज्ञात चोरटा स्पष्ट दिसून आला आहे.
शिरूर पोलीसांकडुन तपास सुरु —
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार टेंगले करत असून, पोलीस हवालदार भोते यांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे आहेत.
शिरुर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून अधिक माहिती मिळवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
——
———-
खास वैचारिक भेट. ..
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३३ मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स….
• ‘ हयवदन’…..
• बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण…
• शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ …
• ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…