
Contents
- 1 शिरुर येथे पिंपरी चिंचवड येथुन आलेल्या नातलगांनी केली मारहाण !
- 1.1 शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल !
- 1.1.1 शिरुर,दिनांक- 18जानेवारी : (‘सत्यशोधक न्युज’ रिपोर्ट)
- 1.1.2 शिरुर मधील या घटनेतील फिर्यादी कुंभारआळी येथील !
- 1.1.3 नातलग पिंपरी चिंचवड, पुणे येथील !
- 1.1.4 फिर्यादीस मारुन टाकण्याची धमकी ?
- 1.1.5 फिर्यादीस दरवाजा बंद करून नातलगांकडून मारहाण!
- 1.1.6 फिर्यादीची शिरुर पोलिस स्टेशन मधे फिर्याद !
- 1.1.7 आरोपींवर शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल !
- 1.1.8 About The Author
- 1.1 शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल !
शिरुर येथे पिंपरी चिंचवड येथुन आलेल्या नातलगांनी केली मारहाण !
शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल !
शिरुर,दिनांक- 18जानेवारी : (‘सत्यशोधक न्युज’ रिपोर्ट)

शिरुर येथे पिंपरी चिंचवड येथुन आलेल्या नातलगांनी मारहाण केल्याची घटना शिरुर येथे घडली आहे. शिरुर पोलिस स्टेशन मधे त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिरुर मधील या घटनेतील फिर्यादी कुंभारआळी येथील !
शिरुर पोलिस स्टेशन मधे नोंद केल्यानुसार हकीकत अशी की फिर्यादीचे नाव मुसचिक आत्ताउला शरीफ, वय- 41 वर्षे, व्यवसाय- इलेक्ट्रीशन, राहणार – कुंभारआळी, विठ्ठल मंदीर शेजारी, शिरूर, तालुका- शिरूर,जिल्हा – पुणे यांनी पोलिसां समोर शिरूर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहुन फिर्यादी जबाब दिला आहे .
नातलग पिंपरी चिंचवड, पुणे येथील !
तो असा की त्या वरील ठिकाणी राहण्यास ते आहेत. ते इलेक्ट्रीशनचे काम करतात. त्यावर त्यांच्या कुंटूबांची उपजिवीका करतात. त्यांची पत्नी आमरीन ही गेल्या तीन महिन्यापासून असलेल्या त्यांच्या कौटूबिक वादाच्या कारणावरून तिच्या माहेरी वाय.सी.एम. जवळ, पिंपरी चिंचवड पुणे येथे राहण्यास आहे.
शिरुर मधे धारदार हत्याराने वार ? तर तालुक्यातील दुसर्या घटनेत 28 वर्षीय तरुण अपघातात मृत्युमुखी !
फिर्यादीस मारुन टाकण्याची धमकी ?
आज दिनांक 17/01/2025 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास त्या त्यांच्या घरी असताना त्यांच्या घरी त्यांची पत्नी आमरीन सासू, आकतर बशीर खान, मेहुना मोहम्मद उर्फ आब्बू बशीर खान, सर्व राहणार- वाय. सी. एम. जवळ, पिंपरी चिंचवड पुणे हे आले.त्यानंतर ते फिर्यादीस म्हणाले की, ‘तुम्ही पाठीमागे झालेली आपली भांडणे मिटवून घ्या ! ‘ त्यावेळी ते त्यांना म्हणालो की, ‘मी भांडणे मिटवण्यास तयार आहे. पण पत्नी आमरीन हिला निट वागायला सांगा. ती सारखी भाडणे करत असते.’ त्यावेळी ते म्हणाले की, ‘तु भांडणे मिटवणार आहे का नाही? नाहीतर तुझा भाऊ लंगडा जसा मेला ! तसे तुला ही मारून टाकू’, असे म्हणाले.
त्यानंतर फिर्यादी त्यांना म्हणाले की ,’ तुम्ही माइ-या मेलेल्या भावाचे नाव का काढता ?’. असे म्हणाले असता फिर्यादीचा मेहुना मोहम्मद उर्फ आब्बू बशीर खान यांने हाताने फिर्यादीच्या कानाखाली मारली. त्यावेळी ते पण त्याच्या अंगावर धावून गेले.नंतर त्यांना त्यांची पत्नी आमरीन व सासू आकतर बशीर खान यांनी पाठी मागून हाताने पकडून ठेवले.
Read more >>
बलात्कार करणार्याला 20 वर्ष सश्रम कारावास आणि 50 हजार रुपयांचा दंड !
शिरुर तालुक्यात अपघातात 43 वर्षीय इसम मृत्युमुखी तर दुसर्या घटनेत एस की बसचे 130 लिटर डिझेल चोरीला !
फिर्यादीस दरवाजा बंद करून नातलगांकडून मारहाण!
त्यानंतर त्यांच्या घराचा दरवाज्या बंद करून मेहूना मोहम्मद उर्फ आब्बू बशीर खान यांने फिर्यादीस त्याच्या घरातील लाकडी बेस बॉल स्टीक हिने त्यांच्या उजव्या पायाचे नडगीवर मारून दुखापत केली. त्यावेळी ते मेहूना, सासू व पत्नी यांना त्यांच्या घराच्या बाहेर काढले. नंतर त्यांना सासु आकतर बशीर खान हिने घराच्या बाहेर असलेल्या विटकरीने त्यांच्या छातीवर व मांडीवर फेकून मारून दुखापत केली. तसेच पत्नी आमरीन हिने फिर्यादीला बाजूला पडलेल्या फर्निचरची बॉटम पट्टी तिच्या हातात घेवून फिर्यादीच्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या खाली मारून दुखापत केली.
तसेच वरील सर्व फिर्यादीला म्हणाले की,’ तुला आता दाखवतो. आमचा इम्रान कसा आहे तो ! त्याला सांगून तुला जिवे ठार मारतो ‘. अशी दमदाटी करून तेथून ते सर्व निघून गेले.
फिर्यादीची शिरुर पोलिस स्टेशन मधे फिर्याद !
त्यानंतर फिर्यादी शिरूर पोलीस स्टेशन येथे आले.नंतर फिर्यादीला तेथील पोलीसांनी औषध उपचारा कामी सरकारी हास्पिटलची मेडीकल यादी दिली. तेथे जावून फिर्यादीस झालेल्या जखमांवर औषध उपचार करून तक्रार देण्यास फिर्यादी गेले.म्हणून फिर्यादीची
1) मेहूना-मोहम्मद उर्फ
आब्बू बशिर खान
2) सासू-आकतर बशिर खान
3) पत्नी-आमरीन मुसधिक शरीफ,
सर्व राहणार- वाय. सी.एम.हास्पिटल जवळ, पिंपरी चिंचवड, पुणे. यांच्या विरुध्द कायदेशिर फिर्याद शिरुर पोलिस स्टेशनला आहे.
आरोपींवर शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल !
आरोपींवर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 118(1) ,125 (a ) , 115 (2) , 351 (2) , 351 (3) , 3 (5) नुसार शिरूर पोलिस स्टेशन मधे कायदेशिर गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपींची नावे पुढील प्रमाणे –
1 ) मेहूना-मोहम्मद उर्फ आब्बू बशीर खान
2 ) सासु – आकतर बशीर खान
3) पत्नी – आमरीन मुसघिक शरीफ
दाखल अमंलदार पोलिस हवालदार श्री. वारे हे आहेत.तर पुढील तपास पोलिस अमंलदार श्री. भगत हे करत आहेत. प्रभारी आधिकारी पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे, शिरुर पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.