
Shirur News Accident :शिरूरमधील भीषण अपघातात दोन मृत, एक जखमी; डंपर चालक पसार
शिरूर, पुणे (18 मे 2025): (Satyashodhak News Report)
Shirur News Accident हा शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे 17 मे 2025 रोजी रात्री 8 वाजता भीषण अपघात झाला. भरधाव डंपर (MH 42 SEQ 7696) ने रॉन्ग साईडने येत समोरून येणाऱ्या पिकअप (MH 03 OE 0638) ला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
Shirur News Accident मधे सागर संभाजी कोळपे आणि यश सुधाकर भिसे मृत्यूमुखी —
मृतांमध्ये सागर संभाजी कोळपे (वय 28, रा. मांडवगण फराटा) आणि यश सुधाकर भिसे (वय 12, सध्या रा. मांडवगण फराटा, मूळ रा. खेडवाडी, जि. बीड) यांचा समावेश आहे. तर अनिल बीरा कोळपे हे जखमी झाले आहेत.
शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल—-
या घटनेची तक्रार दादा बाळासो कोळपे (वय 38, रा. मांडवगण फराटा) यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली असून गुन्हा नंबर 341/2025 अंतर्गत संबंधित डंपर चालकाविरुद्ध कलम 281, 106(1), 125(अ)(ब), 324(4)(5), मोटार वाहन कायदा 184, 134/177 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Shirur News Accident अपघातातील चालक अपघात स्थळावरून फरार—

घटना घडल्यानंतर डंपर चालक अपघात स्थळावरून फरार झाला. तपास पोसई नकाते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. प्रभारी अधिकारी पो.नि. संदेश केंजळे (शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण) यांनी घटनेची माहिती दिली आहे.
वाचकांसाठी सूचना —-
आपण अशा घटनांना आळा घालण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा आणि ट्रॅफिक सेफ्टीबाबत जागरूक राहा.
ताज्या बातम्यांसाठी भेट द्या:
satyashodhak.blog
महाराष्ट्र पोलीस – अधिकृत संकेतस्थळ
गूगल मॅप्स ट्रॅफिक अपडेट
पुणे ग्रामीण पोलीस फेसबुक पेज
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…
Shirur Crime News Kanhur Mesai: कोकरूच्या कारणावरून तलवारीनं हल्ला; शेतकऱ्यावर जीवघेणा प्रहार
Motorcycle Theft Shirur Amdabad :शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथून एका शेतकऱ्याची मोटारसायकल चोरीस!